maharashtraprimenews
ठळक बातम्या
Healthनवी मुंबईसार्वजनिक स्वारस्य

११ मुलांवर ११ तासांत ‘मॅरेथॉन हृदयरोग शस्त्रक्रिया’

नवी मुंबई, २० नोव्हेंबर 2022: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या अग्रगण्य व बहु-वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील ११ लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया ११ तासांत कोणत्याही विकृती शिवाय आणि जीवाला धोका न होता पार पडली. ४ ते १३ वर्षे वयोगटातील या ११ मुलांना जन्मापासूनच हृदयविकार होता. या रोगावर उपचार केला नसता तर कुपोषण आणि दीर्घकालीन गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) योजनेअंतर्गत देखील रुग्णांना उपचार प्रदान करते. आरबीएसके योजनेअंतर्गत जिल्हा वैद्यकीय अधिकारी जन्मजात हृदयविकार असलेल्या लहान मुलांना हेरतात आणि त्यांची तपासणी करतात त्याचबरोबर तज्ञ डॉक्टर निदानाची पुष्टी करतात आणि त्यांच्यावर उपचार करतात. रुग्णांना दिले जाणारे उपचार या योजनेंतर्गत समाविष्ट केले जातात, त्यामुळे उपचारांवर होणारा खर्च खूपच कमी होतो आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळतो.

डॉ. भुषण चव्हाण, पॅडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,”सप्टेंबरमध्ये आमच्या टीमने वाशिम सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तिथे आम्ही जन्मजात हृदयविकार असल्याची शंका असलेल्या १२० मुलांची इकोकार्डिओग्राफी केली. १२० मुलांपैकी ३५ मुलांना जन्मजात हृदयविकार होता. ३५ पैकी ४०% मुलांवर अँजिओग्राफीद्वारे उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल्सची अनुमती घेऊन मुलांना अँजिओग्राफी डिव्हाइस क्लोजरच्या प्रक्रियेसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे आणण्यात आले’’.

प्रक्रियेच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक अशाप्रकारे शस्त्रक्रिया पार पाडली. ११ पैकी ५ मुलांना पेरी-मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर रोग झाला होता, हा रोग आव्हानात्मक होता तरी देखील शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडलीच. मुलांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले. या दरम्यान कोणतीही प्रतिकूल घटना घडली नाही आणि संपूर्ण शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आता या मुलांना पहिल्या महिन्याच्या अखेरीस आणि ६ महिन्यांनंतर पाठपुरावा करण्यासाठी भेट द्यावी लागणार आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रक्रियेची आवश्यकता नाही. उर्वरित मुलांवर देखील नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार केले जाणार आहेत.

श्री संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ-पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “आमच्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही ३५० हून अधिक लहान मुलांच्या हृदयविकारांची प्रकरणे हाताळली आहेत, ज्यापैकी ४०% आंतरराष्ट्रीय रुग्ण होते. आम्ही ६० प्रकरणांत कोणतेही पैसे घेतले नाहीत व विनामूल्य सेवा दिली. सर्व ११ मुलांना आता सोडण्यात आले असून त्यांच्यात कोणतीही गुंतागुंत दिसून आली नाही व आता ते वाशिममधील आपल्या घरी सुखरुप आहेत. ज्या मुलांना उपचारांची सर्वात अधिक गरज होती त्यांना आम्ही मदत करु शकलो आणि त्यांना उपचार देऊ शकलो यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. एका पाठोपाठ ११ शस्त्रक्रिया करण्यासाठी आमच्या टीमला खूप नियोजन व कठोर परिश्रम करावे लागले. हा अनोखा पराक्रम आमच्या रुग्णालयातील अनुभवी चिकित्सक आणि कुशल वैद्यकीय टीममुळेच शक्य झाला आहे.”

Related posts

एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी पण शेवटी शरद पवारांनी कॅच पकडलाच…!

cradmin

ACETECH मुंबई 2022 मध्ये विसाका इंडस्ट्रीजचे भव्य शोकेस

Shivani Shetty

आचार्य प्रशांत ‘मोस्ट इन्फ्लूएन्शियल वेगन’ पुरस्काराने सन्मानित

Shivani Shetty

Leave a Comment