maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हिरो मोटोकॉर्पच्‍या करिझ्मा एक्‍सएमआरला मिळाला १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद

या महिन्‍यापासून डिलिव्‍हरींना सुरूवात होणार
प्रिमिअम उत्‍पादन लॉन्‍चेसना मिळणारा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद कायम राखत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीला त्‍यांची नवीन लाँच करण्‍यात आलेली प्रमुख मोटरसायकल करिझ्मा एक्‍सएमआरसाठी १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद मिळाला आहे.
हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्‍सना करिझ्मा एक्‍सएमआरचे वितरण सुरू झाले आहे आणि या महिन्‍यात सणासुदीच्‍या काळामध्‍ये ग्राहकांना डिलिव्‍हरी देण्‍यास सुरूवात होईल.
हिरो करिझ्मा एक्‍सएमआर १,७२,९००/- रूपये या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये लाँच करण्‍यात आली आणि ग्राहकांच्‍या सुरूवातीच्‍या समूहासाठी बुकिंग्‍जना २९ ऑगस्‍ट २०२३ रोजी सुरूवात झाली आणि ३० सप्‍टेंबर २०२३ रोजी बंद झाली.
नवीन करिझ्मा एक्‍सएमआर आता १,७९,९००/- रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) या किमतीत उपलब्‍ध असेल आणि कंपनी लवकरच नवीन बुकिंग विंडोची घोषणा करणार आहे.
हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख व्‍यवसाय अधिकारी (इंडिया बिझनेस युनिट) श्री. रणजीवजीत सिंग म्हणाले, ”आम्‍हाला हिरो करिझ्मा एक्‍सएमआरला मिळालेला अविश्‍वसनीय प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. बुकिंग्‍जच्‍या उत्‍साहवर्धक आकडेवारीमधून ग्राहकांनी आमच्‍या प्रमुख मोटरसायकलवर दाखवलेला विश्‍वास व उत्‍साह दिसून येतो. लीजेण्‍ड निश्चितच आधुनिक, समकालीन स्वरूपामध्‍ये परतली आहे आणि ही मोटरसायकल ग्राहकांमध्‍ये अधिक लोकप्रिय होत आहे. आम्‍ही प्रत्‍येक करिझ्मा मालकाला अपवादात्‍मक प्रिमिअम राइडिंग अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि आम्‍हाला आगामी सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याचा विश्‍वास आहे.”
नवीन करिझ्मा एक्‍सएमआर तिच्‍या श्रेणीमधील सर्वात शक्तिशाली मोटरसायकल आहे, जी सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. मोटरसायकलमध्‍ये २१० सीसी लिक्विड कूल्‍ड डीओएचसी इंजिनची शक्‍ती, ६ स्‍पीड ट्रान्‍समिशन आहे. तसेच या मोटरसायकलमध्‍ये स्लिप व असिस्‍ट क्‍लच आणि ड्युअल चॅनेल एबीएस आहे.
आजच्‍या काळातील ग्राहक प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत, ज्‍यामुळे नवीन करिझ्मा एक्‍सएमआरमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट अॅडजस्‍टेबल विंडशील्‍ड, इंटेलिजण्‍ट इल्‍यूमिनेशन हेडलॅम्‍प्‍स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आहे, ज्‍यामधून अद्वितीय मोटरसायकलिंग अनुभवाची खात्री मिळते.
संपन्‍न एर्गोनॉमिक्‍स, स्‍पोर्टी गतीशीलता, आरामदायी व डायनॅमिक कार्यक्षमतेसह नवीन करिझ्मा एक्‍सएमआरमध्‍ये २१० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्‍ट्याचा समावेश आहे. या मोटरसायकलमध्‍ये स्‍पोर्टी विशिष्‍टता व टूरिंग क्षमतांचे वैविध्‍यपूर्ण संयोजन आहे, ज्‍यामधून अद्वितीय राइडिंग अनुभव मिळतो.

Related posts

इझमायट्रिपची इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

बिटकॉइनच्या किंमती कशामुळे प्रभावित होत आहेत?

Shivani Shetty

कन्‍फर्मतिकिटचा आयसीसीसह सहयोग

Shivani Shetty

Leave a Comment