maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचे मुंबईमध्‍ये नवीन कार्यालय

मुंबई, २ डिसेंबर २०२४:* इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आज मुंबईमध्‍ये आपल्‍या नवीन कार्यालयाच्‍या उद्घाटनाची घोषणा केली, जो भारताच्‍या आर्थिक राजधानीमधील त्‍यांच्‍या उपस्थितीच्‍या विस्‍तारीकरणामधील मोठा टप्‍पा आहे. अंधेरी पूर्व येथील स्‍कायलाइन आयकॉन येथे स्थित नवीन कार्यालय पश्चिम भारतातील वाढत्‍या ग्राहकवर्गाला सेवा देण्‍याप्रती इझमायट्रिपच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

 

स्‍कायलाइन आयकॉनच्‍या संपूर्ण चौथ्‍या मजल्‍यावर असलेले हे अत्याधुनिक कार्यालय कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल मॅनेजमेंट, बी२बी सेवा, माइस कार्यसंचालने आणि हॉलिडे पॅकेजेसमधील कंपनीच्‍या क्षमता वाढवण्‍यासाठी धोरणात्‍मकरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहे. हे विस्‍तारीकरण प्रमुख महानगरीय बाजारपेठांमध्‍ये प्रत्‍यक्ष उपस्थिती अधिक प्रबळ करण्‍याच्‍या इझमायट्रिपच्‍या धोरणात्‍मक विकास उपक्रमाचा भाग आहे.

 

*इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी* म्‍हणाले, “आम्‍हाला भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्‍ये आमच्‍या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्‍याचा आनंद होत आहे. मुंबई आमच्‍या कॉर्पोरेट ट्रॅव्हल व माइस सेवांसाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. हे विस्‍तारीकरण आम्‍हाला आमच्‍या वाढत्‍या ग्राहकवर्गाला उत्तम सेवा देण्‍यास मदत करते, तसेच आघाडीचा तंत्रज्ञान-संचालित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स प्रदाता म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करते. नवीन कार्यालय आमचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अहोरात्र सपोर्टचे पाठबळ असलेल्‍या वैयक्तिकृत सेवा देण्‍याच्‍या आमच्‍या क्षमतेमध्‍ये वाढ करते.’’

 

नवीन कार्यालयामध्‍ये इझमायट्रिपच्‍या प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीला पाठिंबा देण्‍यासाठी आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आहेत. मुंबईतील आंतरराष्‍ट्रीय विमानतळ आणि प्रमुख व्‍यवसाय जिल्‍ह्यांपासून जवळच्‍या अंतरावर असलेल्‍या अंधेरी पूर्व येथील धोरणात्‍मक ठिकाणी स्थित हे कार्यालय इझमायट्रिपला कॉर्पोरेट क्‍लायण्‍ट्स आणि ट्रॅव्‍हल सहयोगींना उत्तम सेवा देण्‍यास मदत करते.

 

दिल्‍ली, बेंगळुरू व नोएडा येथे कार्यालये असण्‍यासह इझमायट्रिपची देशभरात प्रबळ उपस्थिती आहे. तसेच फिलिपाइन्‍स, सिंगापूर, थायलंड, यूएसए, लंडन, न्‍यूझीलंड आणि यूएईमध्‍ये कार्यालयांसह (उपकंपन्‍या म्‍हणून) ब्रँडची आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर देखील मोठी उपस्थिती आहे. गुरूग्राममधील नवीन कार्यालय ब्रँडची उपस्थिती वाढवण्‍याच्‍या आणि आपल्‍या ट्रॅव्‍हल बुकिंग सेवांसह बाजारपेठेतील तफावत दूर करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मोठ्या दृष्टिकोनाचा भाग आहे.

Related posts

इझमायट्रिपकडून आझादी मेगा सेलची घोषणा

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने ‘विश्व जैव ईंधन दिवस 2024’ पर स्वच्छ और हरित वाहन गतिशीलता के लिए समग्र दृष्टिकोण को बढ़ावा दिया

Shivani Shetty

कॅरटलेन तर्फे ‘उत्सव’ कलेक्शन सादर

Shivani Shetty

Leave a Comment