maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस इंटरनॅशनलने एसएलडब्ल्यू मीडियामधील ५१ टक्के समभाग खरेदी केले

मुंबई, १ सप्टेंबर २०२४: बीएलएस इंटरनॅशनल या सरकार तसेच नागरिकांसाठी एक विश्वासू जागतिक स्तरावरील सेवा पुरवठादार भागीदार आणि व्हिसा प्रक्रिया व कॉन्सुलर सेवांमधील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज आपण एसएलडब्ल्यू मीडियामध्ये ५१ टक्के समभाग ८०.२४ लाख रूपयांना खरेदी करण्यासाठी समभाग खरेदी करारनामा केल्याची घोषणा केली. एसएलडब्ल्यू मीडिया ही एक ख्यातनाम स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनी असून तिला गोल्फ उद्योगात दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे.

हा ताबा बीएलएस इंटरनॅशनलच्या व्यापक जागतिक अस्तित्वाशी जुळणारा आहे. त्यातून ६६ देशांमध्ये त्यांच्या व्हिसा आणि पर्यटन सेवांमध्ये गोल्फचा समावेश सहज करणे शक्य होईल. हे धोरणात्मक पाऊल वाढत्या क्रीडा आणि प्रवास क्षेत्रात तर कामगिरी करतेच पण त्याचबरोबर बीएलएस इंटरनॅशनलला व्यापक विस्तार, वैविध्यीकरण आणि जागतिक व्याप्तीच्या विस्तारात आघाडीवर ठेवते.

या भागीदारीमुळे कंपनीच्या ब्रँडला जागतिक स्तरावर व्याप्ती मिळेल. गोल्फ इव्हेंट व्यवस्थापनाला व्हिसा, प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध ज्ञानांशी जोडून बीएलएस इंटरनॅशनल अशा सर्व ऐषारामी अनुभवांसाठी वन स्टॉप सोल्यूशन तयार करते आहे, जे हाय नेट वर्थ व्यक्ती (एचएनआय), कॉर्पोरेट ग्राहक आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

बीएलएस इंटरनॅशनलचे सह-व्यवस्थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्हणाले की, “एसएलडब्ल्यू मीडियाच्या जागतिक क्रीडा कार्यक्रमांमधील ज्ञानासोबत व्यापक ग्राहक नेटवर्कचे व्यवस्थापन करण्यातील बीएलएस इंटरनॅशनलच्या अद्वितीय कौशल्याला जोडून आम्ही आमच्या ब्रँडच्या इक्विटीमध्ये एक मोठी झेप घेत आहोत. ही भागीदारी आमचे जागतिक अस्तित्व वाढून आम्हाला जागतिक स्तरावर धोरणात्मक पद्धतीने ठेवण्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरते. आमच्या एकत्रित दृष्टीकोनामुळे आमची नावीन्यपूर्णता आणि वचनबद्धता अधोरेखित होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नवीन मानक स्थापित करते.”

एसएलडब्ल्यू मीडियाचे प्रमोटर श्री. अनिल देव म्हणाले की, “आम्हाला बीएलएस इंटरनॅशनलसोबत जोडले जाताना खूप आनंद होत आहे. आमचे स्वप्न एकमेकांशी जुळणारे आहे. आमचे गोल्फ उद्योगातील व क्रीडा व्यवस्थापनातील सखोल ज्ञान आणि बीएलएस इंटरनॅशनलचा जागतिक पाया आम्हाला क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रात पॉवरहाऊस बनवते. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा विस्तारित करण्यासाठी, नवनवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि खेळाचे चाहते असणाऱ्यांना एक अधिक चांगला अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत.”

Related posts

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा

Shivani Shetty

गेम्‍सक्राफ्टकडून रम्‍मीकल्‍चरसाठी ट्रस्‍ट रिपोर्ट जारी, ज्‍यामधून निष्‍पक्ष व जबाबदार गेमिंगप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते

Shivani Shetty

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

Leave a Comment