maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करताय? एका फेअरीटेल सेटिंगसाठी व्हिसा तुम्हाला ५ सुंदर भारतीय ठिकाणांचा शोध घ्यायला मदत करेल

तुमच्या स्वप्नातील डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी व्हिसा पाच सुंदर भारतीय ठिकाणे आणि खर्च वाचवणाऱ्या टिप्स देत आहे.

 

1. लवासा, महाराष्ट्र: देखणी वास्तुरचना आणि शांत तलावाशेजारच्या दृश्यांसह लवासा हे युरोपियन शहरासारखे आहे. तुमच्या सुंदर लग्नासाठी योग्य असलेले हे ठिकाण त्याच्या देखणेपणासाठी ओळखले जाते आणि तुम्ही तुमचे खिसे सहजपणे मोकळे करता. तुम्ही ईएमआय पर्यायासह क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता आणि तुमचा खर्च अगदी सहजपणे मॅनेज होईल. त्यामुळे कोणताही ताण न घेता तुम्ही लग्नाचा दिवस आनंदाने साजरा करू शकता.

 

2. मसूरी, उत्तराखंड: तुमच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या फ्लाइट बुक करा आणि क्वीन ऑफ हिल्स असलेल्या मसूरीमध्ये तुमच्या लग्नाचा अनुभव घ्या. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वतरांगा आणि हिरव्यागार जंगलांमध्ये, देखण्या ब्रिटिशकालीन वास्तूरचना आणि ताजेतवाने करणारी हवा तुम्हाला डेस्टिनेशन हिल वेडिंगसाठी उत्तम ठरेल.

 

3. मांडू, मध्य प्रदेश: किल्ल्यांचे पुरातन शहर आणि प्रेमकथेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जहाजमहालामुळे मांडू हे भल्या मोठ्या कार्यक्रमांसह लग्नासाठी उत्तम ठिकाण ठरते. इथल्या स्थानिक फ्लेवर्स आणि भव्य वास्तू तुमच्या लग्नाच्या आनंदात भर घालतील. विविध हॉटेल्समध्ये क्रेडिट कार्डस् स्वीकारली जातात. त्यामुळे मांडू हे तुमच्या लग्नासाठी देखणे आणि तरीही खिशाला परवडणारे स्थान ठरते.

 

4. लक्षद्वीप बेटे: अत्यंत सुंदर बीच बेडिंग हवे असलेल्या लोकांसाठी लक्षद्वीप हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. इथल्या लगून्स स्वच्छ आणि देखण्या आहेत, बीच सुंदर आहेत आणि किनारपट्टीवर पामच्या रांगा आहेत. त्यामुळे निळेशार पाणी आणि सोनेरी वाळूच्या सोबतीने आपली लग्नगाठ बांधायला तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हॉटेल बुकिंग्सवर सर्वोत्तम डील्स मिळवा आणि बेटांवरील लग्नाचे बुकिंग सोपे करा.

 

5. हम्पी, कर्नाटक: एक ऐतिहासिक आणि देखणे स्थान असलेल्या हम्पीमध्ये आपल्याला उज्ज्वल साम्राज्याचा इतिहास पाहता येतो. इथे सुंदर इमारती, पुरातन मंदिरे आणि देखणे बोल्डर्स आहेत. नैसर्गिक सौंदर्य आणि वास्तुरचनात्मक भव्यता यांच्यामुळे तुम्हाला कालातीत प्रेमाचा अनुभव घेता येईल. तुम्हाला शेवटच्या क्षणाच्या काही गरजा पूर्ण करायच्या असतील तर तुमचे डेबिट कार्डदेखील हातात ठेवा.

 

या लग्नाच्या सीझनमध्ये हवेत प्रेम आहे. त्यामुळे भारतात आपल्या अद्वितीय सुंदर रचनांसह वेगवेगळे जादुई पर्याय उपलब्ध होतात. स्मार्ट नियोजन आणि आपल्या खर्चाच्या व्यवस्थापनासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे ही सुंदर ठिकाणे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा अनुभव साकार करू शकतात.

Related posts

डिजिकोअरच्या आयपीओला मिळाले प्रचंड यश

Shivani Shetty

रॅकोल्‍डकडून नेक्स्‍ट-जनरेशन वॉटर हिटर्स लाँच

Shivani Shetty

झेलियो ईबाइक्सद्वारे नवीन ‘मिस्ट्री हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

Shivani Shetty

Leave a Comment