maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ILT20 सीझन 2 च्या यशानंतर ब्लॉकबस्टर सीझन 3 ची तयारी सुरू

मुंबई, १५ मे २०२४: डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग T20 (ILT20) च्या दुसऱ्या सीझनला जगभरातील ३४८ दशलक्ष प्रेक्षक लाभले. जागतिक स्तरावर सर्वाधिक पहिल्या गेलेल्या T20 क्रिकेट लीगमध्ये याचा समावेश होतो. डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग T20 चा तिसरा हंगाम शनिवार, ११ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. ३४ सामन्यांची ही स्पर्धा महिनाभर चालेल आणि अंतिम सामना रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी खेळवला जाईल. भारतातील आणि जगभरातील क्रिकेट चाहते आणि क्रीडाप्रेमी झी चे टीव्ही चॅनेल, ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 आणि जगभरातील त्याच्या सिंडिकेट भागीदारांच्या टीव्ही आणि डिजिटल नेटवर्कवर थेट हे सामने पाहू शकतात.

११ जानेवारी २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अबूधाबी, दुबई आणि शारजाह या युएई तील तीन प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांवर ३४ सामने खेळवले जातील. हा ऍक्शन-पॅक इव्हेंट झीच्या सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या टीव्ही चॅनलवर तसेच भारतातील आघाडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म-झी5 वर पाहता येईल. सहा संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ३४ सामने खेळवले जातील. हे सामने संपूर्ण युएई मध्ये खेळवले जातील. लीगच्या सहा फ्रँचायझी संघांमध्ये अबू धाबी नाइट रायडर्स (कोलकाता नाइट रायडर्स), डेझर्ट वायपर्स (लान्सर कॅपिटल), दुबई कॅपिटल्स (जीएमआर), गल्फ जायंट्स (अदानी स्पोर्ट्स लाइन), एमआय एमिरेट्स (रिलायन्स इंडस्ट्रीज), आणि शारजाह वॉरियर्स (कॅप्री ग्लोबल) यांचा समावेश आहे.

श्री आशिष सहगल, चीफ ग्रोथ ऑफिसर – ऍड सेल्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) म्हणाले की,“ डीपी वर्ल्ड ILT20 3रा सीझन सादर करताना झी ला आनंद होत आहे. भारत आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळेल, असे आमचे वचन आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्रतिष्ठित स्टेडियम, पायाभूत सुविधा आणि सहा आघाडीच्या स्पोर्टिंग फ्रँचायझींसह, गेल्या वर्षीपेक्षा जास्त यश मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.चाहत्यांशी असलेले नाते अधिक परस्परसंवादी आणि आकर्षक बनवण्यासाठी आम्ही नवनवीन उपाय करत असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, क्रिकेट रसिकांना खेळाशी जोडण्यासाठी आम्ही नवीन मार्ग शोधात आहोत. या रोमांचक नवीन हंगामाला सुरुवात करत असताना, ही स्पर्धा अनुभवणे जगभरातील प्रेक्षकांना अधिक सुलभ होईल याची काळजी करणे हे आमचे ध्येय आहे.”

डेव्हिड व्हाईट, सीईओ, डीपी वर्ल्ड ILT20 म्हणाले,“डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग टी20 सीझन 3 ची पुष्टी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या भागधारकांशी चर्चा केल्यानंतर या स्पर्धेला अंतिम रूप देण्यात आले आहे. लीग आणखी मोठी आणि चांगली बनवण्याच्या उद्देशाने आम्ही सीझन 3 साठी आमची तयारी सुरू केली आहे. संबंधित मेट्रिक्सच्या दृष्टीने सीझन 2 हे खूप मोठे यश होते आणि लीगची प्रतिष्ठा आणखी मजबूत करण्यात मदत केली. यामुळे जगभरातील खेळाडू, चाहते आणि प्रसारकांसाठी टी20 लीग ही सर्वाधिक मागणी असलेली स्पर्धा होती. सर्व पैलूंचा विचार केल्यावर, सीझन 3 साठी जानेवारी-फेब्रुवारी हा स्पर्धेसाठी सर्वात योग्य सीझन असल्याचे लक्षात आले.”

Related posts

एल्‍गीकडून डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजी एस.पी.ए., इटलीसोबत बहुवार्षिक तंत्रज्ञान परवाना कराराची घोषणा

Shivani Shetty

इझमायट्रिपने चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

Shivani Shetty

नवी मुंबईतील डॉक्टरांनी यशस्वीपणे केली पहिली नॉन-सर्जिकल कार्डियाक प्रक्रिया

Shivani Shetty

Leave a Comment