मुंबई, २ डिसेंबर २०२२: भारत हा उत्सुक प्रवासी असलेला देश आहे असेकायक (KAYAK) या जागतिक अग्रगण्य ट्रॅव्हल सर्च इंजिनच्या नवीनग्राहक संशोधनामधून निदर्शनास आले. दोन–तृतीयांश (६४ टक्के) भारतीयपर्यटक म्हणतात की ते २०२३ मध्ये संपूर्ण विश्व पाहता येण्यासाठी दैनंदिनखर्च कमी करण्यास तयार आहेत.
YouGov (यूगोव)ने केलेल्या कायक संशोधनाने १,९०० हून अधिक भारतीयप्रवाशांचे सर्वेक्षण केले आणि त्यामधून निदर्शनास आले की, महामारीकारणास्तव प्रवासावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सध्या पर्यटनाप्रतीकल वाढला आहे, जेथे तीन–चतुर्थांश (७८ टक्के) प्रतिसादक २०२३ मध्येपुन्हा पर्यटनावर जाण्यास उत्सुक आहेत.
भारतीयांमध्ये पर्यटनाप्रती पुन्हा जागृत झालेल्या इच्छेसाठी संपूर्ण विश्वपाहणे (६२ टक्के) हे प्रमुख कारण ठरले, ज्यानंतर स्वत:ची स्वप्ने जगणे (६१टक्के), थरारांचा आनंद घेणे (५५ टक्के), धमाल करणे (४८ टक्के) आणिचिंता दूर करण्यासाठी पर्यटनावर जाणे (४३ टक्के) यांचा क्रमांक होता.
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ६० टक्के प्रतिसादक स्वत:ला जिज्ञासूपर्यटक मानतात. उत्सुकतेमधून देखील अधिक संपन्न अनुभव मिळतो. ७५टक्के प्रतिसदकांनी नवीन व ऑफबीट ठिकाणी जात स्वत:ची उत्सुकता पूर्णकेली. ७३ टक्के प्रतिसदकांनी सांगितले की त्यांनी पर्यटनावर फूडचाआस्वाद घेण्याचा नवीन अनुभव घेतला. ७० टक्के प्रतिसादक मागीलट्रिप्सदरम्यान नवीन लोकांना भेटले आणि विभिन्न संस्कृतींमधील मित्रबनवले.
कायक येथील एपीएसीच्या उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक एलिया सॅनमार्टिन म्हणाल्या, “पर्यटकांच्या उत्सुकतेबाबत आम्ही सखोल केलेल्यासंशोधनामधून या उत्साहवर्धक निष्पत्ती समोर आल्या आहेत. भारतीयपर्यटक मनसोक्तपणे हॉलिडेजचा आनंद घेण्यासाठी अधिक खर्च करण्यासतयार असण्यासोबत साहसी ट्रिप्सचा आनंद घेण्यासाठी देखील उत्सुक आहे, मग ते स्थानिक पाककलांचा आस्वाद घ्यायचा असो, नवीन संस्कृतींनापाहायचे असो किंवा कमी ज्ञात ठिकाणी जायचे असो. आमच्या डेटामधूननिदर्शनास येते की, भारतीय पर्यटक त्यांच्या पर्यटन आठवणींना संपन्नकरण्याबाबत अधिक उत्सुक आहेत आणि हीच बाब पुढील वर्षासाठीफ्लाइट शोधांमध्ये झालेल्या २०४ टक्के वाढीमधून दिसून येते. ते पुन्हाएकदा संपूर्ण विश्वामध्ये प्रवास करण्याच्या संधीचा लाभ घेत आहेत, तसेचजागरूकपणे उत्तम डील्स व शाश्वत पर्यटन निवडींचा देखील शोध घेतआहेत.’’
भारतीय पर्यटक खर्च व शाश्वतताला प्रमुख प्राधान्य देतात:
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी जवळपास निम्मे (४९ टक्के) प्रतिसादकमहामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता अधिक खर्च करण्यासाठी योजनाआखत असताना किंवा त्यांच्या पर्यटनासाठी देखील अधिक खर्च करण्यासतयार असताना व्हॅल्यू फॉर मनी इतर घटकांना मागे टाकते. सर्वेक्षणकरण्यात आलेल्या भारतीय पर्यटकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक पर्यटकफ्लाइट्स व हॉटेल्स बुक करताना या बाबीला सर्वाधिक प्राधान्य देतातआणि ८० टक्के पर्यटक वर्ष २०२३ मध्ये पर्यटनासाठी ४ लाख रूपये किंवात्यापेक्षा कमी खर्च करण्यास उत्सुक आहेत. यानंतर बुकिंगच्या संदर्भातस्वच्छता व स्थिरता यांचा विचार केला जातो.
भारतीय पर्यटकांच्या हॉलिडे प्लान्ससाठी शाश्वतता हा देखील महत्त्वपूर्णघटक आहे. ४३ टक्के प्रतिसादक म्हणतात की २०२३ मध्ये त्यांच्या समरहॉलिडेसाठी शाश्वतता प्रमुख निकष असेल. तसेच ४० टक्के प्रतिसादकत्यांच्या शाश्वततेसाठी ओळखले जाणाऱ्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचीयोजना आखतात. पृथ्वी व संसाधनांवर किमान परिणाम करणाऱ्या ट्रिप्सचेनियोजन करण्यामधून प्रेरणा घेत सर्वेक्षण करण्यात आलेल्या भारतीयपर्यटकांपैकी ४८ टक्के पर्यटक पर्यावरणास अनुकूल निवास व्यवस्था बुककरतील, तर ४४ टक्के पर्यटक परिवहनाच्या अधिक शाश्वत माध्यमांचाअवलंब करतील.