सणासुदीचा मोसम तोंडावर आला आहे, या काळात गोडाधोडावर मनसोक्त ताव मारला जाणार हे वेगळं सांगायची गरज नाही. मधुमेह असलेल्यांना किंवा मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मात्र हे एक आव्हानच भासू शकतं. पण अशा मंडळींसाठी एक छान बातमी आहे: तुम्हाला गोड पदार्थांवर पाणी सोडण्याची गरज नाही. इथे प्रश्न आहे तो सजगपणे निवड करण्याचा – अधिक चांगले पर्याय निवडण्याचा आणि नव्या मधुमेह-स्नेही घटकांचा शोध घेण्याचा. असे करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकाल आणि आपल्या आनंदासाठी अधिक आरोग्यपूर्ण, चवदार पदार्थांचा खजिनाच तुमच्या हाती लागू शकेल.
मधुमेहाचे व्यवस्थापन: फक्त नव्हे बरेच काही
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फक्त साखरेच्या सेवनाने वाढत नसते. त्यासोबतच तुमच्या आहारातील कार्बोहायड्रेट्स अर्थात कर्बोदकांच्या एकूण प्रमाणाचे व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे. साखर, कार्ब्जची जटिल रूपे आणि फायबरसारख्या कार्बोहायड्रेट्सचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. डिझर्ट्समध्ये बरेचदा डेक्स्ट्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजसारख्या सिंपल शुगर्स – साध्या साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. पण फक्त साखर टाळणे पुरेसे नाही तर इतरही अनेक बाबी विचारात घेणे जरुरीचे आहे. साखरेसाठी पर्याय म्हणून वापरलेल्या पदार्थांमुळे आहारातील कॅलरीज आणि कार्ब्जची संख्या कमी होते हे खरे असले तरीही त्यांच्यामुळे भूक लागण्यामध्ये व रक्तातील साखरेच्या नियमनामध्ये भूमिका बजावणाऱ्या पोटातील उपकारक बॅक्टेरियाला त्रास होऊ शकतो.
चांगल्या आरोग्याचा मार्ग चांगल्या आहारावाटे जातो
अन्नपदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) समजून घेतल्यास योग्य पदार्थांची निवड करण्यास मदत होऊ शकते. GI इंडेक्स म्हणजे अन्नपदार्थांच्या गुणांकनाची एक पद्धत आहे. एखाद्या पदार्थामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती वाढेल हे सांगणारी ही व्यवस्था आहे. तेव्हा, GI इंडेक्स जितका कमी तितका पदार्थ आरोग्यासाठी अधिक चांगला. उदाहरणार्थ, GI इंडेक्स खूप जास्त असलेल्या आणि कधीकधीच खायच्या पदार्थांमध्ये आईस्क्रीम्स, चॉकलेट्स, मैद्यासारखी पीठं, मिठाया इत्यादींचा समावेश होतो. ग्लुकोजचा मुख्य स्त्रोत असलेल्या या पदार्थांममुळे तुमच्या शरीरातील साखरेचे संतुलन बिघडण्याची शक्यता सर्वाधिक असते.
“मधुमेहाचे व्यवस्थापन करणे म्हणजे स्वत:ला वंचित ठेवणे असा होत नाही – तर हुशारीने संपूर्ण माहितीनिशी निवड करणे असा होतो.” अबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेस विभागाचे असोसिएट डिरेक्टर डॉ. इरफान शेख सांगतात. “रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या आहाराचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करणाऱ्या पोषक घटकांचे योग्य संतुलन साधणे. हे घटक विचारपूर्वक योग्य प्रमाणात एकत्र करून तुम्ही तुमच्या आहाराचा GI नियंत्रित करू शकता आणि ग्लुकोजची पातळी अधिक प्रभावीपणे सांभाळू शकता .”
आहारात भरपूर फायबर (बाजरी, ज्वारी आणि नाचणी), होल व्हीट ब्रेड, फळे, भाज्या आणि अखंड डाळींचा समावेश करणे चांगले. मधुमेहींच्या आहारात तर या गोष्टी असल्याच पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे तुम्ही खाल्लेले साध्या कार्बोहायड्रेट्सचा परिणाम निष्प्रभ होतो आणि रक्तातील साखरेची सर्वसामान्य पातळी राखण्यास मदत होते.
आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेताना कार्बोहायड्रेट्सचे सेवन नियंत्रणात ठेवण्यासाठीचा आणखी एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे डायबेटिक-स्पेसिफिक न्यूट्रिशन (DSN). मधुमेह असलेल्या व्यक्तींना संतुलित पोषण पुरविण्याच्या दृष्टीने खास बेतलेले हे आहारनियमन भोजनानंतरच्या ब्लड शुगरवर नियंत्रण राखण्यास मदत करते व त्याचवेळी तुम्हाला उत्साही ठेवते.
एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि इंडियन अकॅडेमी ऑफ डायबेटिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शशांक जोशी आपले मत मांडताना सांगतात, “चांगले पोषण हा कोणत्याही प्रकारच्या मधुमेहाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे. डायबेटिक स्पेसिफिक न्यूट्रिशऩ (DSN)मुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे नियमन होते आणि प्रसंगी अत्यावश्यक पोषक घटकांचा पुरवठाही शरीराला होतो, ज्याचा कदाचित आपल्या नेहमीच्या आहारात अभाव असू शकतो. या विशेषीकृत (स्पेश्यलाइझ्ड) पोषणाचा आहारात समावेश केल्याने काही अत्यावश्यक घटकांच्या उणीवा भरून निघू शकतात व ऊर्जेच्या अखंड पुरवठ्याची तसेच भोजनोत्तर साखरेच्या पातळीवर अधिक चांगले नियंत्रण राखले जाण्याची हमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची चिंता न करता सणांचा आनंद मनसोक्त अनुभवता येतो. मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी माझा मंत्र आहे “हळूहळू खा, वेळेवर खा, योग्य आहार घ्या, अधिक चाला, योगासने करा, चांगली झोप घ्या आणि छान हसा”
DSN ची मदत कशाप्रकारे होते: तुमची गोडाधोडाची हौस हुशारीने भागवा
डायबेटिस-स्पेसिफिक न्यूट्रिशन मधुमेहींना अपराधीपणाच्या भावनेशिवाय गोड पदार्थांचा आनंद मिळवून देण्याचा एक मार्ग आहे. DSN उत्पादने ग्लायकेमिक परिणाम कमी व्हावा अशाच प्रकारे तयार करण्यात येतात, ज्यामुळे ती भरपूर कर्बोदके असलेल्या, साखरेत घोळलेल्या पदार्थांना आदर्श पर्याय ठरतात. तुमच्या सणासुदीच्या पक्वान्नांमध्ये DSN आणि इतर मधुमेह-स्नेही घटक समाविष्ट करण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे:
• DSN शेक्स: गोड मिल्कशेक्स किंवा स्मूदीजऐवजी DSN शेक मिक्सचा बेस म्हणून वापर करा आणि त्यात बेरीज किंवा अंजिरासारखी मधुमेह-स्नेही फळे ब्लेन्ड करा.
• साखरेला पर्याय: प्रक्रिया केलेली रिफाइन्ड शुगरच्या जागी माफक प्रमाणात कृत्रिम स्वीटनर्सचा वापर करा.
• घरगुती मिठाया: पारंपरिक फराळ बनवताना कर्बोदकांचे उच्च प्रमाण असलेल्या घटकांच्या जागी DSN पावडर किंवा बदामाचे पीठ किंवा ओट फ्लोरसारख्या लो-GI पिठांचा वापर करा.
• लो-GI पदार्थ: बासमती तांदळासारख्या हाय-GI पदार्थांऐवजी ब्राऊन राइसचा वापर करा आणि नेहमीच्या गव्हाच्या चपात्यांऐवजी नाचणी, बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसारखे पर्याय वापरा व आपले भोजन मधुमेह-स्नेही बनवा.
चवदार, मधुमेह-स्नेही डिझर्टचे काही पर्याय
सणासुदीच्या दिवसांत बनविलेल्या जाणाऱ्या नेहमीच्या लोकप्रिय गोड पदार्थांना मधुमेह-स्नेही स्वरूपात तयार करणे तुम्हाला वाटते तितके कठीण नाही. एन्श्युअर डायबेटिस केअरसारख्या डायबेटिक-स्पेसिफिक न्यूट्रिशन (DSN) उत्पादानांचा आणि लो-ग्लायकेमिक घटकांचा पदार्थांत वापर करून तुम्ही रक्तातील साखरेच्या प्रमाणावरील नियंत्रण सुटू न देता सणाचा उत्साह कायम ठेवू शकता:
• गाजर हलवा: दळदार वेलची आणि भाजलेले बदाम टाकलेल्या दुधात किसलेले गाजर हळूहळू शिजू द्या. पाणी उडून जाईपर्यंत शिजवा, जेणेकरून एक दाट, सायीसारखे मिश्रम भांड्यात उरेल. भाजलेल्या बदामाच्या कापांची वरून शिवरण करा म्हणजे तुमच्या पाककृतीला तो छान कुरकुरीतपणा मिळेल.
• शिर शेवया: तुपामध्ये शेवयांना सोनेरी होईपर्यंत परतून घ्या, मग त्यांना दूध व खव्याच्या मिश्रणात टाकून मिश्रण दाट होईपर्यंत हळूहळू शिजू द्या. केसराच्या हलक्याशा शिडकाव्याने या खिरीला रंग आणि स्वाद मिळले व वरून सुकामेवा टाकला की सणासुदीचे खास पक्वान तयार होईल.
• मुगाच्या डाळीचे पायसम: मुगाची डाळ आणि तांदूळ मंद आंचेवर हळूहळू शिजत ठेवा. हे मलाईदार मिश्रण मुख्य घटक म्हणून वापरा, तूप टाकून त्याला एक शाही स्वाद द्या. त्यात सढळ हातान भाजलेले नट्स आणि कोमट दूध टाकले की उबदार, पोषण घटकांनी समृद्ध पक्वान्न तयार. या चवदार पाककृतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी click here.
• सुकामेवा श्रीखंड: चक्क्यामध्ये वेलची आणि बदाम-पिस्ते टाकून हा थंडावा देणारा स्वादीष्ट पदार्थ बनवा. दाणेदार आणि मन प्रसन्न करणाऱ्या अऩुभवासाठी हे श्रीखंड थंडगार करून वाढा.
सणासुदीचा आनंद घेण्यासाठी प्रकृतीशी तडजोड करण्याची गरज नाही. सजगपणे निवड केल्याने, कार्बोहायड्रेट्सच्या सेवनावर नियंत्रण राखत आणि डायबेटिक-स्पेसिफिक न्यूट्रिशनचा समावेश करून तुम्ही कोणत्याही अपराधी भावनेशिवाय गोड पक्वान्नांचा आनंद घेऊ शकता. सणांचा काळ म्हणजे आनंदाचा व उत्सवाचा काळ आणि हे थोडे बदल करून तुम्ही तब्येतीची काळजी न करता प्रत्येक क्षणाची मौज अनुभवू शकता. लक्षात ठेवा, संतुलन साधणे आणि आपल्या आहाराविषयक गरजांशी सुसंगत अशी निवड संपूर्ण माहितीनिशी करणे ही यातील महत्त्वाची बाब आहे. आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनाचे गाडे नियमितपणे सांभाळण्यासाठी सक्रिय रहायला विसरू नका, साखरेची पातळी, अगदी सणांच्या धामधुमीतही नियमितपणे तपासा!