मुंबई, २३ जुलै २०२४: पेटीएमने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्यातिमाहीसाठी आर्थिक निकालांसाठी घोषणा केली आहे, ज्यामधून विविधघटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्याकार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्या ईबीआयटीडीए तोट्याचीनोंद केली आहे. कंपनीसाठी नुकतेच व्यत्ययांचा संपूर्ण आर्थिक परिणामआर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत दिसून येऊ शकतो. कंपनीनेसांगितले की व्यापारी पेमेंट मेट्रिक्स जसे जीएमव्ही, जलद व्यापारीसक्रियकरण आणि वाढत्या व्यापारीवर्गासह खर्च कमी करण्यासाठीसातत्याने केले जाणारे प्रयत्न यामुळे महसूल व नफ्यामध्ये वाढ होईल.
आर्थिक सेवांमधून महसूल २८० कोटी रूपये राहिला, तर विपणन सेवांमधूनमहसूल ३२१ कोटी रूपये राहिला. तिमाहीदरमयान योगदान नफा ७५५ कोटीरूपये राहिला, ज्यामध्ये मार्जिन ५० टक्के होते.
पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला आमच्या व्यापारी कार्यसंचालनमेट्रिक्समध्ये सुधारणा आणि आमच्या ग्राहकवर्गामध्ये स्थिरता दिसून येतआहे, ज्यामधून आमची रिकव्हरीची गती निदर्शनास येते. तसेच, यामधूनआमच्या प्लॅटफॉर्मवरील आमचे व्यापारी सहयोगी व ग्राहकांचासातत्यपूर्ण विश्वास देखील दिसून येतो आणि आम्ही ही निष्ठादाखवण्यासाठी आमच्या भागधारकांचे आभार व्यक्त करतो. पहिल्यातिमाहीत नुकतेच व्यत्ययांचा परिणाम दिसण्यात आला असला तरीआम्हाला भविष्यात शाश्वत विकास होत राहण्याचा विश्वास आहे.”
कंपनीच्या ताळेबंदमध्ये ८,१०८ कोटी रूपये रोख आहे. तसेच, कंपनीचा पेपेकॉर्पोरेशनमध्ये ५.४ टक्क्यांचा स्टॉक संपादन अधिकार आहे.
पेटीएम ग्राहकांना कर्ज, संपत्ती उत्पादने व विमा अशा श्रेणींमध्ये त्यांच्यागरजांनुसार सर्वोत्तम सेवा देते. कंपनीने सांगितले की व्यापारी माहितीचावापर करत कंपनीला त्यांच्या शॉप इन्शुरन्स सेवांच्या वितरणामध्ये उत्तमसमन्वय दिसण्यात आला आहे. ग्राहकांसंदर्भात, एम्बेडेड व डीआयवायविमा उत्पादने जसे मोटर विमाची उत्तम प्रगती दिसण्यात आली आहे. आरोग्य विमासंदर्भात, पेटीएम आरोग्य विमा, आरोग्यसेवा व ओपीडीफायदे यांचा समावेश असलेल्या उत्पादनांची श्रेणी देत आहे आणिव्यापारी सहयोगींसाठी संरक्षण प्लॅन्स देखील लाँच केले आहेत.
कंपनीने सांगितले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर साइनअप केलेल्या नवीनव्यापाऱ्यांची आकडेवारी जानेवारी २०२४ पातळ्यांवर पोहोचली आहे. तसेच, निष्क्रिय व्यापाऱ्यांकडून नवीन व्यापाऱ्यांकडे डिवाईसेसचे हस्तांतरणकरण्याच्या प्रयत्नांमुळे व्यापारी ग्राहकवर्ग (किंवा डिवाईस मर्चंट्स) १.०९कोटींपर्यंत वाढला आहे. नोएडा–स्थित पेमेंट्स कंपनीने सांगितले की, कंपनीला निव्वळ डिवाईस मर्चंट आकडेवारी आर्थिक वर्ष २०२५ च्यातिसऱ्या तिमाहीपर्यंत आधीच्या दरापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मर्चंटपेमेंट्स कार्यसंचालन मेट्रिक्स पुन्हा जानेवारी २०२४ पातळ्यांवर परतले.
दैनंदिन सरासरी जीएमव्ही (विघ्न आणणारी उत्पादने वगळून) तिमाहीदरम्यान सतत सुधारणा दाखवत आहे आणि सकारात्मक राहतजानेवारी २०२४ पातळ्यांपर्यंत पोहोचत आहे. एकूण जीएमव्ही दरमहिन्याला वाढत आहे आणि जून तिमाहीसाठी ४.३ लाख कोटी रूपये आहे.