मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४: जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशन (फेडएक्स) ही युनायटेड वे मुंबईच्या सक्षम उपक्रमामार्फत समावेशक उद्योजकतेला समर्थन देत एक कॉर्पोरेट नागरिक म्हणून आपली भूमिका मजबूत करत आहे. स्थानिक मानवतावादी भागीदारांशी सहयोग करून फेडएक्स भारताच्या वैविध्यपूर्ण आणि गतिशील अर्थव्यवस्थेत आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्यांक उद्योजकांना संसाधने, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करत आहे.
या उपक्रमासह फेडएक्स भारतात सर्वसमावेशक उद्योजकतेस प्रोत्साहन देत असून महिला आणि एलजीबीटीक्यूआयए+ लघु व्यवसाय मालकांना सक्षम बनवत आहे. २०२१ पासून सक्षम हा उपक्रम टेलरिंग, अन्न सेवा आणि ब्युटी सेवांसहित विविध क्षेत्रातील लघु व्यवसाय मालकांना स्थानिक बाजारपेठांच्या मागणीनुसार काळजीपूर्वक बनवलेली बिझनेस किट प्रदान करत आला आहे.
फेडएक्सच्या इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष सुवेन्दू चौधरी यांनी टिप्पणी केली, “लघु आणि मध्यम उद्योग आर्थिक वृद्धीसाठीचे चालक बळ आहे, तरीही अनेक उद्योजकांमध्ये यशस्वी होण्यासाठी संसाधने नाहीत. सक्षम उपक्रम महिला आणि एलजीबीटीक्यूआयए+ उद्योजकांमधील दरी भरून काढतो आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक संसाधने आणि मोकळा मार्ग प्रदान करतो. भारताच्या एसएमई ईकोसिस्टममध्ये त्यांच्या भरभराटीसाठी मदत करण्यास आणि भारताच्या सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या ध्येयाला समर्थन देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”
२०२१ मध्ये लॉन्च झाल्यापासून सक्षम उपक्रम हा फेडएक्स ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप सीएसआर स्तंभाची आधारशीला असून हा उपक्रम शाश्वत उपजीविकेच्या उभारणीसाठी वंचित समूहांना साधने पुरवून सक्षम बनवत आहे. सक्षमच्या माध्यमातून आर्थिक आत्म-निर्भरतेला प्रोत्साहन देण्यात फेडएक्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जे लघु उद्योगांना समर्थन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनुसरून आहे.