मुंबई, ८ डिसेंबर २०२३: बाटू टेक या डिजिटल पॅरेण्टिंगमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात अग्रणी असलेल्या कंपनीने अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टम असलेला ‘एनेबल टॅब’ लाँच केला आहे. भारतातील आघाडीचा पॅरेण्टल कंट्रोल टॅब्लेट व्हर्च्युअल क्षेत्रात मुलांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेला एनेबल टॅब बाटू टेकच्या ऑफिशियल वेबसाइटवर, तसेच अॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांसारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स व्यासपीठांवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
‘एनेबल टॅब’ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या शक्तीचा फायदा घेत डिजिटल पॅरेण्टिंग क्षमतांमध्ये वाढ करतो. एआय टॅब्लेटच्या कार्यक्षमतेमध्ये, विशेषत: अयोग्य कन्टेट ओळखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. डिवाईसमध्ये संभाव्य घातक कन्टेन्टला ओळखण्याची व त्याबाबत पालकांना अलर्ट करण्याची एआय मॉडेल्सची क्षमता आहे, ज्यामधून मुलांसाठी सुरक्षित व विश्वसनीय ऑनलाइन वातावरणाची खात्री मिळते. यामधील पॅरेण्टल कंट्रोल सिस्टम वैशिष्ट्यपूर्ण आहे, जी ‘बाटू पॅरेण्टिंग अॅप’ आणि ‘एनेबल’ टॅबदरम्यान एकसंधी लिंक प्रदान करते, तसेच मुलांच्या ऑनलाइन कृतींबाबत सविस्तर माहिती देते. एनेबल टॅब पॅरेण्टिंग अॅपशी कनेक्ट केल्याशिवाय कार्य करत नाही, ज्यामधून ऑनलाइन व्यतित केलेल्या प्रत्येक मिनिटावर देखरेख असण्याची आणि कन्टेन्ट मुलांसाठी सुरक्षित असण्याची खात्री मिळते.
बाटू टेकचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार म्हणाले, “हायपर-कनेक्टीव्हीटीच्या युगात मुले मोठ्या प्रमाणात फोनचा वापर करत असल्यामुळे आम्ही भावी पिढीवर याचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. डिजिटल साक्षरतेची गरज असली तरी आपण वरदानामुळे नुकसान होणार नाही यासाठी करावयाच्या कृतींबाबत खात्री घेतली पाहिजे. एनेबल टॅब यामध्ये संतुलन राखण्यासाठी परिपूर्ण आहे. यामधून प्रत्येक मूल जोखीमेशिवाय इंटरनेटचा वापर करू शकण्याच्या खात्रीप्रती आमचे प्रयत्न दिसून येतात.”
कंपनी एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शनची अंमलबजावणी करत मुलांची सुरक्षितता व गोपनीयतेची खात्री देते, तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण होण्याची आणि जाहिरात उद्देशांसाठी न वापरली जाण्याची देखील खात्री मिळते.
इतर प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
जिओ-फेन्सिंग: विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी व्हर्च्युअल पेरिमीटर्स तयार करते.
स्क्रीन टाइम मॉनिटरिंग: पालक दररोज स्क्रीन टाइम लिमिट्स सेट करू शकतात आणि सविस्तर आकडेवारीच्या माध्यमातून डिवाईस व अॅपमधील माहिती मिळवू शकतात.
अॅप कंट्रोल/मॉनिटरिंग: पालक विशिष्ट अॅप्लीकेशन्स लॉक/अनलॉक करू शकतात.
अयोग्य कन्टेन्ट ओळखणे: एआय मॉडेल्सचा वापर करत अयोग्य कन्टेन्टसाठी सर्व कन्टेन्ट स्रोतांचे स्कॅन करते.
बॅटरी लेव्हल मॉनिटरिंग: बॅटरीचा अधिक वापर झाल्यास त्यावर देखरेख ठेवते आणि त्याबाबत पालकांना सूचित करते.
पालकांसाठी कॉल वापरासंदर्भातील आकडेवारी, टेक्स्ट मॉनिटरिंग व कॉल व्हाइटलिस्टिंगची सुविधा.
तसेच एनेबल टॅब पॉवरहाऊस टॅब्लेट आहे, जो कोणत्याही गोष्टीची हाताळणी करू शकतो. हा टॅब्लेट व्यस्त जीवनशैलीशी साजेशा डिवाईसची गरज असलेले विद्यार्थी, व्यावसायिक व कुटुंबियांसाठी परिपूर्ण आहे. या टॅब्लेटमध्ये मोठे व सुस्पष्ट १०.१-इंच एचडी डिस्प्ले, शक्तिशाली मीडियाटेक प्रोसेसर, ड्युअल कॅमेरे, उच्च क्षमतेचे स्पीकर्स आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारी ६००० एमएएच बॅटरी आहे.
तसेच, बाटू टेकला ऑनलाइन सुरक्षिततेसह मानसिक आरोग्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याची गरज माहित आहे. ‘एनेबल टॅब’मध्ये सुसाइड अलर्ट वैशिष्ट्य आहे, जे एआय अल्गोदिरम्सचा वापर करत मुलांच्या ऑनलाइन कृतींमधील तणावाच्या संभाव्य चिन्हांना ओळखते. ही उल्लेखनीय कार्यक्षमता पारंपारिक पॅरेण्टल कंट्रोल उपायांच्या तुलनेत उत्तम आहे, जेथे पालकांना वेळेवर हस्तक्षेपासाठी आणि असुरक्षित क्षणांदरम्यान मुलांना साह्य करण्यासाठी अलर्टस् व संसाधने प्रदान केली जातात.