maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कमिंस इंडियाकडून बी-स्‍कूल केस कॉम्‍पीटिशन ‘रिडिफाइन २०२४’ चा शुभारंभ: सस्टेनेबिलिटीसाठी डिजिटल सोल्‍यूशन्‍सवर लक्ष केंद्रित

पुणे, भारत: भारतातील पॉवर सोल्यूशन्स टेक्‍नोलॉजीच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी एक, कमिंस इंडिया लिमिटेड (“कमिंस इंडिया”) कंपनीने आपली वार्षिक बिझनेस स्‍कूल (बी-स्‍कूल) केस स्‍टडी कॉम्‍पीटिशन ‘रिडिफाइन २०२४’ लाँच केले आहे. ही स्‍पर्धा महत्त्वाकांक्षी बिज़नेस प्रमुखांना वास्‍तविक विश्‍वातील व्‍यवसायसंदर्भातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी त्‍यांच्या धोरणात्‍मक, नाविन्‍यपूर्ण आणि विश्‍लेषणात्‍मक कौशल्‍यांचा वापर करण्‍याचे चॅलेंज देते.

 

‘हाऊ डिजिटल सोल्‍यूशन्‍स एनेबल सस्‍टेनेबिलिटी इन ट्रॅडिशनल बिझनेसेस?’ थीम असलेली यंदाची स्‍पर्धा सहभागींना डिजिटलायझेशनचा फायदा घेत पारंपारिक क्षेत्रांमध्‍ये सस्टेनेबिलिटी घडवून आणण्‍यास प्रेरित करते. डिजिटल सोल्‍यूशन्‍स एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल, सोशल, अँड गव्‍हर्नन्‍स (ईएसजी) अहवालाला कशाप्रकारे प्रबळ करू शकतात, स्‍कोप १, २ अँड ३ एमिशन्‍समध्‍ये कमी करण्‍याच्‍या संधींचा कशाप्रकारे शोध घेऊ शकतात आणि कार्यरत कार्यक्षमता कशाप्रकारे सुधारू शकतात यावर ही स्‍पर्धा लक्ष केंद्रित करते.

 

या स्‍पर्धेच्‍या शुभारंभाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत कमिंस इंडियाच्‍या ह्युमन रिसोर्सेस् लीडर अनुपमा कौल म्हणाल्‍या, “कमिंस इंडियामध्‍ये आम्‍ही भावी प्रमुखांना विकसित होत असलेल्‍या व्‍यवसाय लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करण्‍यास आणि आकार देण्‍यास प्रेरित आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सुरुवातीपासूनच आमची केस स्‍टडी स्‍पर्धा या ध्‍येयाचा महत्त्वपूर्ण भाग राहिली आहे. सस्टेनेबिलिटी आणि टेक्‍नोलॉजीच्या वाढता वापर आपल्या जगाला नवीन आकार देत असल्याने, सस्टेनेबल पर्यावरण घडवण्‍यासाठी टेक्‍नोलॉजीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. रिडिफाइन २०२४ विद्यार्थ्‍यांना डिजिटलायझेशन अर्थपूर्ण परिवर्तनाला कशाप्रकारे चालना देऊ शकते हे दाखवण्‍यासाठी अपवादात्‍मक प्‍लॅटफॉर्म देते.”

 

कमिंस इंडियाच्‍या कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजीचे डायरेक्‍टर, सुब्रमण्‍यम चिदंबरन, म्‍हणाले, “रिडिफाइनच्‍या माध्‍यमातून आमचा विद्यार्थ्‍यांना चौकटीबाहेर विचार करण्‍यास सक्षम बनवण्याचे, त्यांना टेक्‍नोलॉजीच्या पारंपारिक उद्योगांमध्‍ये बदल घडवून आणण्‍याच्‍या पद्धतींचा शोध घेण्‍यास आणि सस्टेनेबल भविष्‍य घडवण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. नवीन इनोवेशन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आणि परस्पर सहकार्यातून येतात. भावी प्रमुखांशी संलग्‍न होत आमचे नवीन माहिती मिळवण्‍याचे आणि नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याचे ध्‍येय आहे, ज्‍यामधून उद्योगामध्‍ये प्रगती व सर्वोत्तमतेप्रती कमिंस इंडियाची कटिबद्धता दिसून येते.”

 

ही स्‍पर्धा भारतातील १८ सहयोगी बी-स्‍कूल्‍समधील दोन वर्षांच्या फ्लॅगशिप पीजीपी/पीजीडीएम/पीजीडीबीएम/एमबीए प्रोग्राम्‍समध्‍ये प्रवेश घेतलेल्या पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी खुली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 14-15 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे, महाराष्ट्र येथील कमिंस इंडिया ऑफिस कॅम्‍पसमध्‍ये होणार आहे. विजेत्‍या टीमला रोख पारितोषिक आणि कमिंस इंडियाच्‍या मेन्‍टोरशीप प्रोग्राममध्‍ये सामील होण्‍याचे विशेष आमंत्रण मिळेल. हा प्रोग्राम भावी व्‍यवसाय प्रमुखांना निपुण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. केस स्‍टडी व्‍यतिरिक्‍त, सहभागींना विविध परस्‍परसंवादी सत्रांच्‍या माध्‍यमातून कमिंस इंडियाच्या नेतृत्‍वाशी भेटण्याची संधी देखील मिळेल.

 

गेल्‍या वर्षी, रिडिफाइनने देशातील १८ प्रमुख बी-स्‍कूल्‍सचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या ९३८ टीम्‍समधील ३,७५२ विद्यार्थ्‍यांचे लक्ष वेधून घेतले.

 

रिडिफाइन २०२४ साठी सहभागी सहयोगी बी-स्‍कूल्‍स आहेत:

 

1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर

2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझीकोडे

3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ

4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई

5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची

6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलॉंग

7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तिरूचिराप्‍पल्‍ली

8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर

9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, दिल्‍ली

10. इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद

11. केजे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई

12. मॅनेजमेंट डेव्‍हलपमेंट इन्स्टिट्यूट, गुरगाव

13. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्‍टडीज, मुंबई

14. एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई

15. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे

16. सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे

17. झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्‍वर

18. झेवियर स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट (एक्‍सएलआरआय), जमशेदपूर

 

लेटेस्ट अपडेट्स आणि माहितीसाठी कमिंस इंडियाला लिंक्‍डइन, फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम अँड यूट्यूबवर फॉलो करा.

Related posts

कॉलेज विद्याने एआय सर्च टूलचे अनावरण केले

Shivani Shetty

किटकॅटकडून तीन संपन्‍न व स्‍वादिष्‍ट व्‍हेरिएण्‍ट्ससह नवीन प्रिमिअम श्रेणी लाँच

Shivani Shetty

गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

Shivani Shetty

Leave a Comment