maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

शेवटच्‍या क्षणी व्‍हॅलेंटाइन्‍स डेचे नियोजन करत आहात? व्हिसाच्‍या या टिप्‍सचा वापर करा

परिपूर्ण व्‍हॅलेंटाइन्‍स डे गेटवेचे नियोजन करण्‍यासाठी वेळ नाही आहे का? व्हिसा अधिक बचत करणाऱ्या टिप्‍स सांगत आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही त्‍वरित व संस्‍मरणीय गेटवेचे नियोजन करू शकता, जे किफायतशीर व रोमँटिक असेल.

 

• कमी ज्ञात ठिकाणे निवडा: नेहमीची, गर्दीची पर्यटन स्थळे सोडून कमी ज्ञात ठिकाणे निवडा. अज्ञात ठिकाणांचा शोध घ्‍या, जी सहसा अधिक उत्‍साहवर्धक अनुभव देतात आणि किफायतशीर असतात, ज्‍यामुळे प्रवास आणि निवास या दोन्‍ही बाबींसंदर्भात बचत होईल.

• जोडप्यांसाठी असलेल्‍या ऑफर्स शोधा: अनेक ठिकाणी जोडप्यांसाठी सर्वसमावेशक रोमँटिक पॅकेजेस उपलब्ध असतात, ज्यामध्‍ये जेवण, ऍक्टिव्हिटीज आणि अनोखे अनुभव यांचा समावेश असतो. हे पॅकेजेस् उत्तम मूल्‍य देऊ शकतात, अतिरिक्त खर्च न करता तुम्हाला कायमस्वरूपी आठवणींचा संग्रह करण्यास मदत करतात.

• बचत वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स वापरा: प्रवासाला अधिक बजेट-अनुकूल बनवण्यासाठी प्रवासाशी संबंधित खर्चासाठी तुमच्या व्हिसा कार्डवरील विशेष ऑफर, जसे बोनस पॉइण्‍ट्स किंवा कॅशबॅकचा फायदा घ्या!

• पर्यायी निवास पर्यायांचा विचार करा: हॉटेल बुक करण्याऐवजी व्‍हेकेशन रेण्‍टल्‍स किंवा खाजगी रूम्‍स असलेल्‍या हॉस्‍टेल्‍सचा विचार करा. हे बहुतेकदा खिशाला अधिक परवडणारे असू शकतात आणि तुम्‍हाला व तुमच्‍या जोडीदाराला अनोखा किंवा वैयक्तिकृत अनुभव देऊ शकतात.

• सोप्या पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वापरा: तुम्ही स्टोअरमध्ये प्रत्‍यक्ष पेमेंट करत असाल तर कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट्सचा वापर करा. ते जलद, सुरक्षित आहेत, ज्‍यामुळे तुमचे प्री-ट्रिप खर्च व्यवस्थापित करणे सोपे होते.

प्रेमासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही! या टिप्ससह, तुम्‍ही शेवटच्‍या क्षणी नियोजन केलेला व्हॅलेंटाईन डे किफायतशीर आणि संस्‍मरणीय बनवू शकता.

Related posts

फिजिक्‍सवालाने एका वर्षात १ लाख तरूणांना अपस्किल केले

Shivani Shetty

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला पछाडत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट IMDbच्या यादीत आघाडीवर

Shivani Shetty

इझमायट्रिपचा विमा क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment