maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘यंग शेफ यंग वेटर’ स्पर्धा २०२४ चे आयोजन

मुंबई, १८ जानेवारी २०२४: अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू), या जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन तरूण मनांना चालना देणारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेने बहुप्रतिष्ठित यंग शेफ यंग वेटर (वायसीवायडब्ल्यू) २०२४ चे आयोजन मुंबईत आयोजन करण्याची घोषणा केली आहे. मागील चार दशकांपासून जागतिक हॉस्पिटॅलिटी समुदायाला प्रोत्साहन देऊन प्रेरित केल्यानंतर ही स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा हेतू तरुण विद्यार्थी शेफ आणि सेवा प्रशिक्षणार्थींच्या कौशल्यांची तपासणी करून त्यांना जगभरातील उद्योग तज्ञांकडून शिकण्यास मदत करण्याचा आणि व्यावसायिक वाढीस चालना देण्याचा आहे. या स्पर्धेची नोंदणी १५ जूनपर्यंत सुरू राहील. इच्छुक सहभागींना यंगशेफयंगवेटरडॉटकॉमवर नावनोंदणी करता येईल.

हॉस्पिटॅलिटीला एक करिअर म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी यूके हॉस्पिटॅलिटी आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या भागीदारीतून १९७९ साली सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा ४५ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रातील प्रोफेशनल्‍सकडून चालवली जाते.

रेस्टॉरंट असोसिएशन यूकेचे, अध्यक्ष आणि प्रेसिडेंट डॉ. रॉबर्ट वॉल्टन एमबीई म्हणाले की, “यंग शेफ यंग वेटर स्पर्धेने मागील अनेक वर्षांत हॉस्पिटॅलिटीच्या उद्योगातील प्रतिभेचा शोध घेऊन तिचा गौरव केला आहे. अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन केल्याने एक नवीन आणि रोमांचक आयाम जोडला जाईल. वेगळ्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्याच्या विद्यापीठाच्या दृष्टीकोनाचे आम्ही कौतुक करतो. आम्ही भारतातील नवनवीन चवी आणि अनुभवांची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आणि अजिंक्‍य डी वाय पाटील ग्रुपचे चेअरमन डॉ. अजिंक्‍य डी वाय पाटील म्हणाले की, “वायसीवायडब्ल्यू स्पर्धेचे आयोजन करून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उगवत्या तार्‍यांच्या उत्सवात सामील होण्यासाठी आम्ही उत्‍साहित आहोत. ही स्पर्धा तरुण प्रतिभेसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करेल आणि उद्योगात स्वारस्य निर्माण होईल तसेच भारतीय पाककला आणि सेवा उत्कृष्टतेवर भर दिला जाईल, असे आम्हाला वाटते. आम्हाला या उपक्रमाशी जोडले गेल्याबाबत खूप अभिमान वाटतो आणि तरुण व्यावसायिकांकडून सादर करण्यात येणारी कौशल्ये पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

“वायसीवायडब्ल्यू हे तरुण भारतीय प्रतिभेसाठी जागतिक नेटवर्क तयार करण्यासाठी आणि सर्वोत्तम गोष्टींकडून शिकण्यासाठी योग्य व्यासपीठ ठरेल. हॉस्पिटॅलिटी एक्सलन्समध्ये भारताला एक उगवता तारा म्हणून आम्‍हाला प्रस्थापित करायचे आहे”, असे मत वर्ल्ड यंग शेफ यंग वेटरचे व्यवस्थापकीय संचालक सीन वॅलेंटाईन यांनी व्यक्त केले.

शेफ मारियो पेरारा आणि शेफ सायरस तोडीवाला हे या स्पर्धेचे परीक्षक असतील, हे दोघेही त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. स्पर्धेच्या सुरूवातीला अर्जांची तपासणी होईल. त्यानंतर इंडिया फायनल होईल आणि अंतिम विजेते पुढे जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील.

कॅफे स्पाइस, युनायटेड किंग्डमचे सेलिब्रिटी शेफ सायरस तोडीवाला ओबीई डीएल म्हणाले की, “भारतीय खाद्यपदार्थ आणि सेवांच्या दर्जांनी जागतिक स्तरावर आपली छाप टाकली आहे. खरेतर, मागील दशकात देशात पाककला उत्कृष्टता आणि सेवा मानकांमध्ये प्रशंसनीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक प्रतिभेची प्रचंड क्षमता साजरी करण्यासाठी ही जागतिक स्पर्धा भारतात आणताना आम्हाला आनंद होत आहे.”

“भारताच्या पुढच्या पिढीतील हॉस्पिटॅलिटी हिरोंच्या सर्जनशील प्रतिभांचे परीक्षण करताना मला आनंद होत आहे. जगभरात हॉस्पिटॅलिटी उद्योगावर छाप पाडण्यासाठी त्यांच्याकडे असलेली कला जगाला दाखवण्याची ही त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे,” असे मत दि डॉर्चेस्टरचे कार्यकारी शेफ, सेलिब्रिटी शेफ मारिओ परेरा यांनी व्यक्त केले.

Related posts

सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी ‘पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

Shivani Shetty

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर भारतभरातील निवडक रिलायन्स डिजिटल आऊटलेट्समध्ये पाच सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध

Shivani Shetty

भारतात फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स झपाट्याने वाढत आहेत: सॅमसंगचे मोबाइल बिझनेस हेड टीएम रोह

Shivani Shetty

Leave a Comment