maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सुलभ यूपीआय पेमेंट्ससाठी मोबिक्विक पॉकेट यूपीआय कसे वापराल?

फिनटेक क्षेत्र तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत जलदगतीने उत्क्रांत झाले आहे आणि वापरकर्त्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक परिणामकारकरित्या व सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता देणाऱ्या अत्याधुनिक सेवा देऊ करत आहे.

मात्र, आर्थिक वर्ष २४च्या पहिल्या सहामाहीत बँकिंगशी निगडित १४,०००हून अधिक घोटाळे उघडकीस आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India (RBI)) ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. हे घोटाळे अधिक सफाईने घडवून आणले जात असल्यामुळे फिनटेक कंपन्या सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी व त्यांच्या वापरकर्त्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी उपायांची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करत आहेत.
मोबिक्विक ही एक फिनटेक कंपनी यूपीआयच्या शक्तीचा उपयोग करून घेत वापरकर्त्यांना पॉकेट यूपीआयच्या माध्यमातून सुरक्षित व्यवहार करण्यात मदत करत आहे. पॉकेट यूपीआय हे एक प्रभावी साधन असून, त्यामुळे डिजिटल वॉलेटची कार्यात्मकता सुधारते. पॉकेट यूपीआय वापरकर्त्यांना त्यांच्या बँकखात्याशी थेट संबंधाशिवाय, मोबिक्विक वॉलेटचा लाभ घेऊन, सर्व ऑपरेटर्सच्या क्यूआर आणि यूपीआय आयडींवर अखंडितपणे पेमेंट्स करण्याची सोय देते.
पॉकेट यूपीआयमुळे यूपीआय पेमेंट्स करताना बँकखात्याशी येणाऱ्या संबंधाची वारंवारता कमी होते आणि सुरक्षितता वाढते. किरकोळ व पुन्हा-पुन्हा कराव्या लागणाऱ्या खर्चांसाठी यूपीआय पेमेंट करण्याच्या दृष्टीने हा एक सोयीस्कर पर्याय आहे. यामध्ये किरकोळ व वारंवार केले जाणारे खर्च एकत्र केले जातात, आर्थिक दृश्यात्मकता सुधारण्यासाठी बँकपत्रक (स्टेटमेंट) सुटसुटीत केले जाते. हे वॉलेट २४/७ काम करते, बँकांचे काम बंद असतानाही ते चालू असते.
पॉकेट यूपीआयचा वापर सुरू कसा करावा? प्रक्रिया सुलभ आहे:
१. सर्वप्रथम मोबिक्विक अॅपमध्ये स्क्रोल डाउन करा आणि पॉकेट यूपीआय निवडा. स्वत:चा पॉकेट यूपीआय आयडी तयार करण्यासाठी प्रथमच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. आता मोबिक्विक वॉलेट लोड करा म्हणजेच त्यात पैसे भरा. तुम्ही यूपीआय, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड यांच्या माध्यमातून वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता.
३. एकदा वॉलेटमध्ये बॅलन्स आला म्हणजे तुम्ही ते वॉलेट वापरून कोणत्याही क्यूआर कोडवर, कॉण्टॅक्टला (संपर्कयादीतील क्रमांकांना) व यूपीआय आयडीला पेमेंट करू शकता.
पॉकेट यूपीआय वापरून पैसे चुकते कसे करावे?
१. स्कॅन आयकनवर टॅप करा.
२. प्राप्तकर्त्याचा क्यूआर कोड स्कॅन करा किंवा नाव/फोन क्रमांक/यूपीआय आयडी बॉटम बारमध्ये एण्टर करा.
३. इच्छित रक्कम भरा.
४. ड्रॉप-डाउन मेन्यूमधून पॉकेट यूपीआय निवडा.
५. कन्फर्म पेमेंटवर टॅप करा.
पेमेंट झाल्यानंतर मोबिक्विक तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे अॅलर्ट पाठवेल. त्यात पेमेंटची आणि तुमच्या वॉलेटमधील उर्वरित रकमेची पुष्टी केली जाईल.
पॉकेट यूपीआय कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचा ब्लॉग (blog) बघा. पॉकेट यूपीआय प्रत्यक्षात कसा वापरला जातो ते बघण्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओही बघू शकता: Know how to use Pocket UPI.

Related posts

हार्ले-डेव्हिडसन X440ची डिलिव्हरी १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार बुकिंग विंडो १६ ऑक्टोबर, २०२३ पासून पुन्हा खुली होणार

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ३३ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

राज्यातील ग्रामीण तरुणांच्या सक्षमीकरणासाठी सलाम किसानचा उपक्रम

Shivani Shetty

Leave a Comment