maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतामध्ये पहिल्या अंजायना जागरुकता सप्ताहाच्या औचित्याने असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API) आणि अबॉट यांनी केले अंजायनाच्या व्यवस्थापनावरील कृती आराखड्याचे अनावरण

मुंबई, जून २०२४: दि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API)ने जागतिक हेल्थकेअर कंपनी अबॉटच्या साथीने १९ जून ते २५ जून दरम्यानच्या पहिल्या वहिल्या ‘अंजायना जागरुकता सप्ताहा’चा शुभारंभ केला. हृदयाशी संबंधित घटनांना धोका कमी करण्यासाठी आणि रुग्णाला अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी अंजायनाचे लवकरात लवकर निदान होण्याचे व त्याच्या इष्टतम व्यवस्थापनाचे महत्त्व या सप्ताहाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या सप्ताहाच्या औचित्याने त्यांनी अबॉटद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना (OPTA): द नीड ऑफ दि अवर’ असे शीर्षक असलेल्या कृतीआराखड्याचे अनावरण केले, ज्यात या आजाराचे वेळीच निदान होण्यासाठीचे व त्याच्या व्यवस्थापनासाठीचे सर्वोत्तम मापदंड ठळकपणे मांडण्यात आले आहेत.
छातीमध्ये अस्वस्थता, वेदना, जडपणा जाणवणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटणे ही या कोरोनरी आर्टरी आजाराची (CAD) प्रारंभिक सर्वसामान्य लक्षणे आहेत. कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांशी (CVD) संबंधित मृत्यूंच्या बाबतीत भारत हा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे आणि देशामध्ये CVDs मुळे वर्षाकाठी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये अनुक्रमे २०.३ टक्‍के आणि १६.९ टक्‍के इतके आहे. म्हणूनच अंजायनासारख्या धोक्याच्या खुणांकडे लक्ष देणे हे विशेष महत्त्वाचे आहे. या आजारामुळे डोके गरगरणे, बाहू, पाठ आणि इतर ठिकाणी अस्वस्थता वाटणे हे त्रास जाणवू शकतात. लठ्ठपणा हाही अंजायनाचा धोका वाढविणारा एक महत्त्वाचा घटक आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा धोका अधिक जाणवतो. मधुमेहासह जगणाऱ्या लोकांच्या बाबतीतही वेळीच लक्ष दिले नाही तर अधिक गंभीर स्वरूपाचा कोरोनरी आजार होऊ शकतो.
हा सर्वसमावेशक कृती आराखडा अंजायनाविषयीची सखोल माहिती उघड करतो, ज्यात आजारापासून ते महत्त्वाच्या आव्हानांपर्यंत आणि डॉक्टरांनी लक्षात घेण्याजोग्या शिफारशींपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. इतर ठिकाणच्या लोकसंख्यांच्या तुलनेत भारतामध्ये CAD मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०-५० टक्‍के अधिक आहे. त्याचबरोबर भारतात CAD शी संबंधित मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाणही गेल्या ३० वर्षांमध्ये दुपटीने वाढले आहे. भारतीयांमध्ये बरेचदा अंजायनाच्या सर्वसाधारण लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे निदान चुकू शकते. अशा लक्षणांमध्ये धाप लागणे, खूप घाम येणे, छातीत जळजळणे, मळमळणे किंवा स्टेबल अंजायना म्हणजे भावनिक किंवा शारीरिक ताणतणावांमुळे किंवा व्यायामाचे निमित्त धरून सुरू होणारी छातीतील वेदना यांचा समावेश होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जबडा किंवा मान दुखणे, थकून जाणे आणि छातीखेरीज शरीराच्या इतर भागांमध्ये अस्वस्थता जाणवणे यांसारखी असाधारण लक्षणे दिसून येण्याची शक्यता अधिक असते, ज्यांच्यामुळे अचूक निदान करण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. परिणामी डॉक्टर्सकडून केवळ लक्षणांपासून आराम मिळण्यासाठीची औषधे लिहून दिली जातात आणि त्यामागे असलेल्या अंजायनाच्या खऱ्या कारणांची चिकित्सा होत नाही. त्यातही आपल्याला जाणवणाऱ्या लक्षणांना रुग्णांकडून नाकारले जाते तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट बनते.
अंजायनाची समस्या लवकरात लवकर ओळखली जाणे हे उपचार सुरू करण्यासाठी आणि आजार बळावण्याची प्रक्रिया धीमी करण्यासाठी, लक्षणे दूर करण्यासाठी व अधिक गंभीर कार्डिअॅक घटनांचा धोका कमी करण्यासाठी आणि त्यापायी होणारा औषधोपचारांचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन अबॉटने अंजायनाचे निदान, साध्यासाध्यतेचा विचार व वैद्यकीय व्यवस्थापन यांना पाठबळ देण्यासाठी अनुक्रमे OPTA क्लिनिकल चेकलिस्ट, OPTA क्वेश्चनेअर आणि OPTA अप्रोच अशी तीन आगळीवेगळी साधने विकसित केली आहेत. या OPTA साधनांचा क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये वापर करण्याची शिफारस API ने केल्याने ही साधने आरोग्यकर्मींना वेळच्यावेळी निदान करण्यास मदत करू शकतील, जे या आजाराचे इष्टतम व्यवस्थापन करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.
API चे अध्यक्ष डॉ. मिलिंद वाय नाडकर म्हणाले, “भारतीयांना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांची लागण पाश्चिमात्य देशांपेक्षा दशकभर आधी येतो. म्हणूनच हा आजार लहान वयात सुरू होण्याच्या व तो वेगाने बळावण्याच्या समस्येवर वेळच्या वेळी काम करणे अत्यंत महत्तवाचे ठरते. आणि जगभरात कोरोनरी आर्टरी आजारांचे सर्वाधिक रुग्ण आपल्या देशात नोंदवले जात असताना अंजायनासारख्या भारतीयांवर सरसकटपणे परिणाम करणाऱ्या मात्र बहुतेकदा दुर्लक्षित राहून जाणाऱ्या लक्षणांविषयी अधिक जागरुकता घडवून आणणे अत्यावश्यक आहे. विविध उपाययोजना आणि साधनांच्या माध्यमातून देशाच्या जनरल प्रॅक्टिशनर्सना आणि कार्डिओलॉजिस्ट्सना पाठबळ पुरवित प्रभावी निदान आणि आजार व्यवस्थापनाला बळकटी देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
अबॉट इंडियाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. अश्विनी पवार म्हणाल्या, “अंजायना ही आजही भारतातील सर्वाधिक दुर्लक्षित व निदानावाचून राहून जाणारी स्थिती आहे. परिणामी अनेकांना इष्टतम उपचार मिळू शकत नाहीत. कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा वाढता भार पाहता तसेच २०१२ आणि २०३० दरम्यान या आजाराशी संबंधित खर्चाचा देशावर पडलेला भार सुमारे २.१७ ट्रिलियन यूएस डॉलर्सiv इतका असता हे आव्हान हाताळणे महत्त्वाचे आहे. अंजायनाचे लवकरात लवकर निदान होण्यास व त्याच्या इष्टतम व्यवस्थापनास मदत करण्यासाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या पाठबळाने ‘अंजायना जागरुकता सप्ताहा’च्या शुभारंभाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”
यावेळी डॉ. पवार यांनी अंजायना आणि कोरोनरी आर्टरी आजारांवरील परिसंवादाचे सूत्रसंचालन केले, ज्यात डॉ. मिलिंद नाडकर तसेच मुंबईचे ज्येष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. व्ही. टी. शाह आणि API चे जनरल सेक्रेटरी डॉ. अगम व्होरा अशा मान्यवर वक्त्यांचा समावेश होता.
आरोग्यकर्मीनी आजाराच्या धोक्याचे अधिक वेगाने निदान करण्यासाठी आणि सर्वसमावेशक व्यवस्थापन योजनेचे पालन करण्यासाठीच्या साधनांचा स्वीकार करण्याची गरजही शिफारस करण्यात आलेल्या कृतीआराखड्यामध्ये ठळकपणे मांडण्यात आली आहे. याखेरीज, मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धती आणि रुग्णाच्या अखंड संपर्कात राहण्यासाठीची कनेक्टेड देखभालीची साधने व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर करणारी निदानतंत्रे यांसारख्या उपकरणांचा वापरही रोगाचे लवकरात लवकर निदान, त्यावरील देखरेख आणि उपचारांचे व्यक्तिविशिष्ट पर्याय शोधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. या थेरपीजमुळे रुग्णाची तब्येत पूर्ववत होण्यासाठीचा वेळ कमी व्हायला मदत होईल, गुंतागुंतीचे प्रमाण कमीत-कमी असेल आणि रुग्णाला उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळतील. थोडक्यात, प्रगत तंत्रज्ञान, हृदयाच्या आरोग्याविषयीची वाढती सजगता आणि भारतातील आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधांमध्ये होणारे बदल यामुळे भारतामध्ये कार्डिअॅक आजारांच्या उपचारांचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे.

Related posts

आयएलटी 20 तिसऱ्या आवृत्तीसाठी जागतिक क्रिकेट स्टार्सच्या साहाय्याने सज्ज

Shivani Shetty

गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

Shivani Shetty

सर्वांगीण ईव्‍ही इकोसिस्‍टमच्‍या विकासाला ‘ऑडी इंडिया’चे प्राधान्‍य

Shivani Shetty

Leave a Comment