मुंबई, १४ एप्रिल २०२४: गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही देशात गृहखरेदीचा जोरकायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख ८ शहरांतमिळून एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे यागृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल १,१०,८८० कोटी रुपयांची उलाढाल झालीआहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्याचीवाढ झाली असल्याचा खुलासा प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइटरेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च २०२४’ अहवालातून झाला आहे. गेल्यावर्षीजानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील ८ प्रमुखशहरांत ८५,८४० घरांची विक्री झाली होती.
देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्रीमुंबई आणि पुणे येथे झाली असून या शहरांतील गृहविक्रीचा आकडा६५,७०० वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असूनपहिल्या ३ महिन्यांत मुंबईत ४१,५९० घरांची विक्री झाली आहे. दुस–याक्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३,११० घरांची विक्री झालीआहे. गृहविक्रीमध्ये यापाठोपाठ हैदराबाद (१४,२९०), अहमदाबाद (१२,९२०), बंगळुरू (१०,३८०), दिल्ली–एनसीआर (१०,०६०), चेन्नई (४,४३०) आणिकोलकाता (३,८६०) या शहरांचा क्रमांक लागतो.
प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुपसीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “आकारमान आणि मूल्याच्याबाबतीत निवासी मालमत्ता विक्रीतील वाढ ही एकंदर अर्थव्यवस्थेसाठी शुभम्हटली पाहिजे, कारण सिमेंट आणि स्टील सहित २०० पेक्षा जास्तसाहाय्यक उद्योग हे रियल इस्टेट क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातीलहाऊसिंग मार्केटची घोडदौड जबरदस्त सुरू असून ८ प्रमुख शहरांत गृह विक्रीझपाट्याने वाढत आहे. आपल्या मालकीचे घर घेण्याची प्रबळ इच्छा, मजबूतविकास, स्थिर तारण दर ही यामागील मुख्य परीबळे आहेत. जसजसागुंतवणूकदारांचा विश्वास हळूहळू पुनर्जीवित होत आहे आणि त्यालाअनिवासी भारतीयांच्या मजबूत मागणीची जोड मिळत आहे, घरांच्यामागणीचा आलेख, किंमतीतील काही अनपेक्षित चढ–उतार वगळता, दमदारवृद्धीसाठी तयार झालेला दिसत आहे.”
प्रॉपटायगर डॉटकॉम आणि हाऊसिंग डॉटकॉमची संशोधन प्रमुख श्रीमतीअंकिता सूद म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता विक्रीच्या एकंदर व्यवहार मूल्यात ६८% इतकी असामान्य वाढ झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि पुणे यांचा एकत्रित वाटा १.११ लक्ष कोटीरुपयांच्या एकंदर व्यवहार मूल्यात ७६% इतका आहे. या वृद्धीवरून केवळवाढती मागणी लक्षात येत नाही, तर प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांतमालमत्तेच्या किंमतीतील १५–२० टक्क्यांची लक्षणीय वाढ देखील दिसून येते. येत्या दोन तिमाहींमध्ये सुद्धा वाढीचा हा आलेख आर्थिक वृद्धी आणि मजबूतमागणीचा रेटा मिळून आणखी वर वर जाईल अशी अपेक्षा आहे.”
गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत गृहविक्री मूल्यातसर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर १२,१२० कोटी (२४९ टक्के) मध्ये झालीअसून यानंतर हैदराबाद २३,५८० कोटी (१४३ टक्के), अहमदाबाद ९,०९०कोटी (१३० टक्के), कोलकता २,००० कोटी (५९ टक्के), बंगळुरू ११,३१०कोटी (५२ टक्के), पुणे १५,१५० कोटी (३२ टक्के), मुंबई–एमएमआर ३४,३४०कोटी (३१ टक्के), आणि चेन्नई ३,२९० कोटी (२२ टक्के) या शहरांचा क्रमांकलागतो
क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री ९९ दशलक्ष चौरसफुटांपासून ६३% वाढून १६२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर(१८४ टक्के)सह आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (१२८ टक्के), अहमदाबाद (१०८ टक्के), कोलकता (४९ टक्के), बंगळुरू (३९ टक्के), मुंबई–एमएमआर (२६ टक्के), पुणे (२१ टक्के), आणि चेन्नई (१६ टक्के) याशहरांचा क्रमांक लागतो.
या अहवालात म्हटले आहे की, “एकंदर व्यवहाराचे मूल्य’ किंवा ‘विक्री मूल्य’ २०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एका शहरात विकल्या गेलेल्या मालमत्तेच्या एकंदर मूल्याशी संबंधित आहे. विकलेल्या एकंदर घरांच्या संख्येला वेटेड अॅव्हरेज प्राइसने गुणून व त्यात मालमत्तांच्या वेटेड अॅव्हरेज साइझने गुणून हे मूल्य प्राप्त करण्यात येते. मूलतः ते निर्दिष्ट कालावधीत त्या शहरातील सर्व विक्री व्यवहारांचे मौद्रिक मूल्य समाविष्ट करते.