कामधेनू एनएक्सटी’ यांच्या प्रमुख सहकार्याने सुप्रसिद्ध ब्रँड स्ट्रॅटेजी कन्सल्टन्सी ‘नेक्सब्रँड इंक’ने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नुकतेच आपल्या ७ व्या ‘ब्रँड व्हिजन समिट २०२३’चे आयोजन केले होते. या शिखर परिषदेचे असोसिएट पार्टनर ‘इनजेक्स बोटॅनिकल’ (Ingex Botanicals) ही कंपनी होती तर सस्टेनिबिलिटी पार्टनर म्हणून ‘कॉन्सायंट इनिशिएटिव्ह्ज’, अॅम्बियंट मीडिया पार्टनर म्हणून ‘एआरटी मीडिया आर्ट्स’, आऊटडोअर पार्टनर म्हणून ‘खुशी अॅडर्व्हाटायजिंग आयडियाज’ व डिजिटल आउटरिच पार्टनर म्हणून ‘सिटी इन्होव्हेट्स’ यांनी काम पाहिले. हा शानदार सोहळा मुंबईतील सहारा येथील आयटीसी मराठा या हॉटेलमध्ये पार पडला. या वार्षिक शिखर परिषदेत देशाच्या प्रगतीमध्ये आपले उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्योजक-व्यावसायिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या शिखर परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य, एखाद्या व्यवसायातील यशाला अधोरेखित करून या यशाच्या पलिकडे जाऊन व्यवसायाची व्याख्या नव्याने पुनर्भाषित करणे हा आहे. ज्या उद्योगांनी आपल्या व्यवसायाच्या सीमा ओलांडून केवळ ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून यश मिळवले आहे, अशा दिग्गज उद्योजकांचा सत्कार करणे ही या परिषदेमागची खरी कल्पना आहे.
‘नेक्सब्रँड्स इंक’च्या प्रतिष्ठित उद्योगांच्या यादीमध्ये अशा विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा समावेश आहे की, ज्यांनी आपल्या उद्योगाची यशस्वी व्यवसाय उभारणी करून या उद्योगात आपली असाधारण प्रतिभा, सर्जनशीलता व दृष्टेपणा दाखवून हा व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेला आहे. हे गुणवान उद्योजक कोणत्याही लाटेची मदत न घेता आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवत नाहीत तर आपल्या सामाजिक व व्यावसायिक आव्हानांचा सामना करत अशा आव्हानांना तोंड देत आपल्या व्यवसायात नाविन्यता आणत भारतीय अर्थजगतात आपले अमूल्य योगदान देत आहेत.
दुसऱ्या जागतिक मंदीच्या काळात ‘नेक्सब्रँड्स’ची दुसरी शिखर परिषद भरली होती. त्यावेळेपासून ही परिषद महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी प्रेरणा देणारी आणि भारताच्या भविष्याला आकार देणाऱ्या तरुण आणि गतिमान उद्योजकांच्या यशाचा उत्सव म्हणून काम करत आहे. २०१५ साली या परिषदेची मुख्य संकल्पना प्रस्थापित आल्यापासून, ही ब्रँड व्हिजन समिट देशातील सर्वात उल्लेखनीय व्यासपीठांपैकी एक म्हणून गणली जात असून देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजक, व्यावसायिकांसाठी हे एक व्यासपीठ झाले आहे.
नेक्सब्रँड्सच्या ७ व्या शिखर परिषदेत प्रमुख चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी ‘ब्रँड इंडियाः नव्या लाटेचे स्वागत’ या विषयसत्रात श्री. धवल अजमेरा (अजमेरा रिअॅलिटी अँड इन्फ्रा इंडिया), श्री. सुनील अग्रवाल (कामधेनू समूह), डॉ. अजिंक्य डीवाय. पाटील (अजिंक्य डीवाय पाटील समूह), श्री. मनीष शर्मा (प्युअर सॉफ्टवेअर), श्री. सौद मोहम्मद (इंजेक्स बोटॅनिकल्स) या उद्योजक मान्यवरांनी भाग घेतला.
दुसरे सत्र ‘टॅलेंट डेव्हलपमेंट, डीईअँडआय, सर्विंग कम्युनिटी अँड प्लॅनेट’ या विषयावर झाले. या सत्रात श्री. माधव थापर (सी. एच. रॉबिनसन) यांच्याशी गप्पा झाल्या.
तर तिसरे सत्र ‘ब्रँडिंग अँड रेप्युटेशन इन द न्यू डिजिटल एज’ या विषयावर झाले. या सत्राचे संचालन श्री. डी. शिवकुमार (अॅडवेंट इंटरनॅशनल) यांनी केले.
यंदाच्या वर्षी भारतातील कॉर्पोरेट आणि मनोरंजन क्षेत्रांमधील गुणवान व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. यात मलायका अरोरा, अपारशक्ती खुराणा, चित्रांगदा सिंग, डी. शिवकुमार, मनीष मल्होत्रा, सनी लिओन, दिया मिर्झा, रणदीप हुडा, नुसरत भरुछा, वाणी कपूर, स्मृती मानधना, राधिका मदन, सुरवीन चावला, जिम सर्बाह, अदिती राव हैदरी, प्राजक्ता कोळी, संजना संघी, सैयामी खेर, अनन्या बिर्ला, रोहिणी अय्यर आणि सुहानी शाह यांना सन्मानित करण्यात आले.
या शिखर परिषदेला महत्त्वाच्या पाहुण्यांची उपस्थिती होती. त्या निमित्ताने रेड कार्पेटवर दिग्गज पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्पिता शर्माने केले. या सोहळ्याच्या अखेरीस पाहुण्यांसाठी कॉकटेल्स, भव्य बुफे असे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातही अनेक मान्यवरांनी आपले मते व्यक्त केली.
या शिखर परिषदेतील ‘बिझनेस अँड बियॉन्ड एडिशन’चा भाग म्हणून, गोदरेज अँड बॉयस, हिंदवेअर स्मार्ट अप्लायन्सेस, लिव्हपूर, कामधेनू ग्रुप, हर्बलाइफ, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, अॅपेरल ग्रुप, इंजेक्स बोटॅनिकल, रुबन मेमोरियल हॉस्पिटल, सीएच रॉबिन्सन, ट्रायम्फ इंटरनॅशनल, कॉन्सेप्ट मेडिकल, मिडलँड मायक्रोफिन, जेमपंडित, सावी एक्स्पोर्ट्स, आयसीएफएआय युनिव्हर्सिटी, प्युरसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, फेनेस्टा, अजमेरा रियल्टी, ओमॅक्स लि., मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि., फनराइड टॉईज, बीसीएल इंडस्ट्रीज या उद्योजकांनी आपले ज्ञान व व्यावसायिक कौशल्य दाखवत सोहळ्याची शोभा वाढवली.
या शिखर परिषदेच्या निमित्ताने ‘ब्रँडव्हिजन’च्या संस्थापक व *‘नेक्सब्रँड्स’च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक चंद्रिका माहेश्वरी* म्हणाल्या की, “ भारतात विविध उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट नेतृत्वाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आम्ही ब्रँड व्हिजन समिट या व्यासपीठाची कल्पना केली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हे दिग्गज या व्यासपीठावर येतात आणि देशाच्या प्रगतीसाठी आपल्या यशस्वी व्यावसायिक मूलमंत्राची देवाणघेवाण करतात. मला आनंद आहे की आम्ही आमच्या देशातील काही अपवादात्मक गुणवानांचा सत्कार करू शकलो आहोत. उद्योगाचे व व्यवसायाचे नवे मार्ग शोधून या गुणवानांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यांची यशोगाथा साजरी करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत हे पाहणे आम्हाला खूप आनंद देते.”
याव्यतिरिक्त, *‘ब्रँड व्हिजन’चे सह-संस्थापक- आणि ‘नेक्सब्रँड्स’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सौरव दासगुप्ता म्हणाले,* की “ या परिषदेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही पुरस्कार विजेत्यांच्या यशोगाथेने उत्साहित झालो आहोत. आता देशाने यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घ्यावी, त्यांचे कौतुक करावे अशी आमची इच्छा आहे. हे गुणवान उद्योजक, व्यावसायिक आपल्या देशातल्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांचे प्रयत्न आम्ही समजून घेत आहोत, याचे आम्हाला समाधान वाटत आहे.
या परिषदेच्या निमित्ताने ‘कामधेनू ग्रुप’चे पूर्णवेळ संचालक सुनील अग्रवाल म्हणाले की, “यासारखे व्यासपीठ सन्मानितांना त्यांचे कार्य अधिक व्यापक आणि सखोलपणे नेण्यासाठी सक्षम बनवतात आणि अनेकांना अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देत राहतात. ‘कामधेनू ग्रुप’ हा अनेक गुणवान व्यक्तींना बनवला आहे ज्यांनी या ग्रुपला उंचीवर नेण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घेतली आहे. म्हणूनच अशा व्यासपीठावर ब्रँड किंवा व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी किती घाम गाळावा लागतो व मेहनत करावी लागते हे आम्हाला समजते.