Coimbatore, Jan 10, 2024: एल्गी इक्विपमेंटस (बीएसई: ५२२०७४, एनएसई: ELGIEQUIP) या जगातील आघाडीच्या एअर कॉम्प्रेसर उत्पादक कंपनीने मियामी-स्थित अत्याधुनिक फिटनेस स्टुडिओ एअरलॅब फिटनेसला स्ट्रेन्थ, कंडिशनिंग व एचआयटीटी क्लासेस प्रदान करण्यास सक्षम केले आहे, ज्यामुळे प्रत्येक ग्राहकासाठी सहनशक्तीमध्ये वाढ होण्यास रिकव्हरी प्रक्रियेला गती मिळेल. सिम्युलेटेड हाय-अॅल्टिट्यूड प्रशिक्षण वातावरणाला अॅल्टिट्यूट तंत्रज्ञानामधील अग्रणी ऑस्ट्रेलिया-स्थित अॅल्टिट्यूड ट्रेनिंग सिस्टम्स (एटीएस) च्या हायपोक्सिक एअर चेम्बर्समधील एल्गीच्या EG37 सिरीज स्क्रू एअर कॉम्प्रेसरद्वारे संचालित आहे. कॉम्प्रेस्ड एअर सोल्यूशनने विविध अॅल्टिट्यूड्स व वातावरणाला अनुसरून सर्वोत्तम एअर कंपोझिशन, स्थिरता व विविधता प्रदान करत एअरलॅबच्या विशिष्ट गरजांची पूर्तता केली. एल्गीचे अपटाइम वचन आणि सर्वसमावेशक, उद्योग-अग्रणी वॉरंटी प्लान्सनी देखील विश्वसनीयता, समाधान आणि सुलभ देखरेखीची खात्री दिली, ज्यामुळे एअरलॅबला सर्वोत्तम कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आले.
एअरलॅब फिटनेसचे को-सीईओ वरूण जय वरदराज म्हणाले, ”एअरलॅबमध्ये आम्ही आमच्या प्रशिक्षण तत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून “𝗧𝗿𝗮𝗶𝗻 𝗵𝗶𝗴𝗵, 𝗹𝗶𝘃𝗲 𝗹𝗼𝘄” तत्त्वाचे पालन करतो. आमचा स्टुडिओ मियामीच्या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत सदस्यांना हाय-अॅल्टिट्यूड सत्रांदरम्यान मर्यादांना दूर करण्यास सक्षम करतो, तसेच सुलभ रिकव्हरी प्रक्रियेची खात्री देतो. एल्गी आम्हाला या आकाराचे व प्रमाणाचे किफायतशीर कॉम्प्रेस्ड एअर सोल्यूशन प्रदान करण्याची क्षमता असलेली एकमेव कंपनी ठरली. एल्गीच्या उच्च दर्जाच्या आणि ऊर्जा-कार्यक्षम कॉम्प्रेस्ड एअर सिस्टममुळे कार्यसंचालन खर्च कमी झाला, जी आमच्यासारख्या स्टार्ट-अपसाठी महत्त्वाची बाबआहे. त्यांच्या अपटाइम हमीसह आम्हाला सतत पाठिंब्याची खात्री मिळत आहे. आम्हाला मिळालेल्या या अविरत पाठिंब्यासाठी आभार. माझ्यावर कॉम्प्रेस्ड एअर आणि कॉम्प्रेसरच्या देखरेखीमधील तज्ञ बनण्याचा कोणताच दबाव नाही. वाढत्या ग्राहकवर्गासह आमचा नवीन व्यवसाय असल्यामुळे कार्यरत कार्यक्षमता आमच्या सातत्यपूर्ण यशासाठी महत्त्वाची आहे.”
कॉम्प्रेस्ड एअर सभोवतालच्या वातावरणातील पुरेशी हवा व्यापून घेत हायपोक्सिक चेम्बरमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हायपोक्सिक वातावरण तयार होते, जे हवेचे नायट्रोजनीकरण करत आणि हवेमधील ऑक्सिजन घनता कमी करत कमी ऑक्सिजन पातळ्या असलेल्या उंचावरील वातावरणासारखे असते. उत्तर अमेरिकेमधील एल्गीची उपकंपनी पॅटन्सने कॉम्प्रेसर व अॅक्सेसरीजचा पुरवठा केला, जे ऑस्ट्रेलियामधील एल्गीची उपकंपनी पुलफोर्ड एअर अॅण्ड गॅसचा विभाग एटीएस (अॅल्टिट्यूट ट्रेनिंग सिस्टम्स) मधील हायपोक्सिक तंत्रज्ञानाशी पूरक होते. सीएफएम, प्रवाह क्षमता व ऊर्जा कार्यक्षमता अशा महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर एल्गीच्या ईजी सिरीज EG37-125 कॉम्प्रेसरची निवड करण्यात आली. ईजी सिरीजने एअरलॅब फिटनेसला इच्छित कालावधीमध्ये त्यांच्या अॅल्टिट्यूड ट्रेनिंग स्टुडिओची कार्यक्षमपणे व किफायतशीरपणे पूर्तता करण्यास सक्षम केले, ज्यामुळे विविध अॅल्टिट्यूड्स व वातावरणासारखी अपवादात्मक एअर कंपोझिशन स्थिरता व वैविध्यता देता आली. फ्लोरिडामधील एल्गी वितरक इंडस्ट्रीयल एअर सेंटर्सने सेटअप व सर्विसह बहुमूल्य साह्य प्रदान केले, ज्यामुळे फक्त एका दिवसात इन्स्टॉलेशन पूर्ण करता आले आणि एअरलॅबला विक्रमी वेळेत व्यवसाय सुरू करता आला.
”एल्गीचे विश्वसनीय व कार्यक्षम कॉम्प्रेस्ड एअर तंत्रज्ञान एअरलॅब फिटनेससाठी अत्यंत उपयुक्त आहे. आम्हाला अद्वितीय फिटनेस स्टुडिओला साहय करण्याचा आनंद होत आहे. यामधून अद्वितीय व्यवसायांच्या कॉम्प्रेस्ड एअर गरजांची पूर्तता करण्यासाठी सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती आमची नाविन्यता व क्षमता दिसून येते,” असे एल्गी डिस्ट्रिब्युशन ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष स्कॉट सटन म्हणाले.
एटीएस – अॅल्टिट्यूट ट्रेनिंग सिस्टम्सने प्रदान केलेल्या हायपोक्सिक सोल्यूशनबाबत मत व्यक्त करत एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक (ओएसईए) रमेश पोन्नूस्वामी म्हणाले, ”एटीएसचे नाविन्यपूर्ण हायपोक्सिक प्रशिक्षण सोल्यूशन एअरलॅब फिटनेससाठी उपयुक्त ठरले, ज्यामुळे त्यांच्या फिटनेस उपक्रमांसाठी आवश्यक असलेल्या हाय-अॅल्टिट्यूट प्रशिक्षण स्थिती निर्माण करता आल्या. एटीएसने प्रभावी अॅल्टिट्यूड प्रशिक्षण वातावरण स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व कौशल्य प्रदान केले, ज्यामुळे फिटनेस स्टुडिओला सर्वोत्तमतेच्या नव्या उंचीवर पोहोचण्यास मदत झाली.”
एल्गीच्या ईजी सिरीज उत्पादनांबाबत अधिक माहिती येथे (here) जाणून घ्या.