maharashtraprimenews
ठळक बातम्या
इक्विटीव्यवसायसार्वजनिक स्वारस्य

कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडचा आयपीओ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार

कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडचा आयपीओ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार
• कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी प्राईस बँड ५१४ ते ५४१ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
• ऑफर खुली होण्याची तारीख – सोमवार १४ नोव्हेंबर २०२२ आणि ऑफर बंद होणार बुधवार १६ नोव्हेंबर २०२२.

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२२: “रुस्तमजी” या ब्रँड नावाने चालवली जाणारी आणि ज्या बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे त्याठिकाणी विकल्या गेलेल्या युनिट्सच्या संख्येच्या आधारे एक आघाडीची स्थावर मालमत्ता विकासक कंपनी कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडचा आयपीओ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार आहे.

प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी प्राईस बँड ५१४ ते ५४१ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २७ इक्विटी शेयर्स आणि त्यापुढे २७ च्या पटीत बोली लावावी लागेल.

आयपीओमध्ये ५६००.०० मिलियन रुपयांपर्यंतचे नव्याने जारी करण्यात आलेले व ७५०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेले शेयर्स आहेत. आपले समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेल्या समभागधारकांमध्ये बोमन रुस्तम इराणी (३७५.०० मिलियन रुपयांपर्यंतचे), पर्सी सोराबजी चौधरी (१८७.५० मिलियन रुपयांपर्यंतचे) आणि चंद्रेश दिनेश मेहता यांच्याकडून १८७.५० मिलियन रुपयांपर्यंतचे समभाग आहेत.

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून उभी राहणारी रक्कम कंपनीच्या आणि/किंवा त्यांच्या काही उपकंपन्यांच्या कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी आणि भविष्यातील स्थावर मालमत्ता प्रकल्पांच्या फंडिंगसाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(१) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, जास्तीत जास्त ३५% भाग सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग हे बीएसई व एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि क्रेडिट सूस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा महाराष्ट्रात विस्तार

Shivani Shetty

जीआयएम-अपग्रॅड’ चा हेल्थ केयर मॅनेजमेंट ऑनलाईन अभ्यासक्रम

Shivani Shetty

अधिक चांगल्या शुश्रुषेसाठी HIV चे लवकर निदान: फोर्थ जनरेशन प्रगत चाचण्या भरून काढत आहेत चाचण्यांमधील तफावत

Shivani Shetty

Leave a Comment