मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४: कियाची सर्वाधिक विकली जाणारी अभिनव वाहने – सेल्टोस आणि कॅरेन्स ही डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांत श्रेणीतील सर्वात कमी देखभाल खर्च ऑफर करतात, अशी माहिती भारतातील अग्रगण्य विकासात्मक सल्लागार कंपनी फ्रॉस्ट अँड सुलिव्हनने आपल्या अलीकडील सकल मालकी खर्च निर्देशांकाच्या विश्लेषणातून दिली आहे.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, किया कॅरेन्स ही फॅमिली मूव्हर्स श्रेणीतील आघाडीचे वाहन म्हणून समोर आले आहे. त्यांचा पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये सर्वात किफायतशीर देखभालीचा खर्च असून तो अनुक्रमे २१% आणि २६% आहे. सर्वात कमी अधिग्रहणाच्या खर्चानिशी तिचे डिझेल मॉडेल आधुनिक ग्राहकांसाठी उत्कृष्ट मूल्य सादर करते. इतकेच नव्हे तर कॅरेन्सचे डिझेल मॉडेल इंधनावरील खर्च कमी होण्यात या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वाहनाच्या अत्यंत जवळपास आहे. आकर्षक मूल्य प्रस्तावासह सर्वात प्रीमियम कार पर्यायांपैकी एक म्हणून कॅरेन्सने आपली स्थिती भरभक्कम केली आहे.
फ्रॉस्ट अँड सुलिव्हनने पुढे सांगितले की, कियाची सर्वाधिक विकली जाणारी नवकल्पना – द सेल्टोस आपल्या पेट्रोल व्हेरिएंट्ससाठी सर्वात कमी देखभालीचा खर्च ऑफर करते, जी की या उद्योग क्षेत्रातील सरासरीच्या तुलनेत कमीत कमी १७% बचत करवून देते. या व्यतिरिक्त, सेल्टोसचे डिझेल व्हेरिएंट इतर श्रेणीतील अग्रगण्य वाहनासोबत सर्वात कमी देखभालीचा खर्च शेअर करते. मालकीचा एकूण खर्चाच्या (टीसीओ) संदर्भात सेल्टोस श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या जवळपास आहे. तिने आपल्या डिझेल व्हेरिएंटसाठी दुसरा सर्वोत्तम टीसीओ, तर पेट्रोल व्हेरिएंटसाठी तिसरा सर्वोत्कृष्ट टीसीओ मिळवला आहे, हे विशेष.
किया इंडियाचे नॅशनल हेड सेल्स अँड मार्केटिंग श्रीयुत हरदीपसिंग ब्रार म्हणाले की, “नवीन युगातील ग्राहकांसाठी सर्वाधिक मूल्याधारित दळणवळण सेवा-सुविधा निर्माता म्हणून फ्रॉस्ट अँड सुलिव्हनकडून आमच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आम्ही खूप आनंदित झालेलो आहोत. कियाची निवड करणे हा केवळ आजपुरताच समंजसपणाचा निर्णय नव्हे तर ती भविष्यासाठीची एक उत्तम गुंतवणुकही आहे. त्याचा प्रीमियमनेस, अतुलनीय मेंटेनन्स आणि आपल्या श्रेणीतील अवांतर खर्च लक्षात घेता ही बाब समोर येते.”