गुरूग्राम, भारत – जून, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएम ब्रँडची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडसोबत सहयोगाने सॅमसंग वॉलेटवर फ्लाइट, बस, चित्रपट व इव्हेण्ट्स बुकिंग सेवा लाँच केल्या. या सहयोगाचा सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून विनासायास व एकीकृत बुकिंग अनुभव देत ग्राहकांच्या सोयीसुविधेमध्ये वाढ करण्याचा मनसुबा आहे, जेथे पेटीएमच्या माध्यमातून अनेक सेवा उपलब्ध होतील.
या सहयोगासह, गॅलॅक्सी स्मार्टफोन वापरकर्त्यांना आता सॅमसंग वॉलेटमध्ये समाविष्ट केलेल्या फ्लाइट व बस बुकिंग्ज, चित्रपट तिकिटांची खरेदी आणि इव्हेण्ट बुकिंग्ज अशा पेटीएमच्या सेवा विनासायास उपलब्ध होतील.
फ्लाइट, बस व चित्रपट बुकिंग्जसाठी पेटीएम अॅप आणि इव्हेण्ट बुकिंग्जसाठी पेटीएम इनसाइडर अॅपचा वापर करणारे गॅलॅक्सी स्मार्टफोन वापरकर्ते ‘अॅड टू सॅमसंग वॉलेट’ वैशिष्ट्याचा वापर करत प्रत्यक्ष सॅमसंग वॉलेटमध्ये त्यांची तिकिटे समाविष्ट करू शकतात. यामुळे विमानतळ, बस टर्मिनल्स, सिनेमा हॉल्स व इव्हेण्ट स्थळांमध्ये प्रवेश करताना सोईस्करपणे तिकिटे दाखवू शकतील. सॅमसंग इंडिया आणि पेटीएम लवकरच नवीन लाँच केल्या. या सहयोगाचा सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून विनासायास व एकीकृत बुकिंग अनुभव देत ग्राहकांच्या केलेल्या सेवांमध्ये पहिल्या बुकिंग्जवर जवळपास ११५० रूपयांच्या आकर्षक सूट ऑफर्स सादर करणार आहेत.
पेटीएम अॅप भारतीयांसाठी प्रवास व इव्हेण्ट बुकिंग्जकरिता पसंतीचे गंतव्य असल्यामुळे सॅमसंगसोबतचा त्यांचा सहयोग सोयीसुविधा वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांशी बांधील राहत वापरकर्त्यांना सेवांचा आनंद घेण्यासाठी नवीन मार्ग खुले करतो.
सॅमसंग इंडियाच्या पेटीएमसोबतच्या सहयोगामधून विनासायास व नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स देण्याप्रती सॅमसंगच्या कटिबद्धतेची पुष्टी मिळते, जेथे हे सोल्यूशन्स वापरकर्त्यांच्या डिजिटल गरजांची पूर्तता करणारे वापरण्यास सोपे, सुरक्षित प्लॅटफॉर्म सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या सोयीसुविधेमध्ये वाढ करतात.
”सॅमसंग वॉलेट भारतातील लोकप्रिय मोबाइल टॅप अँड पे सोल्यूशन आहे, जे २०१७ मध्ये लाँच झाल्यापासून सतत विकसित होत आहे. आम्हाला पेटीएमसोबत सहयोगाने सॅमसंग वॉलेटवर नवीन वैशिष्ट्ये लाँच करण्याचा आनंद होत आहे. ही वैशिष्ट्ये गॅलॅक्सी स्मार्टफोन वापरकर्त्यांना बस व विमान तिकिटे, तसेच चित्रपट व इव्हेण्ट तिकिटे सहजपणे खरेदी करण्याची सुविधा देतात, ज्यासाठी विविध अॅप्समध्ये जाण्याची गरज भासत नाही. तसेच, वापरकर्ते त्यांच्या गॅलॅक्सी स्मार्टफोनच्या होम स्क्रिनवर स्वाइप करत ही तिकिटे मिळवू शकतात,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे वरिष्ठ संचालक मधुर चतुर्वेदी म्हणाले.
”मोबाइल पेमेंट्सचे अग्रणी असल्यामुळे आम्हाला भारतीयांना सोयीसुविधा व उच्च दर्जाचा युजर अनुभव देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग इंडियासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. पेटीएमच्या व्यापक सेवांसोबत सॅमसंगचे अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र करत आम्ही ग्राहकांना सिंगल युनिफाईड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या बुकिंग्ज व पेमेंट्सचे व्यवस्थापन सुलभ करण्याची सुविधा देत आहोत,” असे पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले.
उपलब्धता
सॅमसंग वॉलेट वापरकर्ते त्यांचे अॅप अपडेट करत नवीन सेवांचा लाभ घेऊ शकतात.
सॅमसंग वॉलेटवर नवीन प्रोग्राम्स व इतर ऑफर्स
सॅमसंग वॉलेट लवकरच रिफरल प्रोग्राम लाँच करणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळी नवीन युजरचा संदर्भ दिल्यास रेफरर आणि रेफरीला सॅमसंग वॉलेटवर यशस्वी नोंदणीनंतर अॅमेझॉनकडून १०० रूपयांचे गिफ्ट कार्ड मिळेल. याचा अर्थ असा की, सॅमसंग वॉलेटचा वापर करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना आवाहन केल्यास तुम्हाला जवळपास ३०० रूपये मिळू शकतात.
सॅमसंग वॉलेट टॅप अँड पे ऑफर
सॅमसंग वॉलेट सुरक्षित व सोईस्कर टॅप टू पे वैशिष्ट्य देते. सॅमसंग लवकरच सॅमसंग वॉलेट टॅप अँड पे ऑफरची घोषणा करणार आहे. वापरकर्ते मोबाइल टॅप अँड पे च्या माध्यमातून त्यांच्या पसंतीचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत पेमेंट करू शकतात. ऑफर कालावधीदरम्यान वापरकर्त्यांना चार टॅप अँड पे व्यवहार पूर्ण केल्यास २५० रूपयांचे अॅमेझॉनचे गिफ्ट कार्ड मिळेल.