maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोला इंडियाकडून १०० टक्‍के रिसायकल्‍ड पीईटी (आरपीईटी) बॉटल्‍ससह अफोर्डेबल स्‍मॉल स्‍पार्कलिंग पॅकेज (एएसएसपी) लाँच

नवी दिल्‍ली, १९ जून २०२४: कोका-कोला इंडिया कंपनी भारतातील पेय उद्योगाकडून १०० टक्‍के रिसायकल्‍ड पीईटी (आरपीईटी)च्‍या सादरीकरणाचे नेतृत्‍व केल्‍यानंतर चक्रिय अर्थव्‍यवस्‍था निर्माण करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक अर्थपूर्ण पाऊल उचलत आहे. कंपनीने २५० मिली बॉटल्‍समध्‍ये १०० टक्‍के रिसायकल्‍ड पीईटी (आरपीईटी)सह एएसएसपीमध्‍ये कोका-कोलाच्‍या लाँचची घोषणा केली आहे, ज्‍याची सुरूवात ओरिसा राज्‍यापासून झाली आहे.
कोका-कोलाची बॉटलिंग पार्टनर हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् प्रा. लि. (एचसीसीबीपीएल)द्वारे निर्मित या उपक्रमामधून कंपनीची शाश्‍वततेप्रती कटिबद्धता दिसून येते, जेथे कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासह पर्यावरणीय स्थिरतेला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.
समकालीन व्‍हर्जिन पीईटी पॅकेजिंगच्‍या तुलनेत एएसएसपीमध्‍ये (अफोर्डेबल स्‍मॉल स्‍पार्कलिंग पॅकेज) वजनाने हलक्‍या पीईटी मटेरिअलच्‍या माध्‍यमातून उत्‍सर्जन ३६ टक्‍क्‍यांनी कमी होते. तसेच, व्‍हर्जिन पीईटीला एएसएसपीमधील रिसायकल्‍ड पीईटीमध्‍ये रूपांतरित केल्‍याने कार्बनच्‍या प्रमाणामध्‍ये अधिक घट होते, जेथे व्‍हर्जिन पीईटीसह नॉन-एएसएसपी पॅकेजिंगच्‍या तुलनेत एकूण ६६ टक्‍के घट होते.
१०० टक्‍के आरपीईटी एएसएसपी लाँच करत हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)च्‍या सप्‍लाय चेनचे कार्यकारी संचालक अलोक शर्मा म्‍हणाले, ”एएसएसपीमध्‍ये रिसायकल्‍ड पीईटीचे सादरीकरण प्‍लास्टिक चक्रियकरणाच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्‍यामुळे एकूण कार्बन प्रमाणामध्‍ये मोठ्या प्रमाणात घट होते. हा उपक्रम शाश्‍वत पद्धती वाढवण्‍याप्रती आणि भारतातील पेय उद्योगासाठी हरित भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये नेतृत्‍व करण्‍याप्रती आमच्‍या व्‍यापक दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.”
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या टेक्निकल इनोव्‍हेशन आणि सप्‍लाय चेनचे उपाध्‍यक्ष एनरिक अॅकरमन म्‍हणाले, ”भारतात आरपीईटी विस्‍तारित करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नांमधून भारतातील ग्राहकांसाठी उच्‍च दर्जाचे, फूड-ग्रेड, रिसायकल केलेले प्‍लास्टिक मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या इको-फ्रेण्‍डली बॉटल्‍ससह आमचा पॅकेजिंगसाठी चक्रिय अर्थव्‍यवस्थेला गती देण्‍याचा, कचरा व कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याचा प्रयत्‍न आहे, ज्‍यामुळे आम्‍ही २०३० पर्यंत ५० टक्‍के रिसायकल केलेल्‍या घटकांसह बॉटल्‍स निर्माण करण्‍याचे वर्ल्‍ड विदाऊट वेस्‍टचे ध्‍येय पूर्ण करण्‍याच्‍या जवळ पोहोचू.”
कोका-कोला कंपनी ४० हून अधिक बाजारपेठांमध्‍ये १०० टक्‍के आरपीईटी बॉटल्‍स देते. महत्त्वाकांक्षी शाश्‍वत पॅकेजिंग उपक्रम वर्ल्‍ड विदाऊट वेस्‍टच्‍या लाँचसह २०३० पर्यंत विक्री होणारी बॉटल किंवा कॅनला गोळा करण्‍यासोबत रिसायकल करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. २०२५ पर्यंत जागतिक स्‍तरावर कंपनीचे १०० टक्‍के पॅकेजिंग रिसायक्‍लेबल करण्‍याचा आणि २०३० पर्यंत पॅकेजिंगमध्‍ये किमान ५० टक्‍के रिसायकल केलेल्‍या मटेरिअलचा वापर करण्‍याचा उद्देश आहे.

Related posts

‘गोल्ड सील ऑफ अप्रूव्हल®️’ मिळवणारे नवी मुंबईतील अपोलो पहिले रुग्णालय

Shivani Shetty

चार्ज्‍ड बाय थम्‍स अपकडून नवीन मोहिम लाँच, ज्‍यामध्‍ये आहेत आमिर खान आणि दर्शील सफारी

Shivani Shetty

लेक्ट्रिक्स ईव्हीने ‘एलएक्सएस २.०’ सादर केली

Shivani Shetty

Leave a Comment