maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

स्विस ब्‍युटीकडून ऑफलाइन विस्‍तारीकरणाची घोषणा

मुंबई, १३ मार्च २०२४: देशभरात आपली उपस्थिती वाढवण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये स्विस ब्‍युटी या भारतातील आघाडीच्‍या व विश्‍वसनीय कलर कॉस्‍मेटिक्‍स ब्रॅण्‍डने आपली रिटेल फूटप्रिंट वाढवण्‍यासाठी आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्‍ये द्वितीय श्रेणीच्‍या व स्‍मार्ट शहरांमधील आपली सखोल पोहोच विस्‍तारित करण्‍यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्‍या आहेत. सर्वात नाविन्‍यपूर्ण कलर कॉस्‍मेटिक्‍स भारतीय ब्रॅण्‍ड मार्च २०२४-२५ पर्यंत भारतातील १२ शहरांमधील त्‍यांचे एक्‍सक्‍लुसिव्‍ह ब्रॅण्‍ड आऊटलेट्स (ईबीओ) दुप्‍पट करण्‍यास सज्‍ज आहे. आपल्‍या बहुआयामी विस्‍तारीकरण धोरणाच्‍या माध्‍यमातून स्विस ब्‍युटी ग्राहकांना उच्‍च दर्जाचे, प्रिमिअम व विविध प्रकारचे सौंदर्य उत्‍पादने प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

भारतातील ५५० हून अधिक शहरांमध्‍ये जवळपास २५,५०० रिटेल टचपॉइण्‍ट्स असण्‍यासह स्विस ब्‍युटीचा या वर्षात आपली ऑफलाइन रिटेल उपस्थिती वाढवत प्रगत गतीचा फायदा घेण्‍याचा मनसुबा आहे. ब्रॅण्‍डची २०२४-२५ मध्‍ये संपूर्ण भारतातील अतिरिक्‍त १४७ ब्‍युटी असिस्‍टेड आऊटलेट्स सुरू करण्‍याची आणि जनरल ट्रेडमध्‍ये ४५० हून अधिक टचपॉइण्‍ट्सची भर करण्‍याची योजना आहे. लोकप्रिय बीएफएफ ब्‍युटी ब्रॅण्‍ड अहमदाबाद, सुरत, मुंबई, दिल्‍ली, चेन्‍नई, चंदिगड, पंजाब, हैदराबाद, लखनौ, कोलकाता व बेंगळुरू या प्रमुख बाजारपेठांसह ११ नवीन शहरांमधील ब्‍युटी असिस्‍टेड स्‍टोअर्समध्‍ये प्रवेश करणार आहे.

स्विस ब्‍युटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी साहिल नायर म्‍हणाले, ”भारतीय ब्‍युटी व पर्सनल केअर उद्योगाला विकासासाठी मोठी संधी आहे, जेथे कॉस्‍मेटिक्‍समध्‍ये मुलभूत स्‍वच्‍छताविषयक उत्‍पादनांमधून जीवनशैली निवडींपर्यंत बदल झाला आहे. आम्‍हाला स्विस ब्‍युटीमध्‍ये कलर कॉस्‍मेटिकच्‍या जागतिक मानकांची भर करण्‍याचा, तसेच नवीन ठिकाणी ग्राहकांसाठी उच्‍च कार्यक्षम मेकअप उत्‍पादने घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे. आमचा ६० टक्‍के महसूल ऑफलाइन बाजारपेठांमधून येत असल्‍यामुळे आम्‍ही पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये आमच्‍या रिटेल टचपॉइण्‍ट्समध्‍ये प्रबळपणे विस्‍तार करण्‍यास सज्‍ज आहोत, ज्‍यामुळे २५५०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या प्रबळ नेटवर्कमध्‍ये नवीन ठिकाणांची भर होईल आणि आकडेवारी जवळपास ३०००० पर्यंत पोहोचेल.”

ते पुढे म्‍हणाले, ”आमचा जवळपास ४० टक्‍के व्‍यवसाय द्वितीय श्रेणीच्‍या व स्‍मार्ट शहरांमध्‍ये आहे, तसेच आमचा या प्रदेशांमधील आमची उपस्थिती वाढवण्‍याचा मनसुबा आहे. आमची उत्‍पादने अधिकाधिक ग्राहकांना सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची आणि भारतभरातील बहुमूल्‍य ग्राहकांच्‍या सौंदर्यविषयक गरजांची पूर्तता करण्‍याचे मिशन आहे.”  

स्विस ब्‍युटीने यशस्‍वीरित्या आपल्‍या मेकअप ऑफरिंग्‍जचा विस्‍तार करत नवीन कलेक्‍शन्‍स सादर केले आहेत, ज्‍यामध्‍ये नवीन लिपस्टिक्‍स आणि विविध पॅलेट्सचा समावेश आहे. तसेच, ब्रॅण्‍डच्‍या सणासुदीचा काळ व विवाह सोहळ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले एक्‍सक्‍लुसव्हि किट्स लाँच करण्‍याच्‍या उत्‍साहवर्धक योजना आहेत, ज्‍यांचा अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍याचा मनसुबा आहे.

 

Related posts

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात ४के अपस्‍केलिंग, एअरस्लिम डिझाइन आणि नॉक्‍स सिक्‍युरिटी असलेला २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच

Shivani Shetty

नेस्ले इंडिया साजरी करत आहे प्रोजेक्ट हिलदारीची पाच वर्षे

Shivani Shetty

Leave a Comment