maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’च्या १३व्या पर्वाचे समापन


पुणे, ६ डिसेंबर २०२२: बकार्डी आणि नॉडविन गेमिंग यांनी भारतातील सर्वात उत्साही संगीत फेस्टिवल बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या १३व्या पर्वाचे यशस्वीरित्या समापन केले आहे. २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ३-दिवसीय बहु-संगीत शैली फेस्टिवलमध्ये पुण्यातील, तसेच देशभरातील इतर शहरांमधील हजारो चाहते उपस्थित होते.

बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या १३व्या पर्वाने ‘#१३मेरा वीकेण्डरच्या उत्साहाला साजरे केले आणि समान आवड असलेल्या, तसेच वाढत्या संगीतप्रेमींसाठी काही अद्भुत टॅलेण्टला एकत्र आणले. यंदा फेस्टिवल ४ स्टेजेसमध्ये आयोजित करण्यात आले – बकार्डी एरिना, १३ मेरा स्टेज, कासा बकार्डी आणि कासा इंडी, ज्यांनी प्रेक्षकांना सामावून घेण्यासोबत अनेक तास अद्वितीय मनोरंजन दिले; ४०हून अधिक इंडी भारतीय व आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट्सच्या लाइनअपसह यंदा टॅलेण्टच्या वैविध्यपूर्ण समूहाने भरलेला उत्साहवर्धक संगीतमय वीकेण्ड पाहायला मिळाला, ज्यामध्ये भारतातील काही प्रतिभावान हिप-हॉप, मेटल, इडी व पॉप आर्टिट्स आणि जागतिक स्तरावरील अचंबित करणा-या प्रमुख आर्टिस्ट्सचा समावेश होता.

मेटल चाहत्यांना ब्लडीवूड, क्रॅकेन, कटस्लिट, पॅकिफिस्ट व डाऊन ट्राडन्स यांसारख्या आर्टिस्ट्सची उच्चवर्धक सादरीकरणे पाहायला मिळाली. समकालीन मनोरंजनाची आवड असलेल्या लोकांनी द एफ१६एस, यशराज, संजीता भट्टाचार्य, अनुव जैन, पारेख अॅण्ड सिंग, मामे खान, तेजस व कामाक्षी खन्ना यांच्या सादरीकरणांचा आनंद लुटला. आंतरराष्ट्रीय स्टार जे.आय.डी. सारख्या हिप हॉप सादरीकरणाने आणि हनुमानकाइंड, वाइल्ड वाइल्ड विमेन, मेबा ऑफिलिया, कृस्ना, एमसी अल्ताफ व पीएव्ही४एन यांसारख्या स्वदेशी आर्टिस्ट्सनी प्रेक्षकांचे छान मनोरंजन केले. फेस्टिवलमध्ये अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्यूमिनीअर्स, डर्टी लूप्स, स्वीडिश जॅझ, आरअॅण्डबी व पॉप बॅण्ड आणि इस्रायली बॅण्ड टिनी फिंगर्स यांचे मनाला स्पर्श करणारे परफॉर्मन्स पाहायला मिळाले. या सर्वांनी विविध संगीत अभिव्यक्तींना सादर केले.

नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “यंदाच्या एनएच७ वीकेण्डरसाठी थीम #१३मेरा वीकेण्डर होती आणि आम्हाला इंडी संगीताच्या चाहत्यांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचा आनंद झाला. यंदा प्रेक्षकांना अनेक नवनवीन मनोरंजन पाहायला मिळण्यासोबत अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्यूमिनीअर्स, अमेरिकन रॅपर जे.आय.डी., स्वीडिश बॅण्ड डर्टी लूप्‍स अशा अनेकांचे उत्सावर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळाले. फेस्टिवल अत्यंत यशस्वी ठरले, जेथे आम्ही चाहत्यांना सिग्नेचर वीकेण्डर अनुभवासाठी यंदाच्या परफॉर्मर्सच्या लाइन-अपच्या माध्यमातून अनेक शैलींमधील मनोरंजन दिले.’’

Related posts

क्विक हीलने कोल्हापूरातील सुविधांपासून वंचित लोकांसाठी मोदमृत यान भेट दिली

Shivani Shetty

प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम

Shivani Shetty

टाटा कम्युनिकेशन्सचे करणार महिलांचे सक्षमीकरण

Shivani Shetty

Leave a Comment