मुंबई, १७ मार्च २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांच्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठी विशेष ऑफरची घोषणा केली आहे. ब्रॅण्ड सर्व सूचीबद्ध कंपन्यांना त्यांच्या ट्रॅव्हल बुकिंग्ज पूर्ण करण्यासाठी २०-दिवस क्रेडिट कालावधी देईल, तसेच त्यांना उत्तम आर्थिक स्थिरता व सोयीसुविधेसह सक्षम करेल. हा धोरणात्मक उपक्रम एकसंधी पेमेंट्सची सुविधा देईल आणि सहभागी असलेल्या पार्टींसाठी व्यवहारात्मक प्रक्रिया सुव्यवस्थित करेल.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ”आम्ही ग्राहकांसोबतच्या आमच्या संबंधाला महत्त्व देतो आणि त्यांच्या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. २०-दिवस क्रेडिट कालावधी लॉन्च करत आमचा सूचीबद्ध कंपन्यांवरील आर्थिक भार कमी करण्याचा आणि त्यांच्यासाठी सुलभ प्रवास नियोजन अनुभव व एकसंधी पेमेंट प्रक्रियांची सुविधा देण्याचा मनसुबा आहे. तसेच, हा उपक्रम आमच्यासाठी कॉर्पोरेट विभागामधील आमचा व्यवसाय विस्तारित करण्याची आणि आमच्या कॉर्पोरेट ग्राहक पोर्टफोलिओमध्ये अधिकाधिक सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश करण्याची संधी आहे. या ऑफरमधून नाविन्यपूर्ण ऑफरिंग्ज, विशेष ऑफर्स आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यासोबतचे आमचे संबंध दृढ करण्याप्रती आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि आमचे एकत्रित प्रयत्न दिसून येतात.”
२०-दिवस विंडोसह विस्तारित क्रेडिट कालावधी सूचीबद्ध कंपन्यांना त्यांचा रोखप्रवाह सर्वोत्तमपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम करेल, तसेच इझमायट्रिपच्या प्रवास व संबंधित श्रेणींची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देईल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कंपन्यांना इझमायट्रिपला पुढील तारीख असलेला धनादेश द्यावा लागेल.
इझमायट्रिपचा कॉर्पोरेट ट्रॅव्हल विभाग विशेषरित्या क्यूरेटेड प्रोग्राम्स देतो, ज्यामध्ये कॉर्पोरेट दर, आकारमान सूट आणि लॉयल्टी रिवॉर्ड्सचा समावेश आहे. तसेच, ब्रॅण्डचे सेल्फ-बुकिंग टूल आधुनिक तंत्रज्ञानांचा फायदा घेत कॉर्पोरेट्ससाठी एकसंधी बुकिंग अनुभव सक्षम करते. क्रेडिट कालावधी विस्तारित करण्यासाठी हा उपक्रम ग्राहकांना नाविन्यपूर्ण व ग्राहक-केंद्रित ऑफरिंग्ज प्रदान करण्याप्रती, तसेच व्यावसायिक प्रवास विभागाच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्याप्रती इझमायट्रिपच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे.