मुंबई, ५ नोव्हेंबर २०२४:* लिव्हप्युअर या भारतातील ग्राहकांच्या स्वास्थ्याप्रती समर्पित आघाडीच्या व सर्वात विश्वसनीय ग्राहक-केंद्रित ब्रँडने नुकतेच सेरेनो वॉटर प्युरिफायर लाँच केला आहे. हे प्रगत सोल्यूशन संपूर्ण भारतातील आधुनिक कुटुंबांमधील जल शुद्धीकरणाला अधिक चालना देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या वॉटर प्युरिफायरच्या लाँचसह कार्यक्षम व शाश्वत जल शुद्धीकरण यंत्रणांसाठी प्रबळ मागणी दिसून येते. सेरेनो ६० टक्के वॉटर रिकव्हरीसह अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे इतरांपेक्षा वरचढ ठरतो, तसेच कार्यक्षमता व पर्यावरणीय जबाबदारीला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी इको-फ्रेण्डली निवड आहे. यामधून शाश्वतता व जल संवर्धनाप्रती लिव्हप्युअरची कटिबद्धता देखील दिसून येते, जेथे तंत्रज्ञानाचा फायदा घेत भूमातेच्या स्वास्थ्यासाठी अधिक शाश्वत उत्पादने डिझाइन केली जात आहेत.
सेरेनोमध्ये प्रगत ८-स्टेज प्युरिफिकेशन प्रक्रिया आहे, जी प्रभावीपणे गाळ, हानीकारक दूषित पदार्थ व जीवाणू काढून टाकते, ज्यामधून उच्च गुणवत्तेच्या शुद्ध पाण्याची खात्री मिळते. लिव्हप्युअरची नाविन्यतेप्रती कटिबद्धता प्रगत तंत्रज्ञान आणि युजर-अनुकूल सोयीसुविधेच्या विनासायास संयोजनामधून दिसून येते. गंजरोधक व फूड ग्रेड ३०४ एसएस मटेरिअलसह डिझाइन करण्यात आलेले ५.५ लीटर स्टेनलेस स्टील टँक दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्वच्छतेची खात्री देते, तर हाय रिकव्हरी टेक्नॉलॉजी दररोज जवळपास २० लीटर पाण्याची बचत करते, ज्यामुळे हा वॉटर प्युरिफायर पाण्याची बचत करण्याबाबत जागरूक असलेल्या कुटुंबांसाठी शाश्वत निवड आहे. तसेच, भर करण्यात आलेले नैसर्गिक कॉपर पाण्यातील आवश्यक मिनरल्समध्ये वाढ करते, ज्यामुळे आरोग्यदायी फायदे मिळण्यासोबत पाण्याची चव अधिक समृद्ध होते.
*लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल* म्हणाले, ”आम्हाला सेरेनो लाँच करण्याचा अभिमान वाटत आहे, ज्यामधून जल शुद्धीकरणामधील नाविन्यता आणि शाश्वततेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. स्टेनलेस स्टील टँकसह सेरेनोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आजच्या आरोग्याप्रती जागरूक कुटुंबांसाठी तयार करण्यात आलेल्या आधुनिक डिझाइनचे परिपूर्ण संयोजन आहे. कुटुंबांना किमान प्रयत्नांसह सर्वोच्च गुणवत्तेचे पाणी उपलब्ध असण्याची खात्री घेण्यासाठी प्रत्येक वैशिष्ट्य विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. लिव्हप्युअरचा कार्यक्षम जल व्यवस्थापन व संवर्धनाच्या माध्यमातून आरोग्याचे संरक्षण करणारे आणि अधिक शाश्वत जीवनशैलीप्रती योगदान देणारे उत्पादन देण्याचा मनसुबा आहे.”
स्लीक ब्लॅक डिझाइनसह सेरेनो आधुनिक घरांमध्ये कार्यक्षमता व आकर्षकतेची भर करतो. हा प्युरिफायर ग्लास, बॉटल आणि सानुकूल सेटिंग्जसह सतत प्रवाह यांसह विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध वॉटर डिस्पेन्सिंग पर्याय देतो. यामधील रिअल-टाइम डिस्प्ले अलर्टस् ग्राहकांना फिल्टर लाइफ, वॉटर लेव्हल्स व प्युरिफिकेशन स्टेटस अशी महत्त्वपूर्ण माहिती देतात, ज्यामधून कुटुंबांना नेहमी सुरक्षित, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते. टँकमधील यूव्ही निर्जंतुकीकरण वैशिष्ट्य साठवलेल्या पाण्याच्या शुद्धतेची अधिक हमी देते, ज्यामुळे अधिक काळापर्यंत वापरादरम्यान पाण्याच्या सुरक्षिततेमध्ये अधिक भर होते.