maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

थंडरचा अनुभव घेत हिरो बना: हिरो मोटोकॉर्प आणि थम्‍स अपकडून स्‍पेशल-एडिशन मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स लाँच

नवी दिल्‍ली, २४ सप्‍टेंबर २०२४: उल्‍लेखनीय सहयोगासह, हिरो मोटोकॉर्प ही जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सची सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि थम्‍स अप हा कोका-कोला कंपनी अंतर्गत भारतातील सर्वात मोठा स्‍वदेशी बेव्‍हरेज ब्रँड हिरो मोटोकॉर्पची फ्लॅगशिप मोटरसायकल मॅव्‍हरिक ४४० ची लिमिटेड-एडिशन व्‍हर्जन मॅव्‍हरिक ४४० थंडर‍व्‍हील्‍स लाँच करण्‍यासाठी एकत्र आले आहेत.

हिरो मोटोकॉर्पसोबत सहयोगाने बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या मोटरसायकल्‍सच्‍या या विशेष सिरीजमधून थम्‍स अपची मुलभूत मूल्‍ये साहस व रोमांच, तसेच हिरोच्‍या तंत्रज्ञान क्षमता आणि अभियांत्रिकी सर्वोत्तमता दिसून येतात. दोन्‍ही ब्रँड्स तरूण ग्राहकांना दर्जात्‍मक तूफानी अनुभव देण्‍यासाठी सहयोग करत आहेत. मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स दोन्‍ही ब्रँड्सच्‍या मुलभूत परसोनाला प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी, तसेच साहसी व रोमांचक प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ही लिमिटेड-एडिशन मोटरसायकल फक्‍त १५ नोव्‍हेंबर २०२४ पर्यंत थम्‍स अपचे स्‍पेशल एडिशन पॅक्‍स खरेदी करून स्‍कॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल.
उत्‍साहवर्धक जाहिरातीसह या मोहिमेला सुरूवात झाली आहे. या जाहिरातीमध्‍ये थम्‍स अपचे ब्रँड अॅम्‍बेसेडर्स आणि भारताचे सर्वात नीडर क्रिकेट आयकॉन्स जसप्रीत बुमराह व रिषभ पंत आहेत. ही टीव्‍हीसी ब्रँडच्‍या उत्‍साहवर्धक पैलूला परिपूर्णपणे कॅप्‍चर करते आणि प्रत्‍येक ट्विस्‍ट व वळणासह मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍सची अचूकता व क्षमतेला दाखवते.
या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत हिरो मोटोकॉर्पच्‍या इंडिया बीयूचे चीफ बिझनेस ऑफिसर रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ”हा अद्वितीय सहयोग सेगमेंटमध्‍ये गेमचेंजर ठरेल. दोन प्रतिष्ठित ब्रँड्सच्‍या सहयोगामधून ग्राहकांसाठी अद्वितीय उत्‍पादन सादर करण्‍यात आले आहे. आमची फ्लॅगशिप मॅव्‍हरिक ४४० मोटरसायकलच्‍या मिड-व्‍हेरिएण्‍टवर आधारित मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍समधून उत्‍पादनाची मूल्‍ये अस्‍सलता, स्‍वावलंबीपणा, आकर्षकता व साहसीपणा दिसून येतो, जी थम्‍स अपच्‍या पैलूंशी परिपूर्णपणे संलग्‍न आहेत. थम्‍स अपमधून प्रेरित नवीन रंग आणि ग्राफिक्‍स या मोटरसायकलला इतरांपेक्षा वरचढ ठरवतात, ज्‍यामुळे ही मोटरसायकल निश्चितच देशभरातील तरूणांचे लक्ष वेधून घेईल.”
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्‍ट एशियाच्‍या विपणन विभागाच्‍या उपाध्‍यक्ष ग्रीष्‍मा सिंग म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स लाँच करण्‍यासाठी हिरो मोटोकॉर्पसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. नाविन्‍यता आणि थम्‍स अपचा साहसी उत्‍साह समाविष्‍ट असलेल्‍या या बाइकमधून रोमांचक अनुभवाला प्रत्‍यक्षात आणण्‍याप्रती आमची ए‍कत्रित आवड दिसून येते. सहयोगाने, आम्‍ही ग्राहकांना काहीतरी स्‍पेशल अनुभवाचा भाग होण्‍याची संधी देत आहोत.”

Related posts

डिजिटल पर्यवेक्षण आणि बीएफएसआयमधील सायबर सुरक्षितता

Shivani Shetty

व्हिएतजेट अॅडलेड आणि पर्थला व्हायब्रंट हो ची मिन्ह सिटीशी जोडते, प्रवाशांसाठी रोमांचक संधी उघडते

Shivani Shetty

कॅडीसच्या महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ

Shivani Shetty

Leave a Comment