नेस्ले इंडियाने मॅगी ओट्स नूडल्स सब-ब्रॅण्ड अंतर्गत मॅगी ओट्स नूडल्स विथ मिलेट मॅजिकच्या लाँचसह त्यांच्या मिलेट-आधारित उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन ऑफरिंगची भर केली आहे. जवळपास दोन-तृतीयांश भारतीय घरांमध्ये सेवन केले जाणारे मॅगी नूडल्स भारतात मिलेट्सना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीसकारात्मकपणे योगदान देऊ शकतात.
नवीन उत्पादनामध्ये दोन मिलेट्स – सोरगम (ज्वारी) व फिंगर मिलेट(रागी) यांच्यासह अनेक गुणधर्मांनी भरलेल्या ओट्सचे मिश्रण आहे. मॅगीने मिलेट्सना उत्साहवर्धक करण्यासाठी आणि अनुभवामध्ये अधिक वाढ करण्यसाठी चवदार मसाल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत नेस्ले इंडियाच्या फूड्स बिझनेसचेसंचालक श्री. रजत जैन म्हणाले, ”आम्हाला मिलेट्सचे गुणधर्मअसलेले नवीन मॅगी ओट्स नूडल्स विथ मिलेट मॅजिक लाँच करण्याचा आनंद होत आहे. हे लाँच नाविन्यतेला नव्या उंचीवर नेत ग्राहकांना विविध पर्याय प्रदान करण्याप्रती मॅगीच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे. या नवीन उत्पादनासह आम्ही फायबर व प्रोटीनचे स्रोत असलेले उत्पादन ग्राहकांना प्रदान करण्याकरिता भारतीय मिलेट्समध्येओट्सना मिश्रित केले आहे. भारतातील आमच्या अस्तित्वाच्या चार दशकांच्या कालावधीदरम्यान आम्हाला ग्राहकांकडून भरपूर प्रेममिळाले आहे. आम्हाला विश्वास आहे की, मॅगी ओट्स नूडल्स विथ मिलेट मॅजिकला ग्राहकांकडून तितकेच प्रेम व स्विकार मिळेल.”
मॅगी ओट्स नूडल्स विथ मिलेट मॅजिक नेस्ले इंडियाच्या श्रेणींमधीलनवीन मिलेट-आधारित ऑफरिंग्जचा भाग म्हणून येते. मानेसर येथील नेस्ले आरअॅण्डडी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (नेस्ले एस. ए.ची उपकंपनी आणि नेस्लेच्या जागतिक आरअॅण्डडी नेटवर्कचा भाग) न्यूट्रीहब-आयआयएमआर सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.यामागे मिलेट प्रोसेसिंग, आरोग्य व पोषण लाभ, मिलेट शाश्वत रिजनरेटिव्ह कृषी पद्धती व स्टार्ट-अप सहयोग अशा क्षेत्रांमध्ये सहयोग करण्याचा मनसुबा आहे. मॅगीसह ग्राहकांना २० मसाले व हर्ब्सचेसंयोजन असलेल्या टेस्टमेकरच्या माध्यमातून उत्तम स्वादाची खात्री मिळू शकते.
मॅगी ओट्स नूडल्स विथ मिलेट मॅजिक प्रमुख मेट्रो शहरांमध्ये उपलब्धअसेल आणि किंमत ४ सर्व्हच्या पॅकसाठी (२९८ ग्रॅम) १७५ रूपयेअसेल.