शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम असलेल्या ‘पठाण’च्या टीझरने इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला आहे आणि चार वर्षानंतर राजा एस.आर.के च्या मोठ्या पडद्यावर वापस येण्याचे चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी जल्लोष करून स्वागत केले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या ॲक्शन दृश्यातील शाहरुख खानच्या पूर्णतः नवीन ॲक्शन अवतारामुळे लोक भारावून गेले आहेत.
दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की मेगास्टारने चित्रपटासाठी डिझाइन केलेल्या शारीरिकदृष्ट्या कठीण ॲक्शन सीक्वेन्ससाठी आपले शरीर तयार करताना आश्चर्यकारक निष्ठा दर्शविलेली आहे.
सिद्धार्थ म्हणतात की, “शाहरुख खानने पठाणसाठी आपल्या शरीरावर ब्रेकींग पॉइंटपर्यंत मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे पठाणच्या टीझरकरिता त्याला भरभरून मिळणाऱ्या प्रेमासाठी आणि इतर गोष्टींसाठी तो पात्र आहे. मला आठवते की जेव्हा मी त्याला पठाणसाठी पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा आम्ही चर्चा केली होती की हे त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या किती कठीण असू शकेल आणि तो ताबडतोब यासाठी तयार झाला आणि ते पडद्यावर पहायला मिळते आहे.”
ते पुढे म्हणतात की, “त्याला ॲड्रेनलीन रश हवी होती आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा त्याच्या मार्फत पडद्यावरची हीच भावना जाणवावी अशी त्याची इच्छा होती. ज्या प्रकारे त्याने आपले शरीर तयार केले आहे, अत्यंत धोकादायक स्टंट्स करण्यासाठी वेडेवाकडे प्रशिक्षण घेतले आहे, धोकादायक भूप्रदेशात आणि हवामानात स्वतःला झोकून दिले आहे आणि भारताला त्याचा सर्वात मोठा अॅक्शन दृश्य देण्यासाठी त्याने दाखविलेली समर्पित वृत्ती या सर्व गोष्टी आश्चर्यकारकपणे कौतुकास्पद आहेत.”
दिग्दर्शक पुढे म्हणतात की, “आम्ही डिझाइन केलेली कृती करण्यासाठी त्याने ज्या प्रकारे सर्व वेदना सहन केल्या आहेत, ते अविश्वसनीय आहे. शाहरुख खानसारखा कोणीही नाही आणि त्याने या चित्रपटासाठी ठेवलेला उत्कट दृष्टिकोन पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहण्याची वाट पहावी लागणार आहे.”
पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.