maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील व्यावसायिकांसाठी त्यांची कौशल्ये विकसित करण्याचा नवीन मंत्र: लिंक्‍डइन (LinkedIn)

भारत, १८ जून २०२४: सध्‍याच्‍या एआय युगामध्‍ये व्‍यावसायिकांनी त्‍यांचे करिअर प्रगत करण्‍यासाठी नवीन कौशल्‍ये शिकणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. पण, जगातील सर्वात मोठे व्‍यावसायिक नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, व्‍यावसायिकांना त्‍यांच्‍या अध्‍ययन प्रवासामध्‍ये
अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. भारतातील ८० टक्‍के व्‍यावसायिक म्‍हणतात की, त्‍यांची कंपनी अध्‍ययन संस्‍कृती निर्माण करण्‍यासाठी पुरेशी कामगिरी करत आहे. असे असले तरी या संशोधनाच्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की १० पैकी ९ (९४ टक्‍के) व्‍यावसायिकांना काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणाला प्राधान्‍य देणे अवघड जात आहे.

सामना केले जाणारे सर्वाधिक अडथळे आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक कटिबद्धतांमुळे वेळ देता न येणे (३४ टक्‍के), कामाचे व्‍यस्‍त वेळापत्रक (२९ टक्‍के) आणि उपलब्‍ध असलेल्‍या अधिक प्रमाणातील अध्‍ययन संसाधनांमुळे गोंधळून जाणे (२६ टक्‍के).

*व्यावसायिक अपस्किलिंगमधील अडथळ्यांवर मात करण्‍यासाठी लाऊड लर्निंगला प्राधान्‍य देत आहेत*

कामाच्‍या ठिकाणी अध्‍ययन महत्त्वाकांक्षांबाबत बोलण्‍याचे व जाणून घेण्‍याचे कृत्‍य ‘लाऊड लर्निंग’ या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी उदयोन्‍मुख सोल्‍यूशन ठरले आहे. भारतातील १० पैकी ८ (८१ टक्‍के) व्‍यावसायिक म्‍हणतात की, हा सराव त्‍यांना त्‍यांची कौशल्‍ये सुधारण्‍यासाठी वेळ देण्‍यास मदत करू शकतो.

भारतातील प्रोफेशनल्स ‘लाऊड लर्निंग’संदर्भात अवलंबत असलेले टॉप ३ मार्ग पुढीलप्रमाणे: १. सहकाऱ्यांसोबत अध्‍ययन शेअर करणे (४० टक्‍के), २. लिंक्‍डइनवर त्‍यांचा अध्‍ययन प्रवास किंवा उपलब्‍धी शेअर करणे (४० टक्‍के) आणि ३. टीममधील सदस्‍यांना त्‍यांच्‍या अध्‍ययन वेळेबाबत माहिती देणे (३५ टक्‍के). उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे भारतातील ६४ टक्‍के व्‍यावसायिक आधीच ‘लाऊड लर्निंग’मध्‍ये सामील आहेत.

भारतातील १० पैकी आठ (८१ टक्‍के) व्‍यावसायिक म्‍हणतात की, ‘लाऊड लर्निंग’मध्‍ये त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचा सहभाग पाहण्‍यामधून ते देखील तसे करण्‍यास प्रेरित होतील. आपल्‍या अध्‍ययन अनुभवांची पूर्तता करण्‍यासंदर्भात भारतातील ६४ टक्‍के व्‍यावसायिक म्‍हणतात की त्‍यांचा मित्र लर्निंग बीएफएफ आहे, जो त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासह त्‍यांच्‍यासोबत शिक्षण घेतो, संपूर्ण अध्‍ययन अनुभव अधिक मजेशीर व प्रभावी करतो, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या अध्‍ययन ध्‍येयांशी बांधील राहण्‍यास मदत होते.

*व्‍यावसायिक त्‍यांचे करिअर प्रगत करण्‍यासाठी लाऊड लर्निंगचा लाभ घेत आहेत*

लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील ७९ टक्‍के व्‍यावसायिकांचा विश्‍वास आहे की ‘लाऊड लर्निंग’मध्‍ये सामील झाल्‍यास त्‍यांचे करिअर घडवण्‍यास मदत होऊ शकते. काही फायदे आहेत मेन्‍टोरशीपसाठी संधी व अनुभवी व्‍यावसायिकांकडून मार्गदर्शन (२८ टक्‍के), नवीन करिअर संधी किंवा प्रगती करण्‍याचे मार्ग खुले (२७ टक्‍के) आणि सहकाऱ्यांसोबत ज्ञान व माहितीची देवाणघेवाण (२६ टक्‍के).

*लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी* (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert & Senior Managing Editor) म्‍हणाल्‍या, “लिंक्‍डइन डेटानुसार, भारतात रोजगासाठी आवश्‍यक कौशल्‍ये २०३० पर्यंत ६४ टक्‍क्‍यांनी बदलण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे व्‍यावसायिकांनी लर्निंगवर अधिक लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. ‘लाऊड लर्निंग’ हे उत्तम हॅक आहे, ज्‍याचा उपयोग करून ते अध्‍ययनासाठी वेळ देताना सामना कराव्‍या लागणाऱ्या आव्‍हानांवर मात करू शकतात. ‘लाऊड लर्निंग’मध्‍ये सामील होत तुम्‍ही स्‍वत:च्‍या अध्‍ययन प्रवासाला प्राधान्‍य देण्‍यासोबत इतरांना देखील कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी वेळ देण्‍याप्रती प्रेरित कराल.”

लिंक्‍डइन व्‍यावसायिकांना त्‍यांच्‍या अध्‍ययन प्रवासाला गती देण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन एआय समर्थित प्रीमियम टूल्‍स देखील सादर करत आहे. लिंक्‍डइन लर्निंगचे नवीन एआय-समर्थित कोचिंग व्‍यावसायिकांना कोर्स अनुभवासंदर्भात मार्गदर्शन करण्‍यास मदत करू शकते, जेथे लर्नर्स कन्‍टेन्‍टचे सारांश किंवा प्रश्‍नांचे स्‍पष्‍टीकरण विचारू शकतात. तसेच त्‍यांना प्रत्‍यक्ष कोर्स पेजेसमधून रिअल टाइम माहिती व मार्गदर्शन मिळू शकते. एआयद्वारे समर्थित लिंक्‍डइनचे तज्ञ लर्नर्स निवडक प्रशिक्षकांसोबत वापरण्‍यास सोप्‍या चॅट इंटरफेसमध्‍ये संवाद साधण्‍याची आणि त्‍वरित वैयक्तिकृत व कृतीशील सल्‍ला प्राप्‍त करण्‍याची सुविधा देतात.

लिंक्‍डइनने मोफत लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेससह एआय केंद्रित कोर्सेस् देखील अनलॉक केले आहेत, जसे Building AI Literacy व Advancing Your Skills in Deep Learning and Neural Networks, तसेच करिअर प्रगत करण्‍याला साह्य करणारे कोर्सेस् आहेत, जसे Beating Procrastination व Project Management Foundations. हे कोर्सेस् ८ जुलै २०२४ पर्यंत उपलब्‍ध आहेत.

व्‍यावसायिक कशाप्रकारे लर्निंगला प्राधान्‍य आणि वेळ देऊ शकतात यासंदर्भात निराजिता यांच्‍या लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स पुढीलप्रमाणे:

*●बोला आणि शिकण्‍यासाठी वेळ द्या:* बोलण्‍यासह शिकण्‍यासाठी वेळ देणे फायदेशीर ठरू शकते. कॅलेंडरवर वेळेची नोंद करणे हा शिकण्‍यासाठी वेळ देण्‍यासोबत इतरांना तुम्‍ही त्‍याचे पालन करत असल्‍याचे पाहण्‍याचा सोपा मार्ग आहे. तुम्‍ही अध्‍ययनासाठी दिवसातून फक्‍त १५ मिनिटे वेळ देत सुरूवात करू शकतात आणि यामुळे तुम्‍हाला ध्‍येयाच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यास मदत होऊ शकते.

*● कामाच्‍या ठिकाणी व लिंक्‍डइनवर तुमच्‍या अध्‍ययन प्रवासाबाबत अपडेट्स पोस्‍ट करा* : तुमचा अध्‍ययन प्रवास शेअर केल्‍याने इतरांना प्रेरणा मिळू शकते. तुमची अध्‍ययन प्रगती आणि तुमचे सहकारी व लिंक्‍डइन नेटवर्कसोबत अडथळ्यांवर कशाप्रकारे मात करू शकता याबाबत माहिती शेअर करा. यामुळे चर्चांना गती मिळण्‍यास मदत होऊ शकते आणि इतरांना अध्‍ययनाप्रती वेळ देण्‍यास प्रेरणा मिळू शकते.

*● लर्निंग बीएफएफसोबत मैत्री करा:* सहाय्यक लर्निंग बीएफएफ प्रक्रिया विनासायास, अधिक जबाबदारपूर्ण आणि आनंददायी करू शकतो. माहिती शेअर करा आणि संपूर्ण अध्‍ययन प्रवासादरम्‍यान प्रेरित राहण्‍यासाठी तुमच्‍या अध्‍ययन कटिबद्धतांशी बांधील राहा. लनिंग बीएफएफ तुम्‍हाला नवीन साधने व संसाधने सादर करत तुमचे लर्निंग टूलकिट वाढण्‍यास देखील मदत करू शकतो.

*● अध्‍ययन अनुभव अधिक निपुण करण्‍यासाठी एआयचा लाभ घ्‍या* : लिंक्‍डइनच्‍या नवीन एआय-पॉवर्ड कोचिंग (AI-powered coaching) मध्‍ये तुमच्‍या कोर्समध्‍ये मार्गदर्शन करण्‍यासाठी युजर-अनुकूल चॅट इंटरफेस आहे. तुमच्‍या अध्‍ययनामधील तफावतींबाबत सल्‍ला विचारा आणि कोर्सेसबाबत रिअल टाइम माहिती मिळवा. तुमचे शीर्षक, करिअर ध्‍येये आणि लिंक्‍डइन लर्निंगवर फॉलो करणाऱ्या कौशल्‍यांनुसार प्रत्‍येक प्रतिसादाचे वैयक्तिकरण केले जाईल, ज्‍यामुळे अपडेटेड राहण्‍याची खात्री घ्‍या.

*● लर्निंग समुदाय तयार करा:* ऑनलाइन कम्‍युनिटीज – लिंक्‍डइन ग्रुप्‍स (LinkedIn Groups) वरील चर्चांमध्‍ये सामील व्‍हा, जेथे समविचारी प्रोफेशनल्स एकत्र येऊन विविध विषयांबाबत माहिती शेअर करतात. तुम्‍ही विविध पैलूंचे देवाणघेवाण करण्‍यासाठी कोलॅबोरेटिव्‍ह आर्टिकल्‍स (collaborative articles) मध्‍ये देखील योगदान देऊ शकता.

Related posts

‘लव्ह कनेक्शन’ मोहिमेच्या परतीचा महासोहळा: व्हिएतजेटकडून व्हिएतनाममध्ये ५० भारती जोडप्यांसाठी मोफत फ्लाइट्सची ऑफर

Shivani Shetty

अॅबॉटच्‍या ‘हेल्‍दी लिव्हिंग: द रोल ऑफ व्हिटॅमिन सी’ सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, ३ पैकी २ ग्राहकांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यासाठी व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्सवर विश्‍वास आहे

Shivani Shetty

भारतातील द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यात वाढीसाठी ‘देहात’चा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment