मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ – प्रतिष्ठेच्या आशिया कस्टमर एंगेजमेंट फोरमच्या (ACEF) प्रतिष्ठेच्या दोन पुरस्कारांवर ‘माईंड वॉर्स’ ने आपले नाव कोरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील ब्रँड फिल्म आणि ऍप कंटेंटच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘माईंड वॉर्स’ला हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
‘एसीईएफ’ अवॉर्ड्स हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यासपीठ आहे. संपूर्ण आशियातील मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांसोबत उत्तम रिलेशन ठेवण्यात ‘एसीईएफ’ ला नावाजले जाते. सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची शैक्षणिक सामग्री तसेच शिक्षण देण्यात माइंड वॉर्स आघाडीवर असते. आणि त्यांना मिळालेले हे पुरस्कार हा त्याचाच पुरावा आहे.
ब्रँड फिल्म प्रकारात, माइंड वॉर्सचा व्हिडिओ कंटेंट स्पर्धेमध्ये वेगळा ठरला. यात केवळ शिक्षणासाठी व्यासपीठाचा अभिनव दृष्टीकोनच दिसला नाही तर शिक्षण मनोरंजक करण्याचे त्यांचे प्रयत्न देखील समोर आणले.
ऍप सामग्री श्रेणीमध्ये देखील माईंड वॉर्सला एक पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. माइंड वॉर्स ऍपद्वारे देखील हसत खेळत शिक्षण घेता येते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती होणार आहे. यामुळे मुलांना देखील लॉजिकल विचार करण्याची तसेच एखाद्या गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करण्याची सवय लागते.
माईंड वॉर्सने शिक्षणात एक नवीन प्रवाह आणला आहे. त्यांच्या नवनवीन प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळते. शिक्षणाच्या या आधुनिक दृष्टिकोनामुळे देशभरातील सुमारे ६९५ जिल्ह्यांमधून (९४.५ टक्के) विद्यार्थ्यांचा सहभाग आणि नोंदणी आकर्षित करण्यासाठी माइंड वॉर्स सक्षम झाले आहेत. ३७ हजारांहून अधिक शाळा आणि १४ हजारांपेक्षा अधिक शाळांमधले शिक्षक माईंड वॉर्सच्या कुटुंबाचा भाग आहे. ही संख्या माइंड वॉर्सच्या यशाचे प्रतिबिंब आहे. २०१९ पासून, माईंड वॉर्स प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींमध्येही प्रवीण बनवण्याच्या प्रयत्नात आहे.