maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्या

बँक ऑफ बडोदाने व्हिजाच्या सोबत प्रीमियम डेबिट कार्ड्स- बीओबी वर्ल्ड ओप्युलन्स (मेटल एडिशन) आणि बीओबी सफायर कार्ड्स ची सुविधा

मुंबई, 1.नोव्हेंबर, 2022: बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील आघाडीच्या बँकेने ग्लोबल लीडर इन डिजिटल पेमेंट्स व्हिजाच्या सहयोगाने, आज, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीमियम डेबिट कार्ड्स आणल्याची घोषणा केली. बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स हे सुपर प्रीमियम व्हिसा इन्फिनाइट डेबिट कार्ड आणि बीओबी वर्ल्ड सफायर हे व्हिजाचे सिग्नेचर डेबिट कार्ड या दोन डेबिट कार्ड्सची घोषणा बँकेने केली आहे. डेबिट कार्डाचे दोन्ही प्रकार, बँकेच्या हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल (HNI) प्रवर्गात मोडणाऱ्या ग्राहकांसाठी, खास विकसित करण्यात आले असून, ते सर्वोत्तम व प्रभावी प्रतिफल (रिवॉर्ड्स) विधानांनी युक्त आहेत. बीओबी वर्ल्ड सफायर कार्ड बीओबी वर्ल्ड सफायर (पुरुषांसाठी) व बीओबी वर्ल्ड सफायर (स्त्रियांसाठी) अशा दोन प्रकारांत उपलब्ध होणार आहे. भारतातील आघाडीच्या बॅडमिंटनपटू तसेच बँक ऑफ बडोदाच्या ब्रॅण्ड एण्डॉर्स श्रीमती पीव्ही सिंधू यांच्या हस्ते एका सोहळ्यात या कार्डांचे अनावरण झाले.
आपल्या HNI ग्राहकांची अभिरूची व प्राधान्यक्रम लक्षात घेऊन बँक, अनेकविध लग्झरी ब्रॅण्ड्सच्या माध्यमातून, त्यांना खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा खरेदी व जीवनशैली अनुभव उपलब्ध करून देत आहे. याशिवाय अतिरिक्त मूल्याची भर घालण्याच्या उद्देशाने बँकेने आणखी एक पाऊल टाकत सिग्नेचर कार्डच्या माध्यमातून आपल्या पुरुष व स्त्री ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत.
बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक (एग्झिक्युटिव डायरेक्टर) श्री. जॉयदीप दत्ता रॉय म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या गरजा, प्राधान्यक्रम आणि महत्त्वाकांक्षांचे स्तर जशी निर्माण होत जातात, तशीच उत्पादने आम्ही विकसित करण्यास तत्पर आहोत. आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये दोन प्रीमियम डेबिट कार्डांची भर घालत आहोत आणि आमच्या हाय नेटवर्थ ग्राहकांसाठी दोन हाय-एण्ड प्रकारची कार्ड्स आणण्यासाठी व्हिजासोबत सहयोग करत आहोत याच आम्हाला आनंद आहे. आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा अनुरूप आणि आम्ही त्यांना वैशिष्ट्यपूर्ण व प्रतिफलदायी अनुभव देण्यास उत्सुक आहोत. बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स- व्हिजा इन्फिनाइट (मेटल एडिशन) आणि बीओबी वर्ल्ड सफायर- व्हिजा सिग्नेचर ही डेबिट कार्ड श्रेणी हे ज्याचा लाभ बरेच ग्राहकांना घेऊ शकतात.”
बँक ऑफ बडोदाचे प्रमुख डिजिटल अधिकारी (चीफ डिजिटल ऑफिसर) श्री. अखिल हांडा म्हणाले, “बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स-इन्फिनाइट (मेटल एडिशन) डेबिट कार्ड हे खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेचे प्रतीक आहे, या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन असलेल्या कार्डाद्वारे लाभांचे एक संधी उपलब्ध होणार आहे. बीओबी वर्ल्ड सफायर कार्ड हे ‘हिम’ व ‘हर’ या संकल्पनांसह वैशिष्ट्यपूर्ण अनुभव उपलब्ध करत आहे. डेबिट कार्डांचे हे दोन नवीन प्रकार ग्राहकांसाठी आणताना आम्हाला फार आनंद होत आहे आणि ग्राहकांसाठी ही कार्ड्स खूपच लाभदायक ठरणार आहे.”
व्हिजाचे भारत व दक्षिण आशियासाठीचे ग्रुप कंट्री मॅनेजर श्री. संदीप घोष म्हणाले, “आजच्या ग्राहकांना त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणारी कस्टमाइझ्ड पेमेंट उत्पादने हवी आहेत. उच्चभ्रू ग्राहकांकरता, व्हिजा इन्फिनाइट व सिग्नेचर प्लॅटफॉर्म्सवरील प्रीमियम डेबिट कार्डे देण्यासाठी, बँक ऑफ बडोदासोबत सहयोग केल्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो. खरेदीचे प्राधान्यक्रम व महत्त्वाकांक्षांमध्ये जलद गतीने बदल होत असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेली ही कार्डे सर्व डिजिटल पेमेंट चॅनेल्सद्वारे सोयीस्कर, सुरक्षित व अखंडित वापराची सुविधा पुरवतात. वैशिष्ट्यपूर्ण मूल्यविधानामुळे उच्चभ्रू ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या आकर्षक डेबिट कार्डांचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे.”
पूर्वीपासूनचे ग्राहक बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स- व्हिजा इन्फिनाइट (मेटल एडिशन) डेबिट कार्ड किंवा बीबीओ वर्ल्ड सफायर- व्हिजा सिग्नेचर डेबिट कार्ड प्राप्त करण्यासाठी कोणत्याही ब्रांचमार्फत किंवा बीओबी वर्ल्ड मोबाइल बँकिंग अॅपद्वारे अर्ज करू शकतात. नवीन ग्राहक बँक ऑफ बडोदामध्ये बचतखाते उघडून आणि त्यानंतर त्यांना हवे असलेले कार्ड निवडून या दोनपैकी कोणत्याही डेबिट कार्डासाठी अर्ज करू शकतात.

बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स- व्हिजा इन्फिनाइट (मेटल एडिशन) डेबिट कार्डाची वैशिष्ट्ये व लाभ
● मोफत विमानतळ पिकअप व ड्रॉप सेवा
● अंतरराष्ट्रीय विमानतळांवर अमर्यादित लाउंज व्हिजिट्स
● देशांतर्गत विमानतळांवर अमर्यादित लाउंज प्रवेश
● क्लब मॅरियटचे सदस्यत्व वर्षभरासाठी मोफत
● गोल्फ प्रोग्राम: निवडक गोल्फ कोर्सेसची सत्रे मोफत
● आरोग्य व स्वास्थ्यविषयक लाभ- निवडक ब्रॅण्ड्सवर सवलती/व्हाउचर्स/सदस्यत्व
● मोफत भोजन सुविधा व निवडक हॉटेल्समध्ये क्युरेटेड अनुभव
● प्रीमियम ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स: सत्या पॉल, ट्रुफिट अँड हिल, ब्रूक्स ब्रदर्स व हाउस ऑफ मसाबा यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स
● व्हिजा लग्झरी हॉटेल कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या काही निवडक हॉटेल्समध्ये रूम अपग्रेड्स, लेट चेकआउट्स, मोफत सुविधा
● सदस्यत्व शुल्क (जॉइनिंग फी): 9,500/- रुपये (पहिल्या वर्षासाठी)
● वार्षिक शुल्क: 9,500/ रुपये ( 2 ऱ्या वर्षापासून पुढे)

बीओबी वर्ल्ड सफायर- व्हिजा सिग्नेचर डेबिट कार्डाची वैशिष्ट्ये व लाभ
● मोफत विमानतळ पिकअप व ड्रॉप सेवा
● देशांतर्गत विमानतळाच्या लाउंजमध्ये प्रवेश
● प्रीमियम ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स: सत्य पॉल, ट्रुफिट अँड हिल व हाउस ऑफ मसाबा यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स
● व्हिजा लग्झरी हॉटेल कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या काही निवडक हॉटेल्समध्ये रूम अपग्रेड्स, लेट चेकआउट्स, मोफत सुविधा
● लाइफस्टाइल ब्रॅण्ड्सतर्फे 750 रुपयांचे स्वागत व्हाउचर
● खास स्त्रियांसाठी लाभ: लेबल रितू कुमार, कल्की फॅशन व सोनाटासारख्या ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स
● खास पुरुषांसाठी लाभ: रेअर रॅबिट, रेमंड्स आणि अरविंद फॅशन्स (यांत यूएस पोलो असोसिएशन, टॉमी हिलफिगल, कॅल्विन क्लाइन, एअरोपोस्टल, अॅरो आदी प्रीमियम ब्रॅण्ड्सचा समावेश होतो) आदी ब्रॅण्ड्सच्या ऑफर्स
● सदस्यत्व शुल्क (जॉइनिंग फी): 750/- रुपये (पहिल्या वर्षासाठी)
● वार्षिक शुल्क: 750/- रुपये (2ऱ्या वर्षापासून पुढे

Related posts

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

Shivani Shetty

इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेडचा अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCD) ट्रान्चे I इश्यू खुला . कूपनचा दर, दरवर्षाला 10.30% पर्यंत# प्रभावी उत्पन्न दरवर्षाला 10.30% पर्यंत#

Shivani Shetty

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2023: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आगमुक्त राज्य करण्यासाठीचा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment