maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

अॅथलेटिक सर्वोत्तमतेचे साजरीकरण: लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सने वर्ल्‍ड अॅथलेटिक्‍स डे निमित्त भारतीय खेळाडूंच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा गौरव केला

मानवी प्रयत्‍नांच्या व्‍यापकतेमध्‍ये अॅथलेटिक्‍स क्षेत्राचा विशेष उल्लेख करता येतो, जेथे साधारण व्‍यक्‍ती मर्यादांवर मात करत असाधारण चॅम्पियन्‍स बनतात. अॅथलेटिक्‍स फक्‍त सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत नाही तर त्‍यांच्‍यामधील अमर्याद क्षमतेला देखील दाखवतात. धावपटू वाऱ्याच्‍या वेगाला पार करत शर्यत करतो, हाय जंपर गुरूत्‍वाकर्षणावर मात करतो आणि मॅरेथॉन रनर सहनशीलतेच्‍या मर्यादांना दूर करतो. समर्पितता व शिस्‍तबद्धतेचे उत्‍साही प्रतीक असलेला प्रत्‍येक अॅथलीट अशक्‍य गोष्‍टीला आव्‍हान करतो आणि मानवी कर्तृत्वाला नव्‍या उंचीवर घेऊन जातो. पण, स्‍पर्धा व पदकांच्‍या विश्‍वापलीकडे अॅथलेटिक्‍सचा स्‍वयं-शोधाचा व स्‍वयं-निपुणतेचा प्रवास असतो.

यंदा वर्ल्‍ड अॅथलेटिक्‍स डे निमित्त लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्स क्रीडा इतिहासाच्‍या पानांमध्‍ये कोरलेल्‍या अॅथलेटिक्‍सच्‍या असाधारण विजयांना सन्‍मानित करत आहे. स्‍थापनेपासून लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्स मानवी प्रेरणा व उपलब्‍धीचे आधारस्‍तंभ राहिले आहे,अद्वितीय समर्पितता व धैर्याला प्रशंसित करत आहे. त्‍यांच्‍या पानांमध्‍ये उल्‍लेखनीय यशाच्‍या गाथा सामावलेल्‍या आहेत, ज्‍यामधून विविध क्रीडाक्षेत्रांमधील टॅलेंटचा संपन्‍न इतिहास दिसून येतो.

लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्‍ये नोंद करण्‍यात आलेल्‍या अनेक अविश्‍वसनीय कामगिरींपैकी काही उल्‍लेखनीय उदाहरणे खाली देण्‍यात आली आहेत, ज्‍यामधून अॅथलेटिक सर्वोत्तमता दिसून येते:  

  • २०२३ मध्ये, नीरज चोप्राने वर्ल्‍ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिला भारतीय सुवर्णपदक विजेता म्हणून इतिहासात आपले नाव कोरले, पुरुषांच्या भालाफेकीच्या फायनलमध्ये ८८.१७ मीटरचा ऐतिहासिक थ्रो गाठला.
  • ज्योती याराजीने जुलै २०२३ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्‍स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १३.०९ सेकंदांमध्‍ये शर्यत पार करत तिने केलेली उल्‍लेखनीय कामगिरी भाारतीय अॅथलेटिक्‍समध्‍ये महत्त्वपूर्ण ठरली.
  • दुती चंदने मर्यादांना दूर करण्‍यासोबत भारतीय अॅथलेटिक्‍समधील नॉर्म्‍सना नव्‍या उंचीवर घेऊन जाणे सुरूच ठेवले आहे. महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन असलेली ती २०१९ मध्ये युनिव्हर्सियाडमध्येसुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय धावपटू ठरली. एलजीबीटीक्‍यू अॅथलीट म्हणून तिची धाडसी भूमिका सर्वसमावेशकता आणि स्थिरतेचे प्रबळ उदाहरण आहे.
  • वयाच्‍या १०५व्‍या वर्षी रामबाई यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीमधून अॅथलेटिक्‍सच कालातीत उत्‍साह दिसून येतो, त्‍या सर्वात वयोबुद्ध सुवर्णपदक विजेत्‍या आहेत. गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या मास्टर्स अॅथलेटिक्‍स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवून त्‍यांनी सिद्ध केले की, मोठे यश संपादित करण्‍यासाठी वयाचे कोणतेच बंधन नसते.
  • अंजू बॉबी जॉर्ज ही भारतीय अॅथलेटिक्समधील आयकॉन आहेत. त्‍या आयएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्‍या एकमेव पदक विजेत्‍या आहेत आणि भावी पिढ्यांना प्रेरित करत आहेत. लाँग जंपमधील (लांब उडी) त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीने त्‍यांना अॅथलेटिक समुदायामध्‍ये रोल मॉडेलचा (आदर्श) दर्जा मिळवून दिला अहे. त्‍यांच्‍या योगदानांना प्रशंसित करत २०१४ मध्‍ये महिला सक्षमीकरण‘ थीम असलेल्‍या लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्‍या मल्‍याळम एडिशन लाँचदरम्‍यान इतर उल्‍लेखनीय महिला अचीव्‍हर्ससोबत त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला. 

वर्ल्‍ड अॅथलेटिक्‍स डे अॅथलेटिक्‍स सर्वोत्तमता संपादित करण्‍यासाठी दाखवणाऱ्या अविरत कटिबद्धतेची आठवण करून देतो. लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी हा दिवस जगभरातील विविध पार्श्‍वभूमी व डिसीप्‍लीन्‍समधील अॅथलेटिक्‍सच्‍या असाधारण कामगिरींना प्रशंसित आणि सन्‍मानित करण्‍याची संधी देतो,” असे लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्‍या कन्‍सल्टिंग एडिटर आणि हॅचेट इंडिया येथील प्रकाशक वत्‍सला कौल बॅनर्जी म्‍हणाल्‍या.

कोका-कोला कंपनीच्‍या भारत व साऊथ-वेस्‍ट एशिया ऑपरेटिंग युनिटमधील हायड्रेशन, स्‍पोर्ट्स व टी साठी मार्केटिंगच्‍या वरिष्‍ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्‍हणाल्‍या, कोका-कोला इंडियामध्‍ये आमचा वास्‍तविक सकारात्‍मक प्रभावाला प्रेरित, सक्षम व निर्माण करण्‍यासाठी क्रीडाच्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेवर विश्‍वास आहे. भारतीय अॅथलीट्सच्‍या यशस्‍वी कामगिरींना प्रशंसित करण्‍यासाठी आणि ग्राहकांमध्‍ये अभिमानाची भावना जागृत करण्‍यासाठी आम्‍ही लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्‍या माध्‍यमातून अॅथलीट्सच्‍या यशाला मानवंदना देतो.”

लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्‍या ३३व्‍या एडिशनने त्‍यांची थीम इंडिया अॅट हर बेस्‍ट‘ कायम राखली आहे. भारतीय यशस्‍वी कामगिरींना प्रशंसित करण्‍याच्‍या आपल्‍या वारसाशी बांधील राहत ते इतर असाधारण उपलब्‍धींची व्‍यापक श्रेणी, अपवादात्‍मक कामगिरींच्यागाथा आणि निरंतर अचीव्‍हर्सच्‍या यशांना सादर करतात. तसेच,कोका-कोला इंडियाने नुकतेच #SheTheDifference चा भाग म्‍हणून अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या सहयोगामधून महत्त्वपूर्ण पाठिंबा व पायाभूत सुविधा देत महिला अॅथलीट्सना सक्षम करण्‍याप्रती कोका-कोलाची कटिबद्धता दिसूनयेते.

Related posts

कतरिना कैफ बनली ‘रॅडो’ची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर

Shivani Shetty

कोका-कोलाकडून राज कपूर यांच्‍या करिष्‍माई वारशासह भारतात युनिक ग्‍लोबल प्रॉपर्टी ‘कोका-कोला फूडमार्क्‍स’ लाँच

Shivani Shetty

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट

Shivani Shetty

Leave a Comment