maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील दीर्घकाळापासून कार्यरत व अद्वितीय रेकॉर्डस् बुक ‘लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडून २०२४ एडिशन लाँच लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डसने भारतातील उत्तम कामगिरीसह जगाला प्रेरित केले

राष्‍ट्रीय, xx मार्च २०२४: लिम्‍का या कोका-कोला इंडियाच्‍या स्‍वदेशी वारसा ब्रॅण्‍डने अभिमानाने भारतातील दीर्घकाळापासून रेकॉर्ड व रेफरन्‍स बुक ‘लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस्’च्‍या ३३व्‍या एडिशनची घोषणा केली. या बुकची थीम ‘इंडिया अॅट हर बेस्‍ट’ कायम राखत २०२४ एडिशन २०२३ मधील देशाच्‍या उपलब्‍धी आणि वर्षानुवर्षे खंबीर राहिलेल्‍या उपलब्‍धींचा सत्‍य इतिहास आहे. भारतीय रेकॉर्डसना प्रकाशझोतात आणण्‍यामध्‍ये अग्रणी असलेल्‍या वारसाशी बांधील राहत या बुकमध्‍ये विलक्षण दृढतेचे यश, हार न मारण्‍याची जिद्द असलेल्‍या यशस्‍वी व्‍यक्‍तींच्‍या उत्तम कामगिरी व विजय कथांचा समावेश आहे. हे बुक भारतीयांच्‍या चिकाटी, संयम व कामगिरीच्‍या सर्वोत्तम वास्‍तविक जीवनातील कथांना सादर करते. एशियन गेम्‍स २०२२ मध्‍ये विक्रमी कामगिरीच्‍या पुनरावृत्तीपासून नवीन डिझाइन करण्‍यात आलेल्या संसद भवनपर्यंत हे बुक भारतातील ठळक उपलब्‍धींना प्रशंसित करते.
वैद्यकीय आविष्‍कारांपासून तंत्रज्ञान प्रगतीपर्यंत, क्रीडापटूंच्‍या विजयापासून वास्‍तुशिल्‍पामधील यशापर्यंत आणि समृद्ध साहित्यिक लँडस्‍केपपासून सामुदायिक प्रयत्‍नांपर्यंत हे बुक उद्देश व उत्‍कटतेच्‍या प्रेरणादायी वर्णनाला सादर करते.
पण, वर्षामध्‍ये सर्वात यशस्‍वी ठरला क्रीडा विभाग. वर्ष २०२३ हांगझोऊ, चीन येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या एशियन गेम्‍स २०२२ मध्‍ये १०० हून अधिक पदक संपादित करत अत्‍यंत यशस्‍वी ठरले. तसेच, बुडापेस्‍ट येथे आयएएएफ वर्ल्‍ड अॅथलेटिक्‍स चॅम्पियनशीप्‍समध्‍ये नीरज चोप्राच्‍या पुरूषांच्‍या भालाफेकमधील ऐतिहासिक सुवर्ण पदकाने भारताला जागतिक स्‍तरावर मोठे स्‍थान मिळवून दिले.
याव्‍यतिरिक्‍त, बहुआयामी मास्‍टर स्‍ट्रोक्स जसे सर्वात मोठे फ्लॉवर कारपेट; प्रभात कोळी – ओशियन्‍स सेव्‍हन चॅलेंज पूर्ण करणारा जगातील सर्वात तरूण जलतरणपट्टू; मोटरसायकलवर चाललेले सर्वात मोठे महिलांचे पिरॅमिड; आदित्‍य-एल१ – देशातील पहिले सोलार प्रोब; आणि गंगा – भारतातील पहिली क्‍लोन केलेली गाय यांसह या बुकमध्‍ये भारताने २०२३ मध्‍ये संपादित केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा समावेश करण्‍यात आला आहे.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् २०२४ च्‍या कन्‍सल्टिंग एडिटर वत्‍सला कौल बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् जीवनाच्‍या सर्व स्‍तरांमधील भारतीयांची कल्‍पकता, प्रतिभा व उपलब्‍धींचा लक्षवेधक इतिहास आहे. ३० वर्षांहून अधिक काळापासून या बुकने प्रेरित व प्रेरणादायी कामगिरींचा वारसा तयार केला आहे. आम्‍ही आमच्‍या सर्व अर्जदारांचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो, तसेच मर्यादांना झुगारत अपवादात्‍मक कामगिरी दाखवणाऱ्या रेकॉर्डधारकांचे अभिनंदन करतो, ज्‍यामुळे हे बुक अद्वितीय आणि आपल्‍या देशाचे अभिमान बनले आहे.”
रेकॉर्ड करण्‍यात आलेल्‍या विविध उपलब्‍धींचे कौतुक करत द कोका-कोला कंपनी येथील इंडिया अॅण्‍ड साऊथ-वेस्‍ट एशिया ऑपरेटिंग युनिटमधील हायड्रेशन, स्‍पोर्टस् आणि टी कॅटेगरीच्‍या मार्केटिंगच्‍या वरिष्‍ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्‍हणाल्‍या, ”लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् प्रतिष्ठित व कालातीत परीक्षित आयपी आहे, जे मानवतेच्‍या अतूट भावनेला आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीमधील अमर्यादित क्षमतेला प्रशंसित करते, ज्‍यामुळे आपल्‍याला मर्यादांना झुगारत उत्तम कामगिरी करण्‍यास प्रेरणा मिळते. हा उत्‍साह लिम्‍का ब्रॅण्‍डच्‍या कधीच न थांबण्‍याच्‍या तत्त्वाशी म्‍हणजेच रूकमत (नेव्‍हर स्‍टॉप) च्‍या भावनेशी संलग्‍न आहे. दशकांपासून लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् व्‍यक्‍तींना त्‍यांची स्‍वप्‍ने साकारण्‍यास आणि अपेक्षांची पूर्तता करण्‍यास प्रेरित करत आहे. आम्‍ही आवडीप्रती अतूट कटिबद्धतेच्‍या आणखी एका वर्षाला प्रशंसित करत असताना सर्व क्षेत्रातील विजेत्‍यांचे त्‍यांच्‍या उत्तम कामगिरीसाठी मनापासून अभिनंदन करतो. तसेच, मी अनंत काळापासूनच्‍या उपलब्‍धींची ही प्रतिष्ठित यादी सादर करण्‍यासाठी लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् टीमचे अभिनंदन करते.”
अभूतपूर्व रिफ्रेशमेंट प्रदान करणाऱ्या आणि अडथळ्यांना झुगारत पुढे जात राहणाऱ्यांना साजरे करणाऱ्या लिम्‍काच्‍या लेमनी फ्लेवरमधून प्रेरित लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् स्‍वप्‍ने व आवड साकारण्‍यासाठी आव्‍हाने व अडथळ्यांचा सामना करत प्रगती करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी प्रेरणास्रोत आहे.
साहस व गौरवाच्‍या अचंबित करणाऱ्या गाथा २०२४ एडिशनमध्‍ये वाचायला मिळू शकतात, हे बुक आता ऑनलाइन आणि सर्व आघाडीच्‍या बुकस्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

Related posts

Mobil 1 50वीं वर्षगांठ: आगे के लिए तैयार

Shivani Shetty

चेतना जोशी मिसेस वर्ल्ड २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

Shivani Shetty

‘आम्‍ही पेटीएम सोडत नाही आहोत’ असे बिबा, हॉटस्‍पॉट रिटेल प्रा. लि. आणि अरविंद लिमिटेड यांसारखे कंपनीचे सर्वात मोठे मर्चंट्स म्‍हणाले; सर्वोत्तम पेमेंट्ससाठी कंपनीवरील विश्‍वास कायम

Shivani Shetty

Leave a Comment