maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

गो फर्स्टचा इझमायट्रिपसह भागीदारी करार

मुंबई, ६ डिसेंबर २०२२: गो फर्स्ट या पूर्वीच्या गोअरने या महिन्यापासून सौदी अरेबियामधील प्रवाशांना प्रवासी तिकिटे विक्री, प्रमोट व विपणन करण्यासोबत इतर सेवा देण्यासाठी भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन टेक ट्रॅव्हल व्यासपीठ इझमायट्रिपसोबत विशेष जनरल सेल्स अॅग्रीमेंटवर (जीएसए) स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम आशियामधील सर्वात मोठ्या पर्यटन बाजारपेठेमध्ये लाभदायी व्यावसायिक संबंध व व्यापक उपस्थिती साध्य करण्यासाठी इझमायट्रिप स्वतंत्र ब्रॅण्डेड कार्यालय सरू करत आणि व्यापक पर्यटन बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करण्याकरिता दम्मम व रियाध, सौदी अरेबिया व इतर ठिकाणी विमानसेवा सादर करत गो फर्स्टच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करेल.

हा तीन वर्षांचा विशेष भागीदारी करार दोन्ही ब्रॅण्ड्सना सौदी अरेबियामध्ये त्यांच्या सेवा श्रेणीचा विस्तार आणि वाढ करण्यासाठी योग्य संधी देतो. इझमायट्रिप आपली व्यापक पोहोच, सर्वसमावेशक विपणन हस्तक्षेप आणि स्थानिक ठिकाणांबाबत असलेल्या माहितीसह गो फर्स्टला सौदी अरेबिया व स्थानिकांसाठी योग्य योजना देण्यामध्ये मदत करेल, ज्यामुळे त्यांच्या पर्यटन अनुभवामध्ये वाढ होईल. तसेच हा सहयोग परिसरातील इतर सर्व ट्रॅव्हल एजंट्सना इझमायट्रिपवर परचेस सर्किट निर्माण करण्यास मदत करेल, जेथे ते सौदी अरेबियामधून गो फर्स्ट तिकिटे खरेदी करू शकतील.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “इझमायट्रिपमध्ये आम्हाला माहित आहे की, सौदी अरेबियामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात आणि स्थानिक निवासींना देखील पर्यटनावर जायला आवडते. हे शहर लक्षणीयरित्या गजबजलेले पर्यटन बाजारपेठ आहे, जे अधिक उत्तम पर्यटन अनुभवाची मागणी करत आहे. जगभरातील बहुतांश संस्था व व्यवसायांमधील आमच्या यशस्वी प्रयत्नांसह आमची सौदी अरेबियामधील बाजारपेठेत प्रवेश करण्याचा आणि अधिक समर्पिततेसह पर्यटकांना सेवा देण्याचा प्रयत्‍न करतो. आम्हाला अनेक‍ आंतरराष्ट्रीय गंतव्यांमधील सर्वात लोकप्रिय व किफायतशीर विमानसेवा गो फर्स्टसोबत जीएसए भागीदार म्हणून आमचा प्रवास सुरू करण्याचा आनंद होत आहे.’’

Related posts

यंदा सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ५ सूचना

Shivani Shetty

कॉर्पोरेट ट्रॅव्हल बुकिंग व्यासपीठ पॅक्सेस संपूर्ण भारतात लॉन्चसाठी सज्ज

Shivani Shetty

क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट

Shivani Shetty

Leave a Comment