maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नवीन यूआय ६.१ अपडेटमुळे अधिकाधिक गॅलॅक्‍सी डिवाईसेसमध्‍ये गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्य उपलब्‍ध

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी २२, २०२४: सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने आज मोबाइल एआयच्‍या अधिक लोकशाहीकरणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन वन यूआय ६.१ अपडेटच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक गॅलॅक्‍सी डिवाईसेसवर गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्ये उपलब्‍ध असण्‍याची घोषणा केल. हे अपडेट गॅलॅक्‍सी एस२३ सिरीज, एस२३, एफई, झेड फोल्‍ड५, झेड फ्लिप५ आणि टॅब एस९ सिरीजमध्‍ये उपलब्‍ध असेल, तसेच मार्च अखेरपासून सादर होईल. नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजशी संलग्‍न राहत हे अपडेट ऑन-डिवाईस आणि क्‍लाऊड-आधारित एआयचा समावेश असलेल्‍या हायब्रिड दृष्टिकोनाच्‍या माध्यमातून वापरकर्त्‍यांच्‍या मोबाइल एआय अनुभवाच्‍या मानकाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. 

गॅलॅक्‍सी एआयसह आमचा मोबाइल एआयच्‍या नवीन युगामध्‍ये अग्रणी असण्‍यासह एआय अधिक प्रमाणात उपलब्‍ध करू देत वापरकर्त्‍यांना सक्षम करण्‍याचा उद्देश आहे,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील मोबाइल एक्‍स्‍पेरिअन्‍स बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख टीएम रोह म्‍हणाले. ही फक्‍त गॅलॅक्‍सी एआयची सुरूवात आहे, आम्‍ही २०२४ मध्‍ये १०० दशलक्षहून अधिक गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना हा अनुभव देण्‍यास उत्‍सुक आहोत, तसेच मोबाइल एआयच्‍या अमर्यादित क्षमतांचा अवलंब करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण मार्गांचा शोध घेत राहू.” 

अडथळ्यांना दूर करणारे कम्‍युनिकेशन

आता अधिकाधिक गॅलॅक्‍सी वापरकर्ते एआय-सपोर्टेड मॉडेल्‍सवर उपलब्‍ध असलेल्‍या कम्‍युनिकेशन-एन्‍हान्सिंग गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्यांचा लाभ घेऊ शकतील. या वैशिष्टयांमध्‍ये मेसेज टोन समायोजित करण्‍याची क्षमता आणि चॅट असिस्‍टचा वापर करत १३ विभिन्‍न भाषांमध्‍ये मेसेजेसचे भाषांतर यांचा समावेश आहे. गॅलॅक्‍सी वापरकर्ते लाइव्‍ह ट्रान्‍सलेटच्‍या माध्‍यमातून रिअल-टाइम इंटरअॅक्‍शन्‍सच्‍या क्षमतेचा अनुभव घेऊ शकतात, जे फोन कॉल्‍ससाठी वॉईस व टेक्‍स्‍ट भाषांतर देते. इंटरप्रीटरसह वापरकर्ते प्रवास करत असताना स्‍थानिकांसह सुलभपणे संवाद साधू शकतात, जेथे स्प्लिट-स्क्रिन वैशिष्‍ट्य लाइव्‍ह संवादांसाठी टेक्‍स्‍ट भाषांतर करते. 

अद्वितीय उत्‍पादकता 

गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये गॅलॅक्‍सी एआयच्‍या व्‍यापक एकीकरणामुळे वापरकर्त्‍यांना एआय-सपोर्टेड मॉडेल्‍सवर दैनंदिन टास्‍क्‍सचा एकसंधी अनुभव मिळतो, ज्‍यामुळे कार्यक्षमता नव्या उंचीवर पोहोचते. सर्कल टू सर्च विथ गुगलच्‍या माध्‍यमातून सर्च फंक्‍शन्‍स सुधारण्‍यात आल्‍या आहेत, जे सुलभ सर्कल-मोशन गेस्‍चरसह सर्वोत्तम सर्च निष्‍पत्ती देते. लाइफ-एन्‍हान्सिंग ऑर्गनायझेशयन वैशिष्‍ट्ये जसे नोट असिस्‍ट वापरकर्त्‍यांना फॉर्मेट्स तयार करण्‍याची, सारांशची आणि नोट्सना भाषांतर करण्‍याची सुविधा देते, तर ब्राऊजिंग असिस्‍ट व्‍यक्‍तींना बातम्‍यांचे सर्वसमावेशक सारांश तयार करत चालू घडामोडींशी जलदपणे संलग्‍न राहण्‍यास मदत करते. ट्रान्स्क्रिप्‍ट असिस्‍ट सहजपणे मीटिंग रेकॉर्डिंग्‍सना ट्रान्‍स्‍क्राइब करू शकते आणि सारांश व भाषांतर तयार करू शकते. 

अधिक साह्यतेसाठी अद्वितीय सर्जनशीलता 

गॅलॅक्‍सी एआयसह सॅमसंग व्‍यक्‍तींच्‍या सर्जनशील क्षमतेला अनलॉक करण्‍याबाबतची भूमिका वाढवत आहे. गॅलॅक्‍सीचे नवीन अपडेट अनेक गॅलॅक्‍सी एआय टूल्‍स देते, जे फोटो काढल्‍यानंतर देखील त्‍यामध्‍ये क्रिएटिव्‍ह बदल करण्‍याची सुविधा देतात. जनरेटिव्‍ह एडिटच्‍या माध्‍यमातून एआय-सपोर्टेड डिवाईसेस फोटोंमधील वस्‍तूंना रिसाइज, रिपोझिशन किंवा रिअलाइन करत परिपूर्ण फोटो तयार करू शकतात. वापरकर्ते जलदपणे कोणत्‍याही फोटोला अधिक आकर्षक करू शकतात, जे एडिट सजेशनसह अधिक सुलभ झाले आहे. विविध फोटो काढण्‍याची गरज नाही, कारण इन्‍स्‍टण्‍ट स्‍लो-मो१० अॅक्‍शन-पॅक क्षणांना कॅप्‍चर करण्‍यासाठी स्‍लो-मोशन व्हिडिओजकरिता अतिरिक्‍त फ्रेम्‍स तयार करू शकते.

सर्जनशीलता व वैयक्तिकरण येथेच थांबत नाही. एआय-निर्मित वॉलपेपर्सच्‍या माध्‍यमातून गॅलॅक्‍सी डिवाईसेसना सानुकूल करणे अधिक सोपे झाले आहे, ज्‍यामुळे एआय-सपोर्टेड डिवाईसेसच्‍या माध्‍यमातून वापरकर्त्‍यांच्‍या सर्जनशीलतेला प्रत्‍यक्षात आणता येऊ शकते. 

Related posts

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने ग्लैंजा के ‘फेस्टिवल लिमिटेड एडिशन’ की पेशकश की घोषणा की 

Shivani Shetty

इझमायट्रिपची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

Shivani Shetty

मॅगी नवीन ‘मॅगी ओट्स नूडल्‍स विथ मिलेट मॅजिक’सह मिलेट्सच्‍या क्षमता दर्शवत आहे

Shivani Shetty

Leave a Comment