maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पूनावाला हाउसिंग फायनान्स लि. आता झाली आहे गृहम हाउसिंग फायनान्स लि.


पुणे आणि मुंबई, भारत, 12 डिसेंबर 2023
: पूनावाला हाउसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या मालकीमध्ये बदल होऊन आता गृहम हाउसिंग फायनान्स लिमिटेड (“GHFL”)असे या कंपनीचे नामकरण झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पूनावाला फिनकॉर्प यांच्याकडून टीपीजी या जागतिक पातळीवरील खासगी इक्विटी फर्मने या कंपनीचा 99.02% हिस्सा संपादित केला. नावबदलासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियामक मंजुरी प्राप्त झाल्या आहेत.

जीएचएफएलने व्यवस्थापनांतर्गत मत्तेच्या बाबतीत ~₹7,500 कोटींचा महत्त्वाचा टप्पा साध्य केला आहे. गेल्या 6 वर्षांत सुमारे 28% सीएजीआर ने त्यांची वाढ होत आहे. त्यांच्या ग्राहकसंख्येने 75,000 चा आकडा पार केला आहे. सर्व ठिकाणी असलेल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी असलेल्या 195 शाखांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना सेवा प्रदान करण्यात येते. सुमारे 85% ग्राहक या माहिला (अर्जदार व सह-अर्जदार समाविष्ट करून) आहेत. यातून कंपनीचा लिंगसमानतेचा दृष्टिकोन दिसून येतो. कंपनीची निव्वळ मत्ता ₹1800 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय विस्तारीकरणासाठी आणि त्याच्या फायद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठा वाव आहे.

रिब्रँडिंगबद्दल गृहम हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनिष जैसवा म्हणाले, गृहममध्ये गृह आणिहम (एकत्रितपण) या दोन शब्दांच मिश्रण केलेल आहे. या नावात आमच्या कंपनीचे सार सामावलेले आहे. आमच्या ग्राहकाच्या स्वप्नातील घर निर्माण करण्यासाठी सहयोग व एकतेला चालना देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. यांच्यापैकी अनेक जण निमशहरी, शहराच्या सीमेवरील भागांमधील, देशातील ग्रामीण भागांतील शून्यातून जग उभारलेले व मायक्रो-एंटरप्रेनर्स आहेत.

जीएफएचएल आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. भारतातील लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी (शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा) विस्तारत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व डिजिटल पायाभूत सुविधा प्रगत होत आहेत आणि पेमेंट मोड्युल्सही भक्कम आहेत. निमशहरी, शहराच्या सीमेवरील भागांमधील आणि ग्रामीण बाजारपेठेतील वेगाने होणाऱ्या संरचनात्मक आर्थिक विकासामागे देशाच्या लोकसंख्येचा लाभांश हा चालना देणारा घटक आहे.

ग्राहकांचे अनुभव अधिक चांगले करण्यासाठी व व्याप्तीचा लाभ घेण्यासाठी सखोल डिजिटल परिवर्तनात्मक बदल करणे आम्ही सुरू केले आहे. कारण आजही एक कोटींहून अधिक भारतीयांचे स्वतःच्या मालकीचे घर नाही. मध्यमवर्गाचे वाढलेले प्रमाण, दरडोई वाढलेला जीडीपी, दरडोई प्रति चौरस फूट जागेची वाढती गरज आणि विभक्त कुटुंबांची वाढती संख्या यामुळे भाडे व ईएमआयच्या प्रमाणात बदल होत आहे. त्यामुळे घर खरेदी करणे अधिक सुलभ झाले आहे आणि म्हणूनच परवडणाऱ्या घरांची मागणी वाढतच जाणार आहे. गेल्या सहा वर्षात आमचा विस्तार चार पट झाला आहे. गेल्या सहा वर्षांत आमच्या एयूएमची सुमारे 28% सीएजीआरने वाढ झाली आहे आणि सध्याचे अनुकूल वातावरण पाहता येत्या काळात वाढीचा वेग असाच कायम राहील, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही किमान दहा लाख लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकू, असा आमचा प्रयत्न आहे आणि या प्रवासात आम्ही आम्ही एक तृतियांश लोकांपर्यंत पोहोचलो आहोत., अशी पुष्टी श्री. जैसवाल यांनी जोडली.

टीपीजी कॅपिटल एशियाचे सह-व्यवस्थापकीय भागीदार श्री. पुनित भाटिया म्हणाले, गृहम हाउसिंग फायनान्स हे ब्रँड नाव शून्यातून विश्व निर्माण केलेल्या ग्राहकांचे द्योतक असेल आणि त्यांच्या कंपनीवरील त्यांचा विश्वास सार्थ करेल. एकूण हाउसिंग फायनान्स क्षेत्राच्या तुलनेने वेगाने वाढणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या या फार स्पर्श न झालेल्या क्षेत्रामध्ये ही कंपनी आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे. गृहम हाउसिंग फायनान्सच्या प्रगतीला पाठबळ देण्याचा आमचा निर्धार आहे.

Caption for enclosed photo: Manish Jaiswal, Managing Director and Chief Executive Officer, announcing the renaming of Poonawalla Housing Finance Limited as Grihum Housing Finance Limited, in Mumbai on December 12.

About Grihum Housing Finance Limited

Grihum Housing Finance Limited (formerly Poonawalla Housing Finance Limited) is a national-scale affordable housing finance company with a presence across 19 states and Union Territories and ~195 branches, catering to 75,000+ customers. The Company has an AUM of ₹ ~7,500+ crores with ~74% of its on-book assets as affordable home loans, averaging a ticket size of ~₹ 10 lakhs. GHFL is engaged in making homeownership a reality for those overlooked by India’s mainstream lenders through its brand tagline, “Apna Ghar, ApniPehchan (My home, My identity)”. The Company primarily serves through its model of GO Direct – Go HL, and strong in-house capabilities.

For more information, please visit www.grihumhousing.com

About TPG

TPG is a leading global alternative asset management firm, founded in San Francisco in 1992, with $212 billion of assets under management and investment and operational teams around the world. TPG invests across a broadly diversified set of strategies, including private equity, impact, credit, real estate, and market solutions, and our unique strategy is driven by collaboration, innovation, and inclusion. Our teams combine deep product and sector experience with broad capabilities and expertise to develop differentiated insights and add value for our fund investors, portfolio companies, management teams, and communities. For more information, visit www.tpg.com.

Related posts

हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशनसाठी किया इंडियाची मॅप माय इंडियाशी हातमिळवणी

Shivani Shetty

सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी ‘पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

Shivani Shetty

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

Shivani Shetty

Leave a Comment