शहरातील गजबजलेल्या रस्त्यांपासून ग्रामीण भागांपर्यंत टाटा मॅजिकने देशभरातील लाखो प्रवाशांची त्यांच्या शेवटच्या अंतरापर्यंत यशस्वीपणे वाहतूक केली आहे. आता, नुकतेच लाँच करण्यात आलेले टाटा मॅजिक बाय-फ्यूएल हा प्रवास अधिक सुखकर व उत्साहवर्धक करण्यास सज्ज आहे. ६०-लिटर सीएनजी टँकसह ५-लिटर पेट्रोल टँक असलेली ही वेईकल संपूर्ण इंधन भरलेले असताना एकत्रित जवळपास ३०० किलोमीटरपर्यंतची रेंज देते, ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी आणि विविध प्रदेशांमधील प्रवासासाठी ही वेईकल अनुकूल आहे. ही नाविन्यपूर्ण व्हेरिएण्ट सीएनजी व पेट्रोलमध्ये विनासायास बदल करण्याची सुविधा देते, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि इंधन वापर कमी होतो.
टाटा मॅजिक बाय-फ्यूएल प्रवाशांच्या, तसेच ड्रायव्हर्सच्या विकसित होत असलेल्या गरजांची पूर्तता करते. तिच्या विभागातील ९+ड्रायव्हरची सीटिंग क्षमता आणि रॅडियल टायर, गिअरशिफ्ट अडवायजर व सुधारित ड्रायव्हर एर्गोनॉमिक्स अशी वैशिष्ट्ये असलेली ही वेईकल सानुकूलपणे इंधन वापर करते, ज्यामधून मालकीहक्काच्या कमी खर्चाची खात्री मिळते.
अपवादात्मक दोन वर्ष किंवा ७२,००० किलोमीटर वॉरंटीच्या पाठबळासह टाटा मॅजिक बाय-फ्यूएल विश्वसनीय व टिकाऊ वेईकल्स प्रदान करण्याच्या, तसेच ताफा मालक व वैयक्तिक ऑपरेटर्सना मन:शांती देण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
previous post