अक्षय कुमारने 1987 मध्ये आलेल्या चित्रपट आजद्वारे पदार्पण केले होते, परंतु 1992 मधील चित्रपट खिलाडीने आघाडीचा अभिनेता म्हणून त्याचे करीअर लाँच केले. त्यानंतर त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे व त्यामध्ये हेरा फेरी, एअरलिफ्ट, रावडी राठोरआणि भूल भुलैया ह्यांचा समावेश आहे. त्याला रुस्तम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेता हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.येणा-या काळात तो टिनू सुरेश देसाईच्या द ग्रेट इंडियन रिस्क्यू ह्या खाणकामातील इंज़िनिअर असलेल्या जसवंत सिंह गिलच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे व त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये राणीगंज येथील पूरामध्ये त्याने केलेले बचाव कार्याचे मिशन त्यात बघता येईल.
IMDb वरील अक्षय कुमारच्या सर्वोच्च रेटींग असलेल्या टॉप 10 मूव्हीज अशा आहेत:
- ओएमजी 2 – 8.2
- हेरा फेरी – 8.1
- ओएमजी: ओह माय गॉड! – 8.1
- स्पेशल 26 – 8.0
- पॅडमॅन – 7.9
- बेबी – 7.9
- एअरलिफ्ट – 7.9
- खाकी- 7.4
- केसरी – 7.4
- भूल भुलैया – 7.4
- आँखें – 7.4