maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्यातंत्रज्ञानमुंबईव्यवसायसार्वजनिक स्वारस्य

मुंबईत १७ नोव्हेंबरपासून ‘एशिया कोट इंक’ प्रदर्शनी

मुंबई दि. १५ (प्रतिनिधी) : वर्तमानपत्र आणि इतर मुद्रण क्षेत्राशी संबंधित ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांच्या यजमानपदाखाली येत्या १७, १८, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी नेस्को मुंबई प्रदर्शन केंद्र येथे ‘एशिया कोट + इंक’ या प्रदर्शन आणि व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा आयोजक संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. एआयपीआयएमएचे अध्यक्ष श्री राघवन श्रीधरा उपाध्यक्ष राघव राव, आशिया कोट इंक शोचे सचिव रवींद्र गांधी उपस्थित होते. यावेळी मुद्रण व्यवसाय व शाई उद्योग यांच्यातील अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. जागतिक शाई बाजारपेठ अंदाजे १५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (संदर्भ – इंक वर्ल्ड) घरात जाणारी आहे. त्या तुलनेत भारतीय शाई बाजारपेठेचे आकारमान अंदाजे १ अब्ज डॉलर (संदर्भ – प्रिंट वीक) इतके आहे अशी माहिती एआयपीआयएमएचे उपाध्यक्ष अध्यक्ष श्री राघवन श्रीधरा यांनी यावेळी दिली.

यावेळी भाष्य करताना एआयपीआयएमएचे अध्यक्ष श्री राघवन श्रीधरा म्हणाले की, “योगायोगाने, यावेळी जगभरातील मुद्रण शाई उत्पादक हे कच्चा माल आणि शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत. कारण युरोपातील भू-राजकीय तणाव आणि डगमगलेल्या आर्थिक परिस्थितीत, चीनला एक प्रभावी आणि विश्वासार्ह अशा पर्यायाचा शोध घेणे हे संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त ठरले आहे. विशेषत: उत्पादन दर्जा राखला जाण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये गुंतवणुकीसाठी पाठबळ देण्याचे प्रयत्न आहेत.” १९९० च्या उत्तरार्धापर्यंत, भारतात फक्त एक बहुराष्ट्रीय शाई उत्पादन कंपनी होती, परंतु गेल्या २५ वर्षांत अनेक युरोपीय, जपानी आणि अमेरिकी प्रिंटिंग इंक आणि कोटिंग उत्पादकांनी भारतात प्रवेश केला आहे.” सुमारे ३०० शाई उत्पादक संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत ज्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली (एनसीआर), तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात आहे. शाई उद्योगाद्वारे झालेली रोजगार निर्मिती ही ‘एआयपीआयएमए’च्या अंदाजानुसार, सुमारे १००,००० असून आणखी सुमारे १२०,००० लोकांना यातून नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. देशातील संपूर्ण मुद्रण उद्योग जवळपास १५ कोटी लोकांना रोजगार देतो, तसेच वर्तमानपत्र, मासिके, खाद्य पॅकेजिंग आणि सर्व प्रकारच्या पॅकेजिंगच्या छपाईसह मुद्रण शाईच्या गुणवत्तेची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यास भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते.

Related posts

हर सर्कल आणि कल्की नेट-झिरो स्थायी कवरशूटसाठी एकत्र आले*

Shivani Shetty

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी शाश्वत भविष्यासाठी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल व्यवसायांना संवेदनशील करणार

Shivani Shetty

YRF ने टायगर 3 चे पहिले पोस्टर लाँच केले, टायगर जिंदा है, वॉर आणि पठान च्या इव्हेंटना फॉलो करतो

Shivani Shetty

Leave a Comment