maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फ्रॉड अवेअरनेस वीक: लिंक्‍डइनने व्‍यावसायिकांना सुरक्षितपणे रोजगार शोधण्‍यास साह्य करण्‍यासाठी टिप्‍स व टूल्‍स सांगितले

भारत, २५ नोव्‍हेंबर २०२४: रोजगाराचा शोध घेण्‍यास सुरूवात करणे उत्‍साहवर्धक व आव्‍हानात्‍मक असू शकते, विशेषत: व्‍यापक ऑनलाइन लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना आव्‍हानांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीसाधकांनी सुरक्षितपणे रोजगाराचा शोध घेण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. ही सावधगिरी बाळगण्‍यासाठी ते जॉब पोस्टिंग्‍जबाबत संशोधन करू शकतात, पोस्‍टरच्‍या ओळखीचे सत्‍यापन करू शकतात आणि ते शेअर करणाऱ्या माहितीबाबत काळजी घेऊ शकतात.

 

लिंक्‍डइन इंडियाच्‍या लीगल अँड पब्लिक पॉलिसीच्‍या प्रमुख अदिती झा (Aditi Jha, Head – Legal & Public Policy, LinkedIn India) म्‍हणाल्‍या, ‘’नोकरीसाधक लिंक्‍डइनकडे वळतात, कारण तो संभाव्‍य नियोक्‍त्‍यांशी कनेक्‍ट होण्‍याकरिता आणि नवीन करिअर संधींचा शोध घेण्‍यासाठी विश्‍वसनीय प्‍लॅटफॉर्म आहे. सुरक्षित, व्‍यावसायिक प्‍लॅटफॉर्म राखण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमुळे आम्‍ही सदस्‍यांना मोफत सत्‍यापन सेवा देतो आणि आमची ट्रस्‍ट टीम ९९ टक्‍के फसवे अकाऊंट्स तुमच्‍यापर्यंत पोहोचण्‍याआधीच त्‍यांना थांबवण्‍यासाठी निरंतरपणे काम करते.’’

 

अदिती झा तुम्‍हाला सुरक्षितपणे रोजगार शोधण्‍यास साह्य करण्‍यासाठी काही आवश्‍यक टिप्‍स व टूल्‍स सांगत आहेत:

1. जॉब पोस्टिंग्‍जवर सत्‍यापित माहिती तपासा: जॉब पोस्टिंगवर व्‍हेरिफिकेशन बॅज (verification badge on a job posting) म्‍हणजे कंपनी किंवा जॉब पोस्‍टरबाबत सत्‍यापित माहिती आहे. पोस्‍टर अधिकृत कंपनी पेजशी संलग्‍न असेल तर विशिष्‍ट वर्कप्‍लेससोबतचा त्‍याचा सहयोग सत्‍यापित केलेला आहे किंवा आमच्‍या एका आयडेण्टिटी व्‍हेरिफिकेशन सहयोगींच्‍या माध्‍यमातून त्‍यांची ओळख सत्‍यापित करण्‍यात आलेली आहे असा अर्थ होतो.

 

2. तुम्‍ही शेअर करणाऱ्या माहितीबाबत काळजी घ्‍या: तुम्‍हाला कोणत्‍याही माहितीबाबत विचारण्‍यात आले आहे याबाबत काळजी घ्‍या. ऑनबोर्डिंग प्रक्रियेपूर्वी बँकेसंदर्भातील माहिती कधीच सांगू नका.

 

3. संशयास्‍पद विनंत्‍यांना ‘नाही’ म्‍हणा: घोटाळेबाज अशी तंत्रे वापरू शकतात, जी कायदेशीर नियोक्‍ते वापरणार नाहीत, जसे तुम्‍हाला मुलाखतीसाठी एन्क्रिप्‍टेड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्‍यास सांगितले जाऊ शकते किंवा कमी कामासाठी उच्‍च पगाराची नोकरी ऑफर केली जाऊ शकते. फक्‍त एका दूरस्‍थ मुलाखतीनंतर नोकरी मिळणे अत्‍यंत क्‍वचित कायदेशीर डिल असू शकते. तुम्‍ही घोटाळे आणि अयोग्‍य कन्‍टेन्‍टबाबत तक्रार (report spam and inappropriate content) करू शकता.

4. मेसेज वॉर्निंग्‍ज अनेबल करा: लिंक्‍डइनच्‍या घातक कन्‍टेन्‍टचे पर्यायी ऑटोमेटेड डिटेक्‍शन (LinkedIn’s optional automated detection of harmful content,) अनेबल करा, जे संभाव्‍य घातक घोटाळ्यांना ओळखू शकते.

 

5. रेड फ्लॅग्‍जकडे लक्ष ठेवा (धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा): खरे वाटणाऱ्या किंवा आगाऊ पेमेंट्सची मागणी करणाऱ्या जॉब पोस्टिंग्‍जबाबत सावधिगिरी बाळगा. सामान्‍य घोटाळ्यांमध्‍ये मिस्‍टरी शॉपर, कंपनी इम्‍पर्सोनेटर किंवा पर्सनल असिस्‍टण्‍ट अशा पदांचा समावेश असतो. तसेच पैसे, क्रिप्‍टोकरण्‍सी, गिफ्ट कार्डस पाठवण्‍यास किंवा गुंतवणूक करण्‍यास सांगणाऱ्यांपासून सावध राहा.

 

 

6. सत्‍यापनांसह रोजगाराचा शोध फिल्‍टर करा: तुम्‍ही आता फक्‍त सत्‍यापनांसह रोजगार दाखवण्‍यासाठी जॉब सर्च फिल्‍टर (filter your job search to show only jobs with verifications) करू शकता. फिल्‍टर तुम्‍हाला सत्‍यापित लिंक्‍डइन पेज असलेले कंपन्‍यांनी पोस्‍ट केलेले रोजगार आणि या कंपन्‍यांशी संलग्‍न असलेले विद्यमान जॉब पोस्‍टर्स शोधण्‍याची सुविधा देतो. टॉगल केल्‍यानंतर फक्‍त या सत्‍यापनांसह रोजगार तुमच्‍या सर्च परिणामांमध्‍ये दिसतील आणि फिल्‍टर या सर्च हेडरमध्‍ये दिसण्‍यात येईल.

 

7. कन्‍टेन्‍ट क्रिएटर्स प्रामाणिक सल्‍ल्‍यासह नोकरीसाधकांना मदत करू शकतात: अनेक नोकरीसाधक करिअरसंदर्भात सल्‍ला व प्रेरणेसाठी व्‍हेरिफाईड सदस्‍य आणि टॉप वॉईसेस अशा लिंक्‍डइनवरील विश्‍वसनीय वॉईसेसना प्राधान्‍य देतात. ऑर्गनिक किंवा प्रायोजित कन्‍टेन्‍टचे पुनरावलोकन करताना देय भरलेल्‍या सहयोगांचे संकेत म्‍हणून #ad, #sponsored किंवा #partner असे स्‍पष्‍ट लेबल्‍स पहा. आम्‍ही क्रिएटर्सना त्‍यांच्‍या समर्थनांमध्‍ये पारदर्शकता आणि सत्‍यतेची खात्री देण्‍यासाठी लागू कायदे व प्‍लॅटफॉर्म मार्गदर्शकतत्त्वांचे (platform guidelines) पालन करण्‍याचे आवाहन करतो.

 

जॉब सर्च प्रक्रियेमधील सुरक्षिततेच्‍या महत्त्वाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. सत्‍यापनाला प्राधान्‍य देणे, वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे आणि संशयास्‍पद विनंत्‍यांबाबत सावधगिरी बाळगणे जॉब सर्चला सुरक्षित करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनच्‍या टूल्‍सचा फायदा घेत आणि या टिप्‍सचे पालन करत नोकरीसाधक नवीन करिअर संधींचा शोध घेत असताना स्‍वत:ची सुरक्षितता वाढवू शकतात, तसेच योग्‍य निर्णय घेऊ शकतात. आम्‍ही लिंक्‍डइनच्‍या संपूर्ण इकोसिस्‍टममध्‍ये प्रामाणिक संकेतांना एकीकृत करत आहोत, ज्‍यामुळे तुम्‍हाला आत्‍मविश्‍वासाने नोकरीचा शोध घेण्‍यास मदत होईल.

Related posts

‘लव्ह कनेक्शन’ मोहिमेच्या परतीचा महासोहळा: व्हिएतजेटकडून व्हिएतनाममध्ये ५० भारती जोडप्यांसाठी मोफत फ्लाइट्सची ऑफर

Shivani Shetty

IMDb २०२४ च्या यादीत दिशा पटानीचा तिहेरी विजय

Shivani Shetty

अॅबॉटकडून भारतातील फ्रीस्‍टाइल लिब्रे® सिस्‍टमचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक मोबाइल अॅप लाँच

Shivani Shetty

Leave a Comment