maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

श्रीनगर स्‍मार्ट सिटीने टाटा मोटर्स अल्‍ट्रा ईव्‍ही इलेक्ट्रिक बसेससह स्‍वीकारला हरित मार्ग

श्रीनगर, नोव्‍हेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स (जेअॅण्‍डके) प्रा. लि. या टाटा मोटर्स ग्रुप कंपनीच्‍या माध्‍यमातून श्रीनगर स्‍मार्ट सिटीला अत्‍याधुनिक अल्‍ट्रा ईव्‍ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसच्‍या पहिल्‍या बॅचचा पुरवठा केल्‍याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्‍हरी जम्‍मू व काश्‍मीर स्‍मार्ट सिटी प्रकल्‍पांसाठी १२ वर्षांच्‍या कालावधीकरिता श्रीनगरमध्‍ये १०० इलेक्ट्रिक बसेस आणि जम्‍मूमध्‍ये १०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, देखरेख व ऑपरेट करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सर्वात मोठ्या ऑर्डरचा भाग आहे. हा सहयोग श्रीनगरसाठी सार्वजनिक परिवहनाचे पर्यावरणदृष्‍ट्या व आर्थिकदृष्‍ट्या शाश्‍वत नेटवर्क स्‍थापित करण्‍यासाठी गृहनिर्माण व शहरी विकास विभाग, जम्‍मू व काश्‍मीर सरकारच्‍या उपक्रमाचा भाग आहे. शून्‍य-उत्‍सर्जन बसेस नेक्‍स्‍ट-जनरेशन आर्किटेक्‍चवर स्‍वदेशी निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच या बसेसमध्‍ये आधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत आणि प्रगत बॅटरी सिस्‍टम्‍सची शक्‍ती आहे. या बसेस श्रीनगर शहरामध्‍ये सुरक्षित, आरामदायी व सोईस्‍कर आंतर-शहरीय प्रवासाचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

 

जम्‍मू व काश्‍मीरचे माननीय लेफ्टनंट जनरल श्री. मनोज सिन्‍हा, जम्‍मू व काश्‍मीरचे प्रमुख सचिव श्री. अरूण कुमार मेहता, श्रीनगरचे माननीय महापौर श्री. जुनैद आझीम मट्टू, जम्‍मू व काश्‍मीरच्‍या एचअॅण्‍डयूडीडीचे प्रमुख सचिव श्री. प्रशांत गोयल, काश्‍मीरचे विभागीय आयुक्‍त व श्रीनगर स्‍मार्ट सिटीचे अध्‍यक्ष श्री. विजय कुमार बिधुरी, जम्‍मू व काश्‍मीरच्‍या परिवहन विभागाचे प्रशासकीय सचिव श्री. प्रसन्‍न रामास्‍वामी, श्रीनगर महापालिकेचे आयुक्‍त व श्रीनगर स्‍मार्ट सिटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयएएस श्री. अथर आमीर खान यांनी ई-बसेसच्‍या ताफ्याला झेंडा दाखवला. यावेळी जम्‍मू व काश्‍मीर, श्रीनगर महानगरपालिका आणि टाटा मोटर्सचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. 

जम्‍मू व काश्‍मीरचे माननीय लेफ्टनंट गव्‍हर्नर श्री. मनोज सिन्‍हा यांनी याप्रसंगी श्रीनगरच्‍या नागरिकांचे अभिनंदन केले. ते म्‍हणाले की,इलेक्ट्रिक बसेस शहरातील सार्वजनिक परिवहनामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणतील. ते पुढे म्‍हणाले की हा उपक्रम शहरासाठी व्‍यापक,एकीकृत, शाश्‍वत शहरी गतीशीलतेचा भाग होता. त्‍यांनी केंद्रशासित प्रदेशाला अविरत पाठिंबा देण्‍यासाठी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे आभार व्‍यक्‍त केले. 

झेंडा दाखवण्‍याच्‍या इव्‍हेण्‍टदरम्‍यान आपले मत व्‍यक्‍त करत जम्‍मू व काश्‍मीरच्‍या गृहनिर्माण व शहरी विकास विभागाचे प्रमुख सचिव श्री. प्रशांत गोयल म्‍हणाले, ”जम्‍मू व काश्‍मीरने शहरी विकासाच्‍या नवीन टप्‍प्‍याला सुरूवात केली आहे, ज्‍यामुळे रस्‍त्‍यांवरील वाहतूकीची कोंडी कमी होईल. टाटा मोटर्सने १२ वर्षांसाठी श्रीनगर स्‍मार्ट सिटी लि. सोबत सहयोग केला आहे, ज्‍यामुळे श्रीनगरमधील लास्‍ट-माइल प्रवासी परिवहन यंत्रणा सुधारण्‍यास मदत होईल.”  

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत श्रीनगर स्‍मार्ट सिटी लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अथर आमीर खान म्‍हणाले, ”श्रीनगर इलेक्ट्रिक बस प्रोजेक्‍ट आमच्‍या शहराच्‍या एकीकृत सस्‍टेनेबल अर्बन मोबिलिटीचा भाग आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना विश्‍वसनीय, किफायतशीर व आरामदायी सार्वजनिक परिवहन सेवा मिळेल.” 

या महत्त्वपूर्ण प्रसंगी मत व्‍यक्‍त करत टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स (जेअॅण्‍डके) प्रा. लि.चे अध्‍यक्ष श्री. आसिम कुमार मुखोपध्‍याय म्‍हणाले, ”शाश्‍वत सार्वजनिक परिवहन काळाची गरज असलेल्‍या युगामध्‍ये आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की,टाटा मोटर्सला सुंदर श्रीनगर शहरामधील प्रवाशांना परिवर्तनात्‍मक सोल्‍यूशन प्रदान करण्‍यासाठी निवडण्‍यात आले आहे. आमच्‍या प्रगत इलेक्ट्रिक बसेसमध्‍ये अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत, जी प्रवाशांच्‍या प्रवास करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर नेतील, तसेच त्‍यांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री देतील. आम्‍ही इलेक्ट्रिक बसेस प्रदान करण्‍यासह पर्यावरणास अनुकूल, आवाजविरहित व उत्‍सर्जन-मुक्‍त परिवहन सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यासाठी जम्‍मू व काश्‍मीरसोबत संयुक्‍त दृष्टीकोन पुढे घेऊन जात आहोत, जो या प्रदेशाच्‍या निसर्गरम्‍य व प्राचीन वातावरणाशी संलग्‍न आहे. हा सुरक्षित, स्‍मार्टर व हरित गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील मोठा टप्‍पा आहे आणि आम्‍ही जम्‍मू व काश्‍मीरमधील सार्वजनिक परिवहनाच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास उत्‍सुक आहोत.” 

आजपर्यंत, टाटा मोटर्सने भारतातील विविध शहरांमध्‍ये १,००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे, ज्‍यांनी ९५ टक्‍क्‍यांहून अधिक अपटाइमसह एकूण ९.६ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. टाटा अल्‍ट्रा ईव्‍ही अत्‍याधुनिक ई-बस आहे, जी शहरी प्रवासासाठी नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करते. फुल-इलेक्ट्रिक ड्राइव्‍हट्रेनसह ही अत्‍याधुनिक वेईकल ऊर्जेचा वापर सानुकूल करते,ज्‍यामुळे ऊर्जेचा वापर व कार्यसंचालन खर्च कमी होतो. या वेईकलमध्‍ये सुलभ बोर्डिंग, आरामदायी आसनव्‍यवस्‍था व ड्रायव्‍हर-अनुकूल कार्यसंचालन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामधून शून्‍य उत्‍सर्जनाची खात्री मिळते. इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्‍युशन, एअर सस्‍पेंशन, इंटेलिजण्‍ट ट्रान्‍सपोर्ट सिस्‍टम (आयटीएस), पॅनिक बटनसह इतर प्रगत वैशिष्‍टे असलेली ही वेईकल प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाची खात्री देते. या इलेक्ट्रिक बसमधून शुद्ध सार्वजनिक परिवहनाप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते आणि शहरी प्रवासी परिवहन गरजांसाठी योग्‍य निवड आहे.       

Related posts

व्हिएतजेटकडून आपल्‍या आधुनिक ताफ्यामध्‍ये १०२व्‍या विमानाची भर

Shivani Shetty

एटंेरोहल्ेथकेयरसोल्यशुन्सलिलिटेडनेसबेीकडेडीआरएचपीफाईिकेिे

Shivani Shetty

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी यांना एनएसएसीसाठी नामांकन

Shivani Shetty

Leave a Comment