मुंबई, २५ जानेवारी २०२३: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या उत्पादनांच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांचे पहिले शोरूम मेसर्स सौरभ व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन केले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले हे शोरूम ग्राहकांना वैविध्यपूर्ण ईव्ही खरेदी अनुभव देते आणि प्रदेशामध्ये ईव्ही अवलंबतेबाबत जागरूकता वाढवते.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) आय.पी.एस. श्री. विजय कुमार मगर आणि डॉ. अजित शिंदे – आरटीओ पुणे यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. हे शोरूम १७०० चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि २२ व २३, गगन सिग्नेट, गंगाधाम-कोंडवा रोड, नाना नानी पार्कजवळ, कोंडवा बीके, पुणे – ४११०४८ येथे स्थित आहे.
या शोरूमची प्रमुख खासियत म्हणजे ग्राहकांना गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून देण्यात आलेल्या ३एस सुविधा मिळतील. हे शोरूम ब्रॅण्डच्या प्रवासाला देखील दाखवेल आणि ग्राहकांच्या एण्ड-टू-एण्ड ईव्ही गरजांसाठी सिंगल टच पॉइण्ट बनेल.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, ‘‘आम्हाला देशातील ऑटोमोबाइल हबचे केंद्र पुण्यामध्ये प्रवेश करण्याचा आनंद होत आहे. प्रांतामध्ये गोदावरीच्या ईव्ही दृष्टीकोनाचे नेतृत्व करण्यासाठी श्री. सौरभ डोळस हे योग्य सहयोगी आहेत. हे महाराष्ट्रातील अनेक शोरूम्सपैकी पुण्यातील आमचे पहिलेच शोरूम आहे आणि आमचा ब्रॅण्ड व उत्पादनांचा सर्वांगीण अनुभव देण्याचा मनसुबा आहे. आम्ही नुकतेच उत्पादनांच्या इब्लू श्रेणीच्या लाँचसह आमच्या प्रवासाला सुरूवात केली आणि आमचा विश्वास आहे की, प्रांतामध्ये झपाट्याने ईव्ही परिवर्तन होत आहे. आम्ही अधिकाधिक शोरूम्स, उत्पादनांच्या माध्यमातून आमची उपस्थिती वाढवत राहू आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम ईव्ही मालकीहक्क अनुभव देऊ.’’
शोरूम नुकतेच लाँच करण्यात आलेली ई-ऑटो (एल५एम) आणि ई-सायकल श्रेणी इब्लू स्पिन देखील दाखवेल, जी तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक शोरूममध्ये येऊन उत्पादनांचा अनुभव घेऊ शकतात आणि त्यांच्या बुकिंग्ज पूर्ण करू शकतात. गोदावरीने ग्राहकांना कर्ज सुविधा देण्यासाठी अग्रगण्य बँका व एनबीएफसींसोबत देखील सहयोग केला आहे. दोन्ही उत्पादनांसाठी डिलिव्हरींना या महिन्याच्या शेवटी सुरूवात होईल.