maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जीई एअरोस्पेसच्या GEnx इंजिनने गाठला दक्षिण आशियाई एअरलाइन्ससोबत २० लाख फ्लाइट अवर्स पूर्ण करण्याचा मैलाचा टप्पा

नवी दिल्ली, भारत, २५ सप्टेंबर २०२४ – जीई एअरोस्पेसने आपल्या GEnx या व्यावसायिक उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजिनांच्या संचाने दक्षिण आशियाई एअरलाइन्ससोबत वीस लाख उड्डाण तास अर्थात फ्लाइट अवर्सचा महत्त्‍वपूर्ण टप्पा गाठल्याची घोषणा आज केली. कंपनीने २०१२ साली आपल्या ९० GEnx इंजिनांच्या रूपात आपले पहिले GEnx पुरविले होते, जी इंजिने आज एअर इंडिया, विस्तारा आणि बिमान बांग्लादेशच्या उड्डाणांना बळ पुरवित आहेत.

“दक्षिण आशियाच्या उड्डाणक्षेत्रातील वाढीमध्ये GEnx इंजिनांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. हा मैलाचा टप्पा म्हणजे कंपनीची इंजीनिअरिंगच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्टता आणि तंत्रज्ञानातील प्रगल्भता यांचा पुरावा आहे.” जीई एअरोस्पेसचे कमर्शियम प्रोग्राम विभागासाठीचे ग्रुप व्हाइस प्रेसिडंट महेंद्र नायर आपल्या नवी दिल्लीच्या भेटीदरम्यान म्हणाले. “यापुढेही आम्ही आमच्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या आणि विविध सेवांच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना त्यांची व्यावसायिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी पाठबळ देत राहू.”

“दक्षिण आशियाई एअरलाइन्सबरोबरच्या आमच्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या नात्याचा आम्हाला अभिमान आहे, ज्यामध्ये सर्वात अलीकडे २० नव्या वाइड-बॉडी विमानांसह आपली कार्यकक्षा विस्तारण्याची योजना आखत असलेल्या एअर इंडियाचाही समावेश झाला असून या विमानांना ४० GEnx इंजिनांची ताकद मिळणार आहे.” जीई एअरोस्पेसचे साऊथ एशिया चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर विक्रम राय म्हणाले.

“GE एअरोस्पेस हे आमच्या वाइड-बॉडी विमानांची कार्यकक्षा वाढविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासातील एक विश्वासू सहकारी राहिले आहे आणि GEnx इंजिन्सनी विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा या सर्व बाबतीत सातत्याने अपेक्षित कामगिरी केली आहे,” एअर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर निपुण अग्रवाल म्हणाले. “आम्ही आमच्या विमानांचा ताफा विस्तारण्याचे काम सातत्याने करत असताना GEnx इंजिने आम्हाला आमची कार्यान्वयनाशी संबंधित उद्दीष्टे प्राप्त करण्याच्या कामी मदत करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, याची आम्हाला खात्री आहे.”

विश्वासार्ह आणि टिकाऊ तंत्रज्ञान

जगभरातली एअरलाइन्सची पसंती असलेली, बोईंग ७८७, ड्रामलायनर आणि ७४७-८ यांना बळ पुरविणारे GEnx इंजिन म्हणजे प्रॉप्युलेशन तंत्रज्ञानाच्या भविष्याच्या दिशेने घेतलेली एक मोठी झेप आहे. इंजिनच्या उत्कृष्ट कामगिरीचे विमाने चालविण्याचा खर्च कमी होण्यामध्ये व कमीत कमी कार्बन उत्सर्ग साधण्यामध्ये योगदान असून याआधीच्या CF6 इंजिनच्या तुलनेत १५ टक्‍के अधिक ऊर्जाबचत व १५ टक्‍के कमी कार्बनउत्सर्ग साधणाऱ्या या इंजिनाची कामगिरी जागतिक विमान उड्डाण उद्योगाच्या शाश्वतता उद्दीष्टांशी मेळ साधणारी आहे. GEnx इंजिन हा GE90 इंजिनांपासून मिळविलेल्या अनेक दशकांच्या ज्ञान व अनुभवा यांचा परिपाक आहे. आपल्या नाविन्यपूर्ण ट्विन अॅन्युलर प्री-स्वर्ल (टीएपीएस) कम्बस्टरच्या साथीने हे इंजिन नायड्रोजन ऑक्साइड (NOx) उत्सर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करते व ज्यामध्ये चालू कायदेशीर मर्यादेहून ६० टक्‍क्‍यांपर्यंतची घट होत आहे. जीई एअरोस्पेसच्या बेंगळुरू येथील टेक्नोलॉजी सेंटरमधील संशोधक आणि इंजिनीअर्सनी स्थानिक ग्राहकांच्या निकट संपर्कात राहून काम केले आहे व व कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत तसेच इंजिनचा ‘टाइम ऑन विंग’ वाढविण्यासाठी आणि देखभालीचे ओझे कमी करण्यासाठी फोम वॉश, प्रगत ब्लेड इन्स्पेक्शन आणि कार्यान्वयनाशी निगडित डेटावर आधारित सखोल माहिती पुरविण्यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण ‘ऑन-विंग’ तंत्रज्ञानांचा वापर केला आहे.

मार्च २०२३ मध्ये GEnx इंजिन्सनी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ)चा वापर करत पहिल्या वाइड-बॉडी विमानाच्या भारताच्या दिशेने केलेल्या लांब पल्ल्याच्या उड्डाणाला बळ पुरविले. विस्ताराच्या बोईंग ७८७-९ ड्रीमलायनरने ३० टक्‍के एसएएफचे मिश्रण असलेल्या प्रचलित जेट इंधनाचा वापर करून चार्ल्सटन, साऊथ कॅरोलिना ते नवी दिल्ली असे उड्डाण केले.

इंजिनाची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा आणखी वाढविण्यासाठी जीई एअरोस्पेसने ३६० फोम वॉश हा इंजिन धुण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या पारंपरिक पद्धतीला अत्याधुनिक पर्याय दिला. इंजिनांची स्वच्छता करण्यासाठीच्या या प्रगत प्रक्रियेमुळे त्यातील धूळ आणि कचरा दूर होऊन इंजिन जास्तीत-जास्त चांगली कामगिरी देते, इंधनाची बचत होते व देखभालीच्या पाळ्यांमधील कालावधी वाढतो. एअर इंडिया, एमिरेट्स, एतिहाद एअरवेज, जपान एअरलाइन्स, कतार एअरवेज, रॉयल जॉर्डेनियन, सौदी अरेबियन एअरलाइन्स आणि स्कायवेस्ट यांच्याद्वारे ३६० फोम वॉशचा वापर सुरूही झाला आहे. २०२२ सालाच्या अखेरीपर्यंतच्या आकडेवारीनुसार ग्राहकांद्वारे फील्डमध्ये २००० हून अधिक फोम वॉश प्रक्रिया पार पाडल्या गेल्या, ज्यामुळे कार्यान्वयनाचा खर्च आणि पर्यावरणावरील परिणाम या दोहोंमध्येही घट झाली.

एआयच्या साथीने सेवेच्या दर्जामध्ये सुधारणा

जीई एअरोस्पेस सेवेमध्ये रुजू असलेल्या आपल्या GEnx कमर्शियल इंजिन्सवर सातत्याने देखरेख ठेवते व सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी भविष्यात देखरेखीच्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा अंदाज बांधण्यासाठी डिजिटल माहितीची वापर करते. या प्रयत्नाला पाठबळ देण्यासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) संचालित प्रगत मॉडेल्सचा वापर करते, जेणेकरून देखरेखीखाली येऊ शकणाऱ्या अधिकाधिक स्थिती अधिक अचूकतेने लक्षात याव्यात. जीई एअरोस्पेसचे एआय-सुसज्ज ब्लेड इन्स्पेक्शन टूल (बीआयटी) GEnx कमर्शियल इंजिनातील स्टेज १ व स्टेज २ हाय प्रेशर टर्बाइन इंजिन ब्लेडच्या प्रतिमा निवडण्याच्या कामी मार्गदर्शन करते व त्यामुळे तंत्रज्ञांना अधिक वेगाने व अधिक अचूकतेने पाहणी करता येते. यामुळे सातत्याने प्रतिमा मिळत राहतात, जी अंदाजात्मक प्रारूप उभारणीतील एक महत्त्‍वाची माहिती आहे.

Related posts

केकाकडून भारतातील सर्वात मोठ्या व्‍हर्च्‍युअल एचआर परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

“ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेड: OOH जाहिरात उद्योगाचे भविष्य उजळवत”

Shivani Shetty

इटफिट (EatFit) आणि एचआरएक्‍स बाय ऋतिक रोशन (HRX by Hrithik Roshan) यांनी एचआरएक्‍स कॅफे सुरू करण्‍यासाठी केला सहयोग; आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयीमध्‍ये बदल घडवून आणणार

Shivani Shetty

Leave a Comment