maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारत-केंद्रित नेटवर्किंग व्‍यासपीठ ‘खुल के’ लाँच

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३: भारतीयांना खुल्‍या मनाने त्‍यांचे मत व्‍यक्‍त करण्‍याची सुविधा देण्‍याच्‍या दृष्टिकोनासह महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीनिमित्त नाविन्‍यपूर्ण भारतीय अॅप खुल के भारताच्‍या डिजिटल क्षेत्रात लाँच करण्यात आले आहे. खुल के भारतीयांच्‍या कनेक्‍ट होण्‍याच्‍या, संवाद साधण्‍याच्‍या आणि सहयोगात्‍मक लोकशाहीप्रती योगदान देण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. हे अॅप समुदाय-निर्मिती कृतींची सुविधा देण्‍यासह ऑडिओव्हिज्‍युअल कन्‍टेन्‍ट देते आणि मत व्‍यक्‍त करणाऱ्या इतरांसोबत संवाद साधण्‍याची सुविधा देते. चाचणी टप्‍प्‍यादरम्‍यान देखील ‘खुल के’च्‍या माध्‍यमातून संवाद साधण्‍याच्‍या प्रमाणात मासिक १० ते १५ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामधून सर्वांगीण दृष्टिकोनासह अर्थपूर्ण संवाद झाले.

खुल केचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष कुलश्रेष्‍ठम्‍हणाले, “सोशल मीडियामध्‍ये परिवर्तनाला चालना देण्‍याची क्षमता असलेल्‍या युगात खुल के व्‍यासपीठ प्रदान करण्‍याप्रती समर्पित आहे, जेथे प्रत्‍येक भारतीय, विशेषत: तरूण व प्रेरणादायी व्‍यक्‍ती अर्थपूर्ण संवादांमध्‍ये सामील होऊ शकतात, त्‍यांचे मत व्‍यक्‍त करू शकतता आणि आपल्‍या समाजाच्‍या प्रगतीप्रती सक्रियपणे योगदान देऊ शकतात. आम्‍ही व्‍यक्‍तींच्‍या कनेक्‍ट होण्‍याच्‍या, संवाद साधण्‍याच्‍या व प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे, ज्‍यामुळे भारतीयांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याला आकार मिळेल. सोशल मीडियाला तीन मुलभूत आधारस्‍तंभांची गरज आहे – अचूकता, विश्‍वसनीयता व उपलब्‍धता. आम्‍ही सोशल मीडिया इकोसिस्‍टमला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.”

‘खुले के’ अॅप भारतातील प्रसिद्ध पद्म प्राप्तकर्त्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर संभाषण सुरू करण्यासाठी आणि अर्थपूर्ण सहभागासह परिपूर्ण इकोसिस्‍टम निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. वास्‍तविक जीवनात खरे प्रभावक असलेले या पद्म पुरस्‍कार विजेत्‍यांना महत्त्वाच्‍या विषयांवर चर्चा करण्‍यासाठी खुल के ने योग्‍य सोशल मीडिया मंच प्रदान केला आहे. ते दिग्‍गज व प्रेरणादायी आदर्श व्‍यक्‍तींप्रमाणे आदरणीय आहेत आणि असाधारण उपलब्‍धींमधून त्‍यांची प्रसिद्धी दिसून येते.

अद्वितीय व सर्वोत्तम संवाद अनुभव निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध असलेले खुल के या प्रख्‍यात पुरस्‍कार विजेत्‍यांच्‍या असाधारण कथा, उपलब्‍धी व योगदानांना सादर करण्‍याचा प्रयत्‍न करते, तसेच वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय जीवनाबाबत, तसेच त्‍यांनी समाजावर निर्माण केलेल्‍या अतूट प्रभावाबाबत जाणून घेण्‍यास आवाहन करते. आपण गांधी जयंती साजरी करण्‍यास एकत्र येत असताना हे अॅप पद्म पुरस्‍कार विजेते आणि महान महात्‍मा गांधी यांनी महत्त्व दिलेले सर्वोत्तमता व सेवा या मूल्‍यांना प्राधान्‍य देते. तसेच आपणा सर्वांना आपल्‍या देशाच्‍या अनसंग हिरोंना प्रशंसित व सन्‍मानित करण्‍यास प्रेरित करते.

Related posts

टाटा मोटर्स आणि महेश कार्गो मूव्‍हर्स प्रत्‍येक मैलामध्‍ये देत आहेत सर्वोत्तम सेवा

Shivani Shetty

टाटा मोटर्स ने अपनी मिड-एसयूवी कर्व को 9.99 लाख रुपये में लॉन्‍च किया

Shivani Shetty

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे तिमाही परिणामांची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment