maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत

मुंबई, ८ एप्रिल २०२४: क्वांटम एनर्जी या इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात तज्ञ असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही-EV) स्टार्टअपने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर या नवीनतम मॉडेल्सवरील मर्यादित वेळेची ऑफर ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ३१ मार्च २०२४ रोजी संपणारी ही मुदतवाढ, पर्यावरणविषयक जागरूक ग्राहकांच्या प्रचंड मागणीला प्रतिसाद म्हणून देण्यात आली आहे.

विशेषत: ३१ मार्च रोजी फेम २ सबसिडीची समाप्ती आणि त्यानंतर ईएमपीएस २०२४ अॅड हॉक योजना सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर, क्वांटम एनर्जीने तिच्या प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटर्सवर ऑफर वाढविण्याचा निर्णय उल्लेखनीय आहे. जरी दुसऱ्या योजनेत प्रत्येक टू-व्हीलरसाठी १०,००० रुपयांपर्यंत मर्यादित साहाय्य पुरवले गेले असले तरी, क्वांटम एनर्जी अशा आकर्षक किंमतीचे पर्याय प्रदान करण्यास कटिबद्ध आहे, जे शाश्वत वाहतूक सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी तिच्या समर्पणास प्रदर्शित करतात. पूर्वी अनुक्रमे १,१९,५२५ रुपये आणि ९९,७५७ रुपये एक्स-शोरूममध्ये सूचीबद्ध असलेल्या या अत्याधुनिक स्कूटर्स आता क्वांटम एनर्जीने १०% सवलतीवर ऑफर केल्या आहेत, ज्यामुळे किंमती अनुक्रमे १,०९,००० रुपये आणि ८९,००० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत.

एक अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून, क्वांटम एनर्जी ३० एप्रिलपर्यंत केलेल्या प्रत्येक टू-व्हीलर खरेदीवर ७५,००० रुपयांचे अतिरिक्त फायदे देत आहे. या फायद्यांमध्ये मिंत्रा, पिझ्झा हट, पेटीएम, द मॅन कंपनी यासारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या एक्सक्लुझिव्ह ब्रँड ऑफर्स आणि कूपन्सचा समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी एकंदरीत मूल्य प्रस्ताव वाढला आहे.

क्वांटम एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चक्रवर्ती सी. म्हणाले, “क्वांटम एनर्जीला मागील महिन्यात आमच्या ग्राहकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि त्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही आमची ऑफर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमचा ठाम विश्वास आहे की, ईव्ही टू-व्हीलर उद्योग त्याच्या कवचामधून बाहेर पडला आहे आणि चालू सरकारी पाठिंब्यामुळे, अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे आमच्यासारख्या ओईएम कंपन्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी स्पर्धात्मक किंमत ऑफर करण्यास सक्षम झाल्या आहेत. पारंपारिक इंधन-आधारित वाहनांच्या तुलनेत सर्वात अनुकूल व्याज दर ऑफर करणाऱ्या फायनान्सिंग पर्यायांसह, आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी ही एक फायदेशीर परिस्थिती आहे.”

Related posts

जान्हवी कपूरने मुंबईमध्ये गोरेगावआणि वांद्रे येथे कल्याण ज्वेलर्सच्यादोन नवीन शोरूम्सचे उदघाटन केले

Shivani Shetty

सेन्‍स स्‍मार्ट टीव्‍हीच्या विक्रीत लक्षणीय वाढ

Shivani Shetty

शोभिता धुलिपाला हि जागतिक स्तरावर नाव कमावलेल्या भारतीय वंशाच्या कलाकारांच्या यादीत सामील झाली आहे

Shivani Shetty

Leave a Comment