maharashtraprimenews
ठळक बातम्या
Healthठळक बातम्या

लेम्‍मे बी च्‍या नवीन लॉन्‍चसह मासिक पाळीदरम्‍यान येणारे पेटके व वेदनेपासून आराम मिळवा

 

मुंबई,११नोव्हेंबर २०२२: लेम्‍मे बीने मासिक पाळीदरम्‍यान येऊ शकणाऱ्या त्रासदायक वेदनेपासून आराम देण्‍यासाठी त्‍यांचे नवीन पेन-ओ-पॉज पेन रीलीफ हीट पॅच लॉन्‍च केले. मासिक पाळीदरम्‍यान येणारे पेटके सहन करण्‍याचे दिवस आता गेले आहेत. आज, आपण या पेटक्‍यांचे निर्मूलून करू शकतो आणि पेटके सहन करण्‍याऐवजी किंवा त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍याऐवजी त्‍यांचा सामना करू शकतो.

पेन-ओ-पॉजची खासियत म्‍हणजे ते मासिक पाळीमध्‍ये होणाऱ्या वेदनेपासून आराम देण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर गोष्‍टींसाठी देखील वापरले जाऊ शकते. पाठदुखी असो, खांद्याचे दुखणे असो किंवा स्‍नायूमधील क्रॅम्‍प्‍स असो पेन-ओ-पॉज या सर्वांमध्‍ये आराम देते.

हे पॅचेस् सेल्‍फ-हिटिंग आहेत, म्‍हणजेच ते जवळपास ५ ते १५ मिनिटांत हवेच्‍या संपर्कात येताच गरम होण्‍यास सुरूवात होते. व्‍यक्‍ती दिवसादरम्‍यान ८ तासांपर्यंत हीट पॅच आरामदायीपणे वापरू शकते. यामधून सतत उष्‍णता मिळते. साहित्‍य १०० टक्‍के सेंद्रिय आहे आणि पॅकेजिंग सुलभपणे वाहून नेता येण्‍यासाठी आणि बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे.

हीट पॅचच्‍या लॉन्‍चबाबत बोलताना लेम्‍मे बीच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी देवीदत्त दास म्‍हणाल्‍या, ‘’मासिक पाळीदरम्‍यान येणारे पेटके आणि त्‍यामुळे होणारी अस्‍वस्‍थता जागतिक स्‍तरावर दीर्घकाळापासून समस्‍या राहिली आहे. आणि यापासून आराम मिळण्‍याकरिता एकमेव ज्ञात उपाय म्‍हणजे गोळी घेणे, पण गोळी घेण्‍याचे देखील दुष्‍पारिणाम होऊ शकतात. म्‍हणूनच आमच्‍या पेन रीलीफ हीट पॅचच्‍या लॉन्‍चसह आमचा भारतातील मासिक पाळी येणाऱ्या महिलांना आराम देण्‍यासोबत अनेक वर्षांपासून सहन करत आलेल्‍या अस्‍वस्‍थतेला आता अधिक सहन करण्‍याची गरज नसल्‍याचे सांगण्‍याचा मनसुबा आहे. हीट पॅच त्‍यांचा आरामदायीपणा लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आले आहे. आम्‍ही आशा करतो की मासिक पाळी आणि त्‍यानंतर होणारे पीएमएस अत्‍यंत तणावपूर्ण असल्‍यामुळे हे हीट पॅच अत्‍यावश्‍यक रीलीफ देईल.’’

● हे पॅक २ प्रकारांमध्‍ये येते:

○ पॅक ऑफ १

○ पॅक ऑफ ५

● पॅक ऑफ १ ची किंमत ११० रूपये आहे आणि पॅक ऑफ ५ ची किंमत ४९९ रूपये आहे.

 

Related posts

आयडियाफोर्ज (ideaForge)द्वारे एनडब्ल्यू (NW) इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड सोबत गुंतवणूक करारावर स्वाक्षरी

Shivani Shetty

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिवसेना जिल्हाप्रमुखाचे झेडपी सदस्यत्व रद्द

cradmin

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

cradmin

Leave a Comment