maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोलाच्‍या ऑनेस्‍ट टीकडून #FindYourGood मोहिम लाँच

कॅम्‍पेन फिल्‍म: https://www.youtube.com/watch?v=6IScKb3ZUg4

राष्‍ट्रीय, X जून २०२४: ऑनेस्‍ट टी या ऑर्गनिक ग्रीन टी असलेल्‍या रेडी-टू-ड्रिंक पेयाने सुप्रसिद्ध लेखिका, स्‍तंभलेखिका व आरोग्‍याप्रती उत्‍साही ट्विंकल खन्‍ना यांच्‍यासोबत सहयोगाने नवीन #FindYourGood मोहिमेची घोषणा केली आहे. नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या जाहिरातीमध्‍ये ट्विंकल खन्‍ना दैनंदिन कामादरम्‍यान #HonestTea सह शांतमय क्षण मिळवताना दाखवण्‍यात आले आहे. ऑनेस्‍ट टी प्रसिद्ध मकाईबारी टी इस्‍टेटमधून स्रोत मिळवलेल्‍या ऑर्गनिक ग्रीन टीपासून बनवण्‍यात आली आहे.
सामाजिक अपेक्षांनी भरलेल्‍या विश्‍वामध्‍ये ऑनेस्‍ट टीची मोहिम लोकांना त्‍यांच्‍या आराम करण्‍याच्‍या पद्धतींना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास प्रेरित करते. या प्रयत्‍नामध्‍ये सहाय्यक सोबती म्‍हणून ब्रँड दोन उत्तम फ्लेवर्स देतो – लेमन-तुलसी आणि मँगो.
या मोहिमेचा शुभारंभ करण्‍यासाठी ऑनेस्‍ट टी सोशल फिल्‍म्‍स व डिजिटल क्रियाकलापांची सिरीज सादर करणार आहे, तसेच विविध प्‍लॅटफॉर्म्‍सवर ग्राहकांशी संलग्‍न होणार आहे. डब्‍ल्‍यूपीपी ओपन एक्‍स ने संकल्‍पना मांडलेली ही मोहिम जाहिरात संबंधित क्षणाला दाखवते, जेथे ट्विंकल त्‍यांना आवडणाऱ्या गोष्‍टी करताना पाहायला मिळतात. त्‍या आराम करत ऑनेस्‍ट टीचा आस्‍वाद घेताना पाहायला मिळतात आणि म्‍हणतात, ”तुमच्‍यासाठी काय चांगले आहे हे तुम्‍हीच ठरवा”.
ऑनेस्‍ट टीसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत ट्विंकल खन्‍ना म्‍हणाल्‍या, ”मला #FindYourGood मोहिमेचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. ही मोहिम उत्तम, सर्वांगीण जीवन असण्‍याच्‍या माझ्या जीवनमंत्राशी संलग्‍न आहे. दररोज आनंद व संतुलन शोधण्‍याच्‍या महत्त्वामधून प्रेरित ऑनेस्‍ट टीची मोहिम आधुनिक महिलांच्‍या स्‍वास्‍थ्‍यामध्‍ये सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करते.”
नवीन मोहिमेच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला कंपनी, इंडिया व साऊथ-वेस्‍ट एशिया ऑपरेटिंग युनिट येथील मार्केटिंगच्‍या वरिष्‍ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्‍हणाल्‍या, ”ऑनेस्‍ट टीला #FindYourGood मोहिम लाँच करण्‍याचा अभिमान वाटतो. ही मोहिम तुमच्‍या दैनंदिन जीवनात शांत व संयमाच्‍या लहान क्षणांना साजरे करते. ट्विंकल खन्‍ना यांच्‍यासोबत सहयोगाने आमचा या धावपळीच्‍या युगामध्‍ये व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या वैयक्तिक जीवनात संतुलन व स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍यास प्रेरित करण्‍यासोबत साह्य करण्‍याचा उद्देश आहे.”
नवीन मोहिमेबाबत आपले मत व्‍यक्‍त करत डब्‍ल्‍यूपीपी ओपन एक्‍स येथील एक्झिक्‍युटिव्‍ह क्रिएटिव्‍ह डायरेक्‍टर मुकुंद ओलेटी म्‍हणाले, ”आमची नवीन मोहिम अत्‍यंत महत्त्वपूर्ण बाबीवर प्रकाश टाकते, जी आपल्‍यापैकी अनेकजण विसरून जातो, ते म्‍हणजे आपल्‍या दैनंदिन जीवनात लहान शांतमय व आनंदी क्षणांसाठी वेळ काढणे.” ट्विंकल खन्‍ना यांच्‍यासोबतच्‍या सहयोगाबाबत सांगताना ते म्‍हणाले, ”या मोहिमेसाठी ट्विंकल खन्‍ना यांच्‍यासोबतचा सहयोग अत्‍यंत उत्‍साही अनुभव आहे. आमची या मोहिमेच्‍या माध्‍यमातून बारकावे दर्शवण्‍याची इच्‍छा आहे आणि महिलांच्‍या कल्‍याणाप्रती समर्थक असलेल्‍या त्‍या या संदेशाचा प्रसार करतील.”
ऑनेस्‍ट टी सध्‍या बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्‍नई, पुणे व गुरगाव या निवडक शहरांमधील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर ६० रूपये किमतीत उपलब्‍ध आहे. अधिक माहितीसाठी ऑनेस्‍ट टीचे इन्‍स्‍टाग्राम पेज @honestteaindia ला भेट द्या.

Related posts

वझीरएक्सद्वारा खास व्हॅलेंटाईन डे मोहिमेचे अनावरण

Shivani Shetty

भारतातील प्रमुख स्‍नॅकिंग ब्रँड ‘४७००बीसी’चा नेटफ्लिक्‍ससह सहयोग

Shivani Shetty

इझमायट्रिपचा विंटर कार्निवल सेल

Shivani Shetty

Leave a Comment