मुंबई, १० मार्च २०२५: अदानी विल्मार लिमिटेड (AWL), भारतातील आघाडीच्या अन्न आणि एफएमसीजी कंपन्यांपैकी एक, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘स्टोरीज ऑफ संगिनी: अ ट्रिब्युट टू देअर स्ट्रेंग्थ’ या चार-भागांच्या व्हिडिओ मालिकेचे लोकार्पन केले. ही मालिका फॉर्च्युन सुपोषण उपक्रमातील विविध संगिनींच्या योगदानावर प्रकाश टाकेल. या संगिनी म्हणजे गावस्तरीय स्वयंसेविका आहेत, ज्या भारतातील विविध भागांमध्ये आरोग्य आणि पोषणाबाबत जनजागृती करून स्थानिक समुदायावर सकारात्मक प्रभाव टाकत आहेत. २०१६ मध्ये सुरू झालेला फॉर्च्युन सुपोषण कार्यक्रम हा आदाणी विल्मारचा उपक्रम आहे, जो आदाणी फाउंडेशनद्वारे राबविला जातो. हा उपक्रम अदानी समूहाच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाचा एक भाग आहे. या प्रकल्पाने ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन, आरोग्य सुविधा आणि आशा कार्यकर्त्यां यांसारख्या हितसंबंधींशी सक्रिय सहभाग घेत अनेक जीवनांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे.
‘स्टोरीज ऑफ संगिनी: अ ट्रिब्युट टू देअर स्ट्रेंग्थ’ या नव्याने सुरू झालेल्या व्हिडिओ मालिकेतील पहिला व्हिडिओ एका संगिनीच्या प्रवासाचा मागोवा घेतो. या व्हिडिओमध्ये ती आरोग्य तपासणी करते, पोषण जागरूकता सत्रांचे नेतृत्व करते आणि महिलांना प्रशिक्षण देते. तसेच, या उपक्रमाचा भाग झाल्यानंतर तिच्या स्वतःच्या आयुष्यात झालेले बदल ती शेअर करते. यामध्ये प्रभावी निवेदनाच्या (voiceover) माध्यमातून तिची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली जाते, ज्या मुळे ती तळागाळातील जीवनांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.
श्री.अंगशू मलिक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी विल्मार लिमिटेड म्हणाले,”सुपोषण संगिनी या खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या शिल्पकार आहेत, ज्या समुदाय स्तरावर सकारात्मक बदल घडवत आहेत. सर्वांसाठी आरोग्य आणि पोषण सुधारण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमध्ये सशक्तीकरणाचा खरा अर्थ दिसून येतो. फॉर्च्युन सुपोषण प्रकल्प आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि कुपोषण व अशक्तपणाविरुद्धच्या लढ्यात या उपक्रमाने गाठलेल्या प्रगतीचा आम्हाला अभिमान आहे. या प्रेरणादायी व्हिडिओ मालिकेद्वारे आम्ही त्यांच्या अथक प्रयत्नांचे दर्शन घडवत आहोत आणि आशा करतो की त्यांच्या कथा आणखी अनेकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी तसेच इतरांना उन्नतीच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी प्रेरित करतील.”
फॉर्च्युन सुपोषण उपक्रमाने आपल्या स्थापनेपासून आजपर्यंत भारतातील १४ राज्यांमध्ये विस्तार करून ३४ ठिकाणी आपले कार्यक्षेत्र वाढवले आहे. या उपक्रमाअंतर्गत १९४६ गावे आणि १९० झोपडपट्ट्यांचा समावेश करण्यात आला असून, सुमारे २.५ दशलक्ष लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 0 ते ५ वयोगटातील १,७९,८७३ बालकांपर्यंत पोहोचता आले आहे, तर ३,२८,८५४ प्रजननक्षम महिलांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच १,0८,६०६ किशोरवयीन मुलींना त्यांच्या गरजेनुसार विशेष हस्तक्षेपाच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.